Rani Mukerji Trolled Over Reaction On Domestic Problems: 'बायकोनंही नवऱ्यावर आवाज चढवला पाहिजे...'; राणी मुखर्जीचं परखड मत, नेटकऱ्यांना मात्र खटकलं, नेमकं काय घडलं?
Rani Mukerji Trolled Over Reaction On Domestic Problems: राणीनं नुकत्याच 'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत घरातील वातावरण आणि मुलांच्या मानसिकतेवर वडिलांचा कसा प्रभाव पडतो, यावर भाष्य केलंय.

Rani Mukerji Trolled Over Reaction On Domestic Problems: बॉलिवूडची (Bollywood News) राणी म्हणजे, अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) तिचा नवा सिनेमा 'मर्दानी 3' मुळे (Mardaani 3) चर्चेत आहे. नुकत्याच आपल्या सिनेमाच्या प्रमोशनवेळी राणीनं केलेलं वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आहे. राणीनं नुकत्याच 'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत घरातील वातावरण आणि मुलांच्या मानसिकतेवर वडिलांचा कसा प्रभाव पडतो, यावर भाष्य केलंय. तिच्या नेमक्या याच वक्तव्यावरुन अनेकांनी तिला फैलावर घेतलंय. राणीनं मांडलेलं परखड मत अनेकांना फारसं रुचलेलं नाही.
अभिनेत्री राणी मुखर्जीनं घरगुती समस्यांवर भाष्य केलं आणि म्हटलं की, पत्नीनं त्यांच्या पतीशी बोलताना आवाज उठवला पाहिजे. तिच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत, अनेक सोशल मीडिया युजर्सनी तिच्यावर नातेसंबंधात ओरडणं सामान्य असल्याचं भासवल्याबद्दल टीका केली आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत राणीनं घरातील घरगुती समस्यांवर चर्चा केली.
नेमकं काय म्हणाली राणी मुखर्जी?
स्त्रियांच्या सन्मानाबाबत बोलताना राणी मुखर्जी म्हणाली की, "स्त्रियांचा सन्मान करण्याची सुरुवात ही घरातूनच व्हायला हवी. जेव्हा एखादा पुरुष आपल्या पत्नीला किंवा आईला चुकीची वागणूक देतो, तेव्हा घरातली मुलं तेच बघून मोठी होतात. त्यांना असं वाटू लागतं की बाहेरच्या स्त्रियांनाही अशीच वागणूक मिळायला हवी. त्यामुळे आपल्या पत्नीला सन्मान देण्याची सर्व जबाबदारी ही वडिलांची आहे, कारण मुलं त्यांचंच अनुकरण करतात..."
"जर नवरा पत्नीवर विनाकारण आवाज वाढवत असेल, तर पत्नीनेही गप्प न बसता आपला आवाज वाढवला पाहिजे. स्त्रियांचा सन्मान घरापासूनच जपला गेला पाहिजे...", असंही राणी मुखर्जी म्हणाली.
राणी मुखर्जीनं ती शाळेत असताना घडलेल्या एका घटनेची आठवण करून दिली. ती म्हणाली की, तिनं शाळेत एकदा एका मुलाला जोरदार कानशीलात लगावली होती. नंतर तिनं गमतीनं तिचा पती आदित्य चोप्राचा उल्लेख केला आणि म्हणाली की, "मी फक्त एकाच मुलाला कानाखाली मारली होती; बाकीचे माझे मित्र होते..." त्यातच पुढे बोलताना मिश्किलपणे राणी म्हणाली की, "आणि माझ्या नवऱ्याला अजिबात विचारायला जाऊ नका की, घरी रोज काय होतं..."
राणी मुखर्जीचं वक्तव्य नेटकऱ्यांना खटकलं
राणी मुखर्जीचं वक्तव्य नेटकऱ्यांना मात्र खटकल्याचं पाहायला मिळतंय. राणीनं स्त्रियांच्या सन्मानाबाबत केलेल्या परखड वक्तव्यावरुन तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. अनेकांनी रेडिट आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवरुन राणीच्या वक्तव्याशी असहमत असल्याचं सांगितलं. तसेच, राणीच्या दृष्टीकोनाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
राणी मुखर्जीच्या वक्तव्यावर बोलताना एका युजरनं लिहिलंय की, "मला वाटते की ती विनोद करण्याचा प्रयत्न करतेय, पण तिला कळत नाही की ती तसे नाही..." तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, "ती हसते आणि तिला वाटतंय की, ती खरोखरंच खपू काहीतरी छान बोललीय..." पुढे आणखी एका युजरनं लिहिलंय की, "हे कोणत्या प्रकारचे वर्तन आहे? मला खरोखर समजत नाही की कोणीही तिला का हाक मारत नाही. ती जुन्या पिढीतील आहे याचा अर्थ ती जे काही बोलू शकते ते बोलू शकत नाही..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















