एक्स्प्लोर

Rang Majha Vegla : इनामदारांच्या घरी न जाण्याचा दीपिकाचा निर्धार, दीपाच आपली आई असल्याचं सत्य तिला कळणार?

Rang Majha Vegla : आपल्याबद्दलच्या या गोष्टी ऐकून दीपिकाला मोठा धक्का बसला आहे. यानंतर आता दीपिकाने इनामदारांचे घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Rang Majha Vegla : स्टार प्रवाहवरील मालिका ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट आणि टर्न्स येत आहेत. मालिकेत आता दीपिकाला कळलं आहे की, आपण अनाथ असून आपले नातेवाईक खरे नातेवाईक नाहीत. सध्या मालिकेत अनेक वळणं येत आहेत. यामुळे ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. या मालिकेतील सतत बदलते ट्रॅक आणि कथेतील ट्विस्ट मालिकेची रंगत वाढवत आहेत. शिवाय यातील कलाकारांच्या अभिनयाने देखील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

श्वेता आणि आयेशा दीपिका आणि दीपा यांना त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. घरात काम कार्याला येणाऱ्या दीपासोबत दीपिका देखील घराबाहेर जावी, यासाठी आता त्या दोघी नवा प्लॅन बनवत आहेत. दीपिका जवळून जात असल्याचे लक्षात येताच श्वेता मुद्दाम मोठ्याने फोनवर बोलू लागते. दीपिकाला ऐकू जाईल अशा आवाजात श्वेता म्हणते, दीपिका अनाथ मुलगी आहे. तिचा डॅडा आणि आजी हे तिचे नातेवाईक नाहीत. हे ऐकून दीपिकाला धक्का बसतो.

दीपिकाने घेतला घर सोडण्याचा निर्णय!

आपल्याबद्दलच्या या गोष्टी ऐकून दीपिकाला मोठा धक्का बसला आहे. यानंतर आता दीपिकाने इनामदारांचे घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी रागाने घराबाहेर पडलेली दीपिका कार्तिकीच्या घरी पोहचते. इथे आल्यावर ती कार्तिकीला आपल्या मनातील सगळ्या गोष्टी सांगते. यावेळी दीपिका देखील कार्तिकीला कार्तिकशी का बोलत नाही, यामागचं कारण सांगते. दोघींचं हे बोलणं दीपा दरवाज्याबाहेर उभं राहून ऐकते.

दीपिका आणि कार्तिकीची समजूत काढल्यानंतरही दीपिका तिथून निघून जाते आणि तिला किडनॅप केल्याप्रकरणी दीपाला अटक होते. आता दीपाला पोलीस स्टेशनमधून बाहेर काढण्यासाठी दीपिका पुन्हा येणार आहे. मात्र यावेळी तिने आपण इनामदारांच्या घरात जाणार नाही, असा निर्धार केला आहे. यावेळी ती दीपाला म्हणते की, मी घरी जाणार नाही, मी तुझ्या घरी येऊ का?’ आता दीपिकाची समजूत काढेपर्यंत दीपा तिला आपल्या घरी घेऊन जाणार आहे. आता दीपाच आपली आई असल्याचं सत्य दीपिकाला कळणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र, यानिमित्ताने अनेक वर्षांनी ताटातूट झालेल्या मायलेकी एकमेकींना भेटणार आहेत.

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Nushrratt Bharucchas Bali Accident: जोखमीच्या शस्त्रक्रियेनंतर नुसरत भरूचाचा पहिला फोटो समोर, स्वतःच्या हातानं खाणंही अवघड, फोटो पाहून चाहत्यांच्या चिंतेत भर, VIDEO
जोखमीच्या शस्त्रक्रियेनंतर नुसरत भरूचाचा पहिला फोटो समोर, स्वतःच्या हातानं खाणंही अवघड, फोटो पाहून चाहत्यांच्या चिंतेत भर, VIDEO
Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
Bharat Jadhav Webseries: भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola: दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? अकोल्यात कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...
दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Embed widget