एक्स्प्लोर

राजपाल यादव 10 दिवसांत जेलबाहेर? सलमान खानने मदतीसाठी चक्रं फिरवल्याची चर्चा, व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Rajpal Yadav Viral Video Fact Check: सोशल मीडियावर राजपाल यांचा एक व्हिडिओ जोरात व्हायरल होत असून त्यातून ते सुटल्याचा दावा केला जात आहे. मात्र या व्हिडिओमागचं सत्य वेगळंच आहे.

Rajpal Yadav Viral Video Fact Check: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. चेक बाउन्स प्रकरणात त्यांना तिहार जेलमध्ये शरणागती पत्करावी लागली. राजपाल जेलमध्ये गेल्याची बातमी समोर आल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांच्या मदतीसाठी पुढे आल्याचंही समोर आलं. दरम्यान, सोशल मीडियावर राजपाल यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून त्यातून राजपाल यादव जेलमधून सुटल्याचा दावा केला जात आहे. मात्र या व्हिडिओमागचं सत्य वेगळंच आहे. पाहूया.

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये राजपाल यादव जेलमधून सुटल्याचा आनंद व्यक्त करताना दिसतात. मीडियाशी बोलताना त्यांनी सलमान खान यांचे आभारही मानले आहेत. त्यामुळे अनेकांना वाटत आहे की सलमान खान यांनी राजपाल यांना जेलमधून बाहेर येण्यासाठी मदत केली. कमेंट सेक्शनमध्ये अनेक जण सलमानचं कौतुक करताना आणि राजपालच्या सुटकेचा आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये राजपाल म्हणताना दिसतात, “सलमान भाई मोठ्या भावासारखे आहेत. त्यांच्या सोबत बसून खूप आनंद वाटतो. इंडस्ट्रीमध्ये सलमान भाईसारखे लोक खूप कमी आहेत. ते नेहमी मदतीसाठी पुढे असतात. आम्ही त्यांच्या सोबत अनेक चित्रपटही केले आहेत.”

सोशल मीडियावर फिरणारा हा व्हिडिओ पाहून अनेकांना राजपाल यादव जेलमधून सुटल्याचा गैरसमज होत आहे. मात्र यात कोणतीही तथ्य नाही. राजपाल यादव सध्या अद्याप जेलमध्येच आहेत. हा व्हिडिओ आताचा नसून 2018 मधील जुना व्हिडिओ आहे, जो आता पुन्हा व्हायरल झाला आहे.

नेमकं प्रकरण काय?

राजपाल यादव यांच्याविरुद्धचं प्रकरण 2010 सालापासून सुरू आहे. त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण करताना अता पता लापता हा चित्रपट बनवण्यासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्याने त्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. कर्जफेड न झाल्याने त्यांनी दिलेले अनेक चेक बाउन्स झाले आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली. दरम्यान, त्यांच्यावरचं कर्ज सुमारे 9 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. अभिनेता अडचणीत असल्याचं समोर आल्यानंतर अजय देवगन, वरुण धवन, सोनू सूद यांसह अनेक कलाकारांनी मदतीची तयारी दाखवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Hollywood Actor: सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
'ही माझ्याकडून अधिकृत नोटीस समजा..' मृणाल ठाकूरचा संताप; पोस्ट करत दिला कारवाईचा इशारा; नेमकं घडलं काय?
'ही माझ्याकडून अधिकृत नोटीस समजा..' मृणाल ठाकूरचा संताप; पोस्ट करत दिला कारवाईचा इशारा; नेमकं घडलं काय?
Mamachya Govyala Jauya Box Office Collection: 7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
Salman Khan Bigg Boss 20: 'बिग बॉस'ची ऑफिशियल अनाउंसमेंट झाली, धमाकेदार टीझर पाहिलात? सलमान खानचा 'करण अर्जून अवतार', म्हणाला...
'बिग बॉस'ची ऑफिशियल अनाउंसमेंट झाली, धमाकेदार टीझर पाहिलात? सलमान खानचा 'करण अर्जून अवतार', म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
Embed widget