एक्स्प्लोर

Rajpal Yadav: जेलमध्ये एअरपोर्टसारखे स्मोकिंग झोन हवेत.. जेलमधून बाहेर येताच राजपाल यादवची सूचना, म्हणाला....

चेक बाउन्स प्रकरणात तिहार जेलमधून सुटका झाल्यानंतर शहाजहानपूर जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी राजपाल यादव याने हे वक्तव्य केले आहे. 

Rajpal Yadav: बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव चेक बाउन्स प्रकरणात गेल्या 11 दिवसांपासून तुरुंगात होता. 17 फेब्रुवारीला त्याला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला असून तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर अभिनेत्याने केलेलं एक वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आहे. पीटीआयला दिलेला प्रतिक्रियेत, राजपाल म्हणाला, लोकांकडून त्याला प्रचंड प्रेम मिळाले. तुरुंगात रेल्वे स्थानक आणि विमानतळांप्रमाणे स्वतंत्र स्मोकिंग झोन असावेत असं वक्तव्य केलंय. जिथे लोकांना शिक्षा दिली जाते तिथे आपल्या तुरुंग व्यवस्थेलाही आधुनिक काळाशिवाय अपग्रेड करण्याची गरज असल्याचं तो म्हणालाय. चेक बाउन्स प्रकरणात तिहार जेलमधून सुटका झाल्यानंतर शहाजहानपूर जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी राजपाल यादव याने हे वक्तव्य केले आहे. 

अभिनेता राजपाल यादव याने 5 फेब्रुवारी 2026 रोजी आत्मसमोर पण केले होते. त्यानंतर 11 दिवस त्याने तुरुंगवास भोगला. सुरुवातीला त्यांना जामीनासाठी अर्ज केला होता मात्र न्यायालयाने तो फेटाळलेला. त्यानंतर भाचीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी जामिनासाठी अर्ज करण्यात आला. या जामीन सुनावणीदरम्यान कोर्टाने दोन तासात दीड कोटी जमा करून त्याला 18 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. दरम्यान जेल मधून बाहेर आल्यानंतर राजपाल यादवने पीटीआयला दिलेल्या प्रतिक्रियेत तुरुंगात रेल्वे स्थानक व विमानतळांसारखी स्मोकिंग झोन असायला हवेत अशी सूचना केल्याने तो चर्चेत आहे. 

नेमकं काय म्हणाला राजपाल यादव? 

चेक बाऊन्स प्रकरणात Tihar Jail मधून सुटका झाल्यानंतर शाहजहानपूर जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी पीटीआय व्हिडिओशी बोलताना राजपाल यादव म्हणाला की, लोकांकडून त्यांना प्रचंड प्रेम मिळाले. मात्र त्यांनी तुरुंगात रेल्वे स्थानक आणि विमानतळांप्रमाणे स्वतंत्र स्मोकिंग झोन असावेत, अशी सूचना केली. तुरुंग सुधारगृहासारखे असावेत, राजपाल यादव म्हणाला, तुरुंग हे सुधारगृहासारखे कार्य करायला हवेत, जिथे कैद्यांना बदलण्यासाठी योग्य संधी दिली जावी. मात्र जे सुधारायला तयार नाहीत, त्यांच्यासाठी कायदा सर्वोच्च राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. बाहेरून पाहताना कोण कट्टर गुन्हेगार आहे आणि कोणाकडून एकदाच चूक झाली आहे, हे ओळखणे कठीण असते, असे ते म्हणाले.

 

उदाहरणार्थ, काही कैदी असे असतात की त्यांची शिक्षा निश्चित झालेली असते आणि ते पुन्हा न्यायालयात जात नाहीत. त्यांच्या वर्तनाचा आणि शिस्तीचा दहा वर्षांपासून आढावा घेतला गेलेला असतो. अशा कैद्यांना किमान 10 टक्के सवलत किंवा दिलासा देण्याचा विचार व्हायला हवा विशेषतः ज्यांनी आधीच 10 ते 15 वर्षे शिक्षा भोगली आहे.अशा कैद्यांपैकी अगदी खालच्या 10  टक्के लोकांनाही जर मुक्त केले किंवा पुनर्वसनाची संधी दिली, तर ते पुन्हा समाजात सकारात्मक योगदान देऊ शकतात,” असे त्याने म्हटले.

महत्त्वाच्या बातम्या

OTT Crime Thriller Webseries: बॉडीची विल्हेवाट लावण्याच्या नादात अडकले 3 मित्र; मराठमोळ्या अभिनेत्याची OTTवर नवी डार्क कॉमेडी क्राइम थ्रिलर सीरिज, सस्पेन्स भंडावून सोडणार
बॉडीची विल्हेवाट लावण्याच्या नादात अडकले 3 मित्र; मराठमोळ्या अभिनेत्याची OTTवर नवी डार्क कॉमेडी क्राइम थ्रिलर सीरिज, सस्पेन्स भंडावून सोडणार
Shatrugan Sinha on Sonakshi Sinha: वडिलांच्या पावलावर लेक पाऊल ठेवणार? सोनाक्षी सिन्हा राजकारणात जाणार? नक्की खरं काय? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले...
वडिलांच्या पावलावर लेक पाऊल ठेवणार? सोनाक्षी सिन्हा राजकारणात जाणार? नक्की खरं काय? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले...
Abhijeet Dipke On Shah Rukh Khan: अभिजीत दिपकेचं भारतात परतण्याचं 'स्वदेस' कनेक्शन, शाहरुखच्या भूमिकेने प्रेरित होऊन निर्णय!
अभिजीत दिपकेचं भारतात परतण्याचं 'स्वदेस' कनेक्शन, शाहरुखच्या भूमिकेने प्रेरित होऊन निर्णय!
Awarapan 2 Box Office: इम्रान हाश्मीच्या 'आवारापन 2'ची धडाकेबाज कामगिरी, मंडे टेस्टमध्ये पास; चौथ्या दिवशी किती कोटी कमावले?
इम्रान हाश्मीच्या 'आवारापन 2'ची धडाकेबाज कामगिरी, मंडे टेस्टमध्ये पास; चौथ्या दिवशी किती कोटी कमावले?

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
Embed widget