एक्स्प्लोर

Rajinikanth Lal Salam : ते 'संघी' असते तर 'लाल सलाम' हा सिनेमा केला नसता; रजनीकांतची मुलगी नेटकऱ्यांवर भडकली

Rajinikanth Lal Salaam :  "माझे वडिल 'संघी' नाहीत. ते 'संघी' असते तर 'लाल सलाम' हा सिनेमा केला नसता", असे दाक्षिणात्य अभिनेता आणि सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी म्हणाली. लाल सलाम (Lal Salaam) या सिनेमाचा ऑडीओ लाँच इव्हेंट पार पडला होता.

Rajinikanth Lal Salaam :  "माझे वडिल 'संघी' नाहीत. ते 'संघी' असते तर 'लाल सलाम' हा सिनेमा केला नसता", असे दाक्षिणात्य अभिनेता आणि सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी म्हणाली. लाल सलाम (Lal Salaam) या सिनेमाचा ऑडीओ लाँच इव्हेंट पार पडला होता. या इव्हेंटसाठी रजनीकांत आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या देखील उपस्थित होती. यावेळी रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या (Aishwarya) वडिलांच्या समर्थनार्थ बोलताना दिसली. चेन्नईमध्ये 26 जानेवारी रोजी पार पडलेल्या एका इव्हेंटमध्ये ऐश्वर्याने (Aishwarya) तिच्या वडिलांना सोशल मीडियावर संघी म्हटले जात असल्याचे म्हटले. जेव्हा ऐश्वर्याने व्यासपीठावर सिनेमाबाबत आपली मते व्यक्त केली, तेव्हा रजनीकांत यांना अश्रू अनावर झाले होते. 

चेन्नईमध्ये 26 जानेवारी रोजी लाल सलाम या सिनेमाचा ऑडिओ लाँच झाला. साईराम इंस्टिट्यूटमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सर्वांना संबोधित करताना रजनीकांत यांनी लाल सलामच्या टीमचे आभार देखील मानले. या इव्हेंट दरम्यान, रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हीने आपले मनोगत व्यक्त केले. तिने वडिलांवर होणाऱ्या व्यक्तिगत टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. वडिल रजनीकांत यांच्या समर्थनार्थ मुलगी ऐश्वर्या हिने भाष्य केले आहे. 

काय म्हणाली रजनीकांत यांची मुलगी?

रजनीकांत यांची मुलगी यावेळी बोलताना म्हणाली, "मी सोशल मीडियावर सक्रिय नसते. मात्र, सोशल मीडियावर काय सुरु आहे? याबाबत माझी टीम मला नेहमी सांगत असते. मला सोशल मीडियावरील पोस्टही दाखवल्या जातात. माझ्या वडिलांबाबतच्या पोस्ट पाहून मला फार राग येत होता. आम्हीही माणूस आहोत. काही दिवसांपासून अनेक लोक माझ्या वडिलांना कॉल करतात आणि म्हणतात की, ते एक संघी आहेत. मलाही या शब्दाचा अर्थ माहिती नव्हता. मी काही लोकांना याबाबत विचारले की, संघी म्हणजे काय? तेव्हा मला सांगण्यात आले की, जे लोक एका विशिष्ट राजकीय पक्षाचे समर्थन करतात. तेव्हा त्यांना संघी म्हटले जाते." 

पुढे बोलताना ऐश्वर्या म्हणाली, "मी स्पष्ट करु इच्छिते की, माझे वडिल संघी नाहीत. ते संघी असते, तर त्यांनी लाल सलाम सारखा सिनेमा केला नसता." मुलगी आपल्यासाठी व्यक्त होत असल्याचे पाहून रजनीकांत यांनाही अश्रू अनावर झाले. मुलगी ऐश्वर्याचे भाषण ऐकल्यानंतर रजनीकांत खुश झाले. ऐश्वर्याने यावेळी बोलताना काही खुलासेही केले आहेत. पुढे ती म्हणाली, सुरुवातीला हा सिनेमा बनवताना बऱ्याच अडचणी आल्या. कारण निर्माते या सिनेमा बनवण्यासाठी पुढे येत नव्हते. 

लाल सलाम सिनेमा कसा आहे?

रजनीकांत यांचा आगामी लाल सलाम हा सिनेमा स्पोर्ट्सशी निगडीत आहे. यामध्ये अभिनेते रजनीकांत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय विष्णू विशाल आणि विक्रांतही सिनेमात झळकणार आहेत. लाल सलाम हा सिनेमा रजनीकांत यांच मुलगी ऐश्वर्या यांनी दिग्दर्शित केला आहे. लाइका प्रोडक्शनच्या सुबास्करन अल्लिराजाह हे या सिनेमाचे निर्माते आहेत. हा सिनेमा 9 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Shoaib Malik-Saniya-Sana : लग्न सानियाशी आणि झंगाट सना जावेदशी, गेल्या 3 वर्षांपासून शोएब-सना होते एकत्र

 

महत्त्वाच्या बातम्या

'गीता गोविंदम'च्या सेटवर विजय देवरकोंडाच्या 'त्या' बोलण्याने रश्मिका रडायला लागलेली; अभिनेत्रीनं सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा
'गीता गोविंदम'च्या सेटवर विजय देवरकोंडाच्या 'त्या' बोलण्याने रश्मिका रडायला लागलेली; अभिनेत्रीनं सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा
Palash Muchhal Singer Sangli: गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Rajpal Yadav Case : 'तुझी जागा तुरुंगातच आहे', चेक बाउंस प्रकरणात राजपाल यादववर सर्वोच्च न्यायालय संतप्त, याचिका फेटाळण्याचा इशारा
'तुझी जागा तुरुंगातच आहे', चेक बाउंस प्रकरणात राजपाल यादववर सर्वोच्च न्यायालय संतप्त, याचिका फेटाळण्याचा इशारा
Ashok Saraf Emotional Father Death: शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Embed widget