एक्स्प्लोर

Rajinikanth Health Update : रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाकडून मोठी माहिती उघड

सुपरस्टार रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल करण्याचं वृत्त समोर आलं आणि त्यांच्याप्रती अनेकांनाच काळजी वाटू लागली. चाहते आणि कलाविश्वातून त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यात आल्या

हैदराबाद : सुपरस्टार (Rajinikanth) रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत हैदराबाद येथील अपोलो रुग्णालयानं एक मेडिकल बुलेटीन जारी केलं आहे. चाहते आणि कलाविश्वाला चिंता लागून राहिलेल्या या मेडिकल बुलेटीनच्या माध्यमातून 'थलैवा'च्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार रजनीकांत यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा आहे. त्यांच्या चाचणी अहवालांमध्ये कोणतीही चिंतेची बाब नाही.

डॉक्टरांची एक टीम रजनीकांत यांच्या प्रकृतीचा आढावा घेत राहील. ज्या आधारे दुपारनंतर त्यांना रुग्णालयातून रजाही दिली जाण्याची शक्यता आहे. रजनीकांत यांचा रक्तदाब नियंत्रणात आल्याची माहितीही रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

रुग्णालयाच्या पत्रकानुसार, चाचण्यांचे सर्व अहवाल हाती आले आहेत. त्यामध्ये चिंता करण्याजोगी कोणतीही बाब नाही. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवणार आहे. ज्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येणार की नाही, याबाबतचा निर्णय़ होईल. पहिल्या दिवसाच्या तुलनेत रजनीकांत यांचा रक्तदाब नियंत्रणात आहे, तर त्यांना झोपेचीही कोणतीच तक्रार नव्हती'.

कोरोना चाचणी निगेटीव्ह...

मागील 10 दिवसांपासून रजनीकांत हे हैदराबादमध्ये त्यांच्या आगामी चित्रपटातं चित्रीकरण करत होते. त्यांच्या चित्रपटाच्या सेटवर असणाऱ्या दोघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला होता. ज्यानंतर 22 डिसेंबरला रजनीकांत यांनीही कोरोना चाचणी करुन घेतली. यात ते कोरोना निगेटीव्ह असल्याचं अर्थात त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं. असं असलं तरीही ते विलगीकरणात असल्याचं म्हटलं जात आहे.

राजकारणात दमदार एंट्री

कलाविश्वात आपल्या नावाची एक वेगळीच ओळख प्रस्थापित करणाऱ्या रजनीकांत यांनी आता राजकारणाची वाट धरली आहे. येत्या काळात ते सक्रीय राजकारणात सहभागी होण्याची चिन्हं आहेत. राजकीय वर्तुळात आता त्यांची ही कारकिर्द नेमकी कशी असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Aamir Khan and Gauri Spratt: आमिर अन् गौरी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले; सिंपल लूक्सने जिंकले चाहत्यांचे मन, पाहा VIDEO
आमिर अन् गौरी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले; सिंपल लूक्सने जिंकले चाहत्यांचे मन, पाहा VIDEO
Shraddha Kapoors Eetha: 'ईठा'बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार 'ही' भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम
'ईठा'बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार 'ही' भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम
Huma Kureshi On Bold Scene: आलिया भट्टच्या 'अल्फा' ला टक्कर; न्यूड सीनचा विषय निघताच बॉलिवूड अभिनेत्रीचा स्पष्ट नकार; कारण देत म्हणली ..
आलिया भट्टच्या 'अल्फा' ला टक्कर; न्यूड सीनचा विषय निघताच बॉलिवूड अभिनेत्रीचा स्पष्ट नकार; कारण देत म्हणली ..
Hemant Dhome on Mumbai-Pune Missing Link: पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला
पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget