Rajesh Pinjani : 'बाबू बँड बाजा'कार राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांचं निधन
Rajesh Pinjani Death News Update: दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांनी बाजू बॅंड बाजाच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जगण्यातलं दु:ख मांडलं होतं. त्यांचं काल निधन झालं.
Rajesh Pinjani : 'बाबू बँड बाजा' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांचं काल अचानक हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. पिंजाणी यांनी बाजू बॅंड बाजाच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जगण्यातलं दु:ख मांडलं होतं. या चित्रपटासाठी त्यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. ते मूळचे नागपूरचे मात्र सध्या ते पुण्यात राहत होते. आज त्यांच्यावर नागपूरमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
'बाबू बॅन्डबाजा' या चित्रपटात सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातील रोजचा संघर्ष अतिशय साध्या पद्धतीने दाखविण्यात आला आहे. आजही खेडोपाडी असलेले बॅन्डवाले अतिशय हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यांचा रोजचा जगण्या-मरण्याचा संघर्ष 'बाबू बॅन्डबाजा' या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. ते केवळ एका बॅन्डवाल्याचे आयुष्य नाही तर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचा आलेख ठरला आहे. दारिद्र्याचे चटके सहन करीत जगणाऱ्या आई-बाप आणि लहान मुलगा यांच्यामधील ही कथा प्रातिनिधिक स्वरूपाची ठरली.
या चित्रपटातील बॅन्डवाल्याची प्रमुख भूमिका अभिनेते मिलिंद शिंदे यांनी साकारली होता. तर त्यांच्यासोबत मिताली जगताप-वराडकर, विवेक चाबूकस्वार यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
अॅड. महेश भोसले यांनी पिंजाणी यांच्या निधनानंतर पोस्ट करत म्हटलं आहे की, फँड्री आला त्याच वेळी अजून एक तसाच दाहक सिनेमा आला होता, बाबू बँड बाजा. त्या सिनेमाला देखील राष्ट्रीय पुरस्कार होता. राजेशजी त्या सिनेमाचे दिग्दर्शक. एक माणूस म्हणून प्रचंड चांगली व्यक्ती. प्रचंड तल्लख आणि विनोद बुद्धी होती या माणसाकडे. भेटल्यावर , फोनवर किती किती बोलायचे. काल अचानक अटॅक आला आणि झाले. भेटलो की पार्टी आणि गप्पा. रस्त्यावर फिरताना फोटो काढून फेसबुकवर "चलते चलते" या कॅप्शनने ते फोटो टाकत असत. इतक्या dawn to earth माणूस खूप कमीवेळा भेटतो काय लिहावं, बोलावं तेच सुचत नाहीये, असं भोसले यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Sindhutai Sapkal : 'नकुशी' असणारी चिंधी ते अनाथांच्या आयुष्याचं सोनं करणारी माय; असा होता सिंधुताई सपकाळांचा जीवनप्रवास
- अनाथांची माय सिंधुताई सपकाळ काळाच्या पडद्याआड, 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- Sindhutai Sapkal : एका युगाचा अंत! अनाथांसाठी आयुष्य झिजवणाऱ्या सिंधुताईंचा 750 हून अधिक पुरस्काराने सन्मान
- Sindhutai Sapkal : 'अनेक निराधारांच्या आयुष्यातील मायेची सावली हरपली', सिंधुताईंच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह