एक्स्प्लोर

Raj Thackeray on RJ Malishka: 'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय? म्हणणारी ती बाई आता कुठे गेली?'; RJ मलिष्कावरुन राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray Mentions RJ Malishkas BMC Song: मुंबईतील पाणी तुंबण्याच्या समस्येवरून राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

Raj Thackeray On RJ Malishka: मुंबईतील (Mumbai Rain) पावसामुळे दरवर्षी निर्माण होणारी परिस्थिती आणि त्यावरुन मुंबईकरांची होणारी दमछाक, यावर आर.जे मलिष्का हिनं 'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय?  हे गाणं 2017 साली तयार केलं होतं.  यानंतर 2018 साली तिंन रस्त्यांवरील (RJ Malishka) खड्ड्यांमुळे जनतेची होणारी दुरावस्था, यावर भाष्य करणारं गाणं तयार केलं होतं.  मुंबईत मुसळधार पाऊस पडला की, आजही या गाण्याची आठवण अनेकांना होते. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुंबईला पावसामुळे उद्भवणारी समस्या आणि मुंबई- पुणे मिसिंग लिंक प्रकरणावरुन,  सत्ताधाऱ्यांवर टीका करत असताना आरजे मलिष्काच्या गाण्याचा उल्लेख केला.

आर.जे मलिष्कावर राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? (Raj Thackeray on RJ Malishka)

एकीकडे पाऊस पडल्यामुळे मुंबईतील काही भाग तुंबले आहेत. तर, दुसरीकडे काही दिवसांपूर्वी लोकार्पण झालेल्या मुंबई - पुणे मिसिंग लिंकचे, मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.  6 जुलै रोजी दरड कोसळली. स्लॅब पडल्यानंतर माती तसेच पाण्याचा लोंढा थेट मिसिंग लिंकवर पडला. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या प्रकरणी सत्तेतील मंत्री 'ही गोष्ट नैसर्गिक आहे, यात राजकारण करु नका', असं त्यांनी म्हटलं होतं. 

आपल्या भाषणात राज ठाकरे म्हणाले की, '2005 ला मुंबई तुंबली होती. 1000mm पाऊस पडला होता. त्यावेळी मुंबईची भयंकर हालत झाली होती. आता 300-350 पाऊस पडला आहे.  मुंबई तशीच तुंबलेली. तेव्हा वारेमाप आरोप करायचे, वाटेल ते बोलायचे.  पैसे खाल्ले, भ्रष्टाचार केला,  तेव्हा वाटतं राजकारण नव्हतं. आता मुंबई तुंबली, तर म्हणतात नैसर्गिक आहे', असं राज ठाकरे म्हणाले.  

आर.जे मलिष्काचा आपल्या भाषणात उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, 'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाही काय?  असं म्हणणारी आता कुठे गेली?' या प्रश्नावर उत्तर देताना उपस्थितांमधील एका महिलेनं, 'मलिष्काने आणखी एक नवीन व्हिडीओ तयार केला आहे', असं सांगितलं. दरम्यान, यावर राज ठाकरे यांनी, 'नवीन व्हिडीओ तयार केला आहे,  चांगलं आहे.  म्हणजे ती कुणाला वाहिलेली नाहीये', असं राज ठाकरे म्हणाले. 'जेव्हा ती  अशा प्रकारची गाणी गात होती, तेव्हा सुख घेतलं. आता  दुसरे जेव्हा बोलायला लागले तेव्हा त्रास व्हायला लागला', असंही राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'आमची कोणतीही चूक नाही'; अरबाज शेखच्या गंभीर आरोपांवर नोबल हॉस्पिटलची पहिली प्रतिक्रिया

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Spider-Man Box Office Collection Day 1: पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
Mahavtar vicky Kaushal:'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
Marathi Movie: इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
Bramayugam National Award Film: 25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 'या' ब्लॅक अँड व्हाइट हॉरर फिल्मसाठी 74 वर्षांच्या अभिनेत्यानं पटकावलेला नॅशनल अवॉर्ड
25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 74 वर्षांच्या अभिनेत्याची ब्लॉकबस्टर फिल्म, पाहिलीय का?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
Embed widget