एक्स्प्लोर

Pushkar jog : 'मराठी सिनेमा मराठी प्रेक्षकांच्या प्राधान्यक्रमातच नाही...', पुष्कर जोगने व्यक्त केली खंत

Pushkar jog : मराठी सिनेमांना प्रेक्षक येत नाही, अशी खंत अभिनेता पुष्कर जोग याने एबीपी माझासोबत बोलताना व्यक्त केली आहे.

Pushkar jog : मराठी सिनेमांना मराठी प्रेक्षक येत नाही अशी खंत कलाकारांकडून नेहमीच व्यक्त केली जाते. त्याचप्रमाणे मराठीत चांगल्या पठडीतले सिनेमे फार कमी येतात, असा तक्रारीचा सूर मराठी प्रेक्षकांचा असतो. त्यामुळे प्रेक्षकांची तक्रार आणि कलाकारांची खंत हा कायमच चर्चेचा विषय ठरतो. अनेकदा कलाकार यावर त्यांचं स्पष्ट मतंही व्यक्त करतात. नुकतच अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) यानेही 'एबीपी माझा'सोबत बोलताना यावर त्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. 

पुष्कर जोगचा  धर्मा : द एआय स्टोरी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने पुष्करने नुकतच एबीपी माझासोबत संवाद साधला. पुष्कर या सिनेमाचा निर्माता असून त्यानेच दिग्दर्शनही केलं आहे. तसेच या सिनेमात त्याची महत्त्वाची भूमिका देखील आहे. पुष्करचा हा सिनेमा 25 ऑक्टोबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 

'मराठी प्रेक्षक दोन्हीकडून बोलतात'

मराठी सिनेमे एका पठडीच्या बाहेर जाणार नाही, असं प्रेक्षकांना वाटतं यावर तुझं मत काय असा प्रश्न पुष्करला विचारण्यात आला. त्यावर पुष्करने म्हटलं की,हो... असं आहे..मराठी प्रेक्षक दोन्हीकडून बोलतात. एकतर ते बोलतात प्रेक्षक नवीन काही देत नाही आणि दुसरीकडे त्यांना नवीन काही दिलं तर ते थिएटरमध्ये जाऊन पाहत नाहीत. काय होतं मराठी सिनेमा मराठी प्रेक्षकांच्या प्राधान्यक्रमात नाहीये. कारण बॉलिवूड आहे, दाक्षिणात्य सिनेमे आहेत.. नाटकाविषयी त्यांचं प्रेम आहे.. नाटकं हाऊसफुल्ल होतात.पण ते थिएटरमध्ये येत नाहीत. बॉलिवूडला माहितेय की महाराष्ट्र त्यांचा गड आहे. पुढच्या आठवड्यात दोन मोठे हिंदी सिनेमे येत आहेत. पण मग मराठी सिनेमे दिवळीत काय येत नाहीत? आपल्या महाराष्ट्रात, आपल्या मुंबईत हिंदीवाल्यांना आपण जास्त भाव देतो. 

हा माझ्यासाठी हार्टब्रेक - पुष्कर जोग

'दुतोंडी वागणारी लोकं आपल्याकडे खूप आहेत आणि हे ट्रोल वैगरे करणाऱ्या लोकांची जातच वेगळी आहे. मराठी अस्मिता वैगरे तेव्हाच बोला तुम्ही जेव्हा तुम्ही खरंच मराठीला पाठिंबा देताय. त्यामुळे माझ्यासाठी हे हार्टब्रेक आहे, की माझा सिनेमा प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन पाहत नाहीत.एक मराठी मुलगा मराठी प्रेक्षकांसाठी सातत्याने एक सिनेमे बनवून रिलीज करतोय आणि ते पाहायला तुम्ही थिएटरमध्ये नाही आलात तर माझ्यासाठी तो हार्टब्रेक आहे', असं म्हणत पुष्करने त्याची खंत व्यक्त केली आहे. 

ही बातमी वाचा : 

Swara Bhaskar : 'तुमच्या पदरी निराशा येणार नाही', नवऱ्याला उमेदवारी जाहीर होताच स्वरा भास्करची शरद पवारांसाठी खास पोस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सिद्धी कदम, 26 वर्षीय यंग, स्कॉलर तरुणी शरद पवारांची उमेदवार; महिलांचे प्रश्न मांडणार, दिग्गजांशी भिडणार
सिद्धी कदम, 26 वर्षीय यंग, स्कॉलर तरुणी शरद पवारांची उमेदवार; महिलांचे प्रश्न मांडणार, दिग्गजांशी भिडणार
Madhurimaraje Chhatrapati : कोल्हापूर उत्तरमध्ये मधुरिमाराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब; राजेश लाटकरांची उमेदवारी रद्द करण्याची 'नामुष्की'
कोल्हापूर उत्तरमध्ये मधुरिमाराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब; राजेश लाटकरांची उमेदवारी रद्द करण्याची 'नामुष्की'
Shrinivas Vanga :  श्रीनिवास वनगांचे रडतानाचे व्हिडीओ पाहिले, उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तातडीनं वनगांच्या घरी पाठवलं अन् ...
श्रीनिवास वनगांचे रडतानाचे व्हिडीओ पाहिले, उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तातडीनं वनगांच्या घरी पाठवलं...
महादेव जानकर महायुतीतून बाहेर, तरीही भाजपनं रासपसह मित्रपक्षांना चार जागा सोडल्या, आठवले, राणा अन् कोरेंसाठी गुड न्यूज
महायुतीच्या जागावाटपात भाजपची मित्रपक्षांसह दीडशे जागांवर घौडदौड, आठवले, राणा अन् कोरेंना जागा सोडल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 28 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaMilind Deshmukh Nanded |... त्यामुळे आम्ही बंड करत आहोत, मिलिंद देशमुखांची प्रतिक्रियाSpecial Report Vidhan Sabhaजोरदार शक्तिप्रदर्शन, मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्जSharad Pawar Group 4th List : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर, 7 उमेदवारांचा समावेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सिद्धी कदम, 26 वर्षीय यंग, स्कॉलर तरुणी शरद पवारांची उमेदवार; महिलांचे प्रश्न मांडणार, दिग्गजांशी भिडणार
सिद्धी कदम, 26 वर्षीय यंग, स्कॉलर तरुणी शरद पवारांची उमेदवार; महिलांचे प्रश्न मांडणार, दिग्गजांशी भिडणार
Madhurimaraje Chhatrapati : कोल्हापूर उत्तरमध्ये मधुरिमाराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब; राजेश लाटकरांची उमेदवारी रद्द करण्याची 'नामुष्की'
कोल्हापूर उत्तरमध्ये मधुरिमाराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब; राजेश लाटकरांची उमेदवारी रद्द करण्याची 'नामुष्की'
Shrinivas Vanga :  श्रीनिवास वनगांचे रडतानाचे व्हिडीओ पाहिले, उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तातडीनं वनगांच्या घरी पाठवलं अन् ...
श्रीनिवास वनगांचे रडतानाचे व्हिडीओ पाहिले, उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तातडीनं वनगांच्या घरी पाठवलं...
महादेव जानकर महायुतीतून बाहेर, तरीही भाजपनं रासपसह मित्रपक्षांना चार जागा सोडल्या, आठवले, राणा अन् कोरेंसाठी गुड न्यूज
महायुतीच्या जागावाटपात भाजपची मित्रपक्षांसह दीडशे जागांवर घौडदौड, आठवले, राणा अन् कोरेंना जागा सोडल्या
माढ्यात शरद पवारांचं धक्कातंत्र, राष्ट्रवादीकडून अभिजीत पाटलांना एबी फॉर्म; मतदारसंघात चुरशीची लढत
माढ्यात शरद पवारांचं धक्कातंत्र, राष्ट्रवादीकडून अभिजीत पाटलांना एबी फॉर्म; मतदारसंघात चुरशीची
Shrinivas Vanga Crying : एकनाथ शिंदेंनी तिकीट कापलं, आमदार ढसाढसा रडला; म्हणाला, उद्धव ठाकरे देव, त्यांची माफी मागायचीय
एकनाथ शिंदेंनी तिकीट कापलं, आमदार ढसाढसा रडला; म्हणाला, उद्धव ठाकरे देव, त्यांची माफी मागायचीय
संभाजीनगरमध्ये नवा ट्विस्ट, जाहीर उमेदवाराकडून गद्दारी; ठाकरेंनी केली कारवाई, नवा उमेदवार
संभाजीनगरमध्ये नवा ट्विस्ट, जाहीर उमेदवाराकडून गद्दारी; ठाकरेंनी केली कारवाई, नवा उमेदवार
2019 ला मंत्री, संपत्ती 11 कोटी; 2024 ला मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंची संपत्ती किती, किती पटीने वाढली?
2019 ला मंत्री, संपत्ती 11 कोटी; 2024 ला मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंची संपत्ती किती, किती पटीने वाढली?
Embed widget