एक्स्प्लोर

Punjabi Singer Inder Kaur: गन पॉईंटवर किडनॅप केलं, 6 दिवस बेपत्ता असलेल्या सुप्रसिद्ध गायिकेचा दुर्दैवी अंत, कालव्यात सापडला मृतदेह

Punjabi Singer Inder Kaur Found Dead: कॅनडाहून आलेल्या एका व्यक्तीनं इंदर कौरला लग्नाची मागणी घातलेली, पण तिनं त्याला नकार दिल्यामुळे त्यानंच तिचा जीव घेतल्याचा आरोपही कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. 

Punjabi Singer Inder Kaur Found Dead: मंनोरंजन विश्वातून (Entertainment World) एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. या बातमीनं सर्वांना हादरवून सोडलं आहे. सुप्रसिद्ध पंजाबी गायिका (Punjabi Singer) इंदर कौर (Inder Kaur) उर्फ यशइंदर कौर हिची हत्या करण्यात आली आहे. सहा दिवस बेपत्ता असलेल्या  इंदर कौर (Punjabi Singer Inder Kaur) हिचा मृतदेह 19 मे रोजी सकाळी लुधियानाजवळील (Ludhiana) नीलो कालव्यात आढळून आला. 29 वर्षांची इंदर सहा दिवसांपासून बेपत्ता होती. तिला गन पॉईंटवर किडनॅप करण्यात आल्या आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच, कॅनडाहून (Canada) आलेल्या एका व्यक्तीनं इंदर कौरला लग्नाची मागणी घातलेली, पण तिनं त्याला नकार दिल्यामुळे त्यानंच तिचा जीव घेतल्याचा आरोपही कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. 

सुप्रसिद्ध पंजाबी गायिका इंदर कौर (Famous Punjabi Singer Inder Kaur) हिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मोगा येथील एका व्यक्तीकडून इंदरवर जबरदस्तीनं लग्नासाठी दबाव टाकला जात होता. मात्र, तिनं लग्नास नकार दिल्यानंतर संबंधित व्यक्तीनं तिचं अपहरण केलं. इतकंच नव्हे, तर हा प्रकार घडवल्यानंतर आरोपी कॅनडाला पळून गेल्याचंही कुटुंबीयांचं म्हणणं आहे. तो खास या कटासाठी कॅनडाहून नेपाळमार्गे पंजाबमध्ये आला होता आणि नंतर त्याच मार्गानं फरार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, सुमारे तीन वर्षांपूर्वी इंदरची आरोपीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. मात्र, संबंधित व्यक्ती विवाहित असून त्याला मुलं असल्याचं समजल्यानंतर इंदरनं लग्नास स्पष्ट नकार दिला होता. याच कारणातून आरोपी तिच्यावर राग धरून असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी इंदर कौरचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी समराला येथील शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

इंदर कौर हिची शेवटची पोस्ट (Inder Kaur Last Post)

इंदर कौर हिची शेवटची सोशल मीडिया पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 13 मे रोजी तिनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती ब्राउन रंगाचा शर्ट परिधान करून हातात बॅग घेत पोझ देताना दिसत होती. चाहत्यांनी तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलेला. पण, तिच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर आता त्याच पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये चाहते शोक व्यक्त करत असून वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.

नेटकरी इंदरच्या शेवटच्या फोटोवर कमेंट करत तिला श्रद्धांजली वाहत आहेत. त्याचबरोबर एक प्रश्नही उपस्थित केला जात आहे की, जर इंदरचं सहा दिवसांपूर्वी अपहरण झालं होतं, तर पाच दिवसांपूर्वी ही पोस्ट नेमकी कोणी शेअर केली? काहींच्या मते, ही पोस्ट आधीच शेड्यूल करून ठेवण्यात आली असावी. दरम्यान, पंजाबी मनोरंजविश्वात इंदर कौर खूपच प्रसिद्ध होती. इंदर कौर हिनं 'जीजा', 'किसान एंथम 2', 'देसी सिरे दा', 'जट्ट माइंड', 'नबज जट्टी दी' आणि 'अकड़' यांसारखी अनेक गाणी गायली होती. तिच्या गाण्यांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pune Club: अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या क्लबमध्ये तरूण-तरूणींचे अश्लील चाळे; गर्दीने भरलेल्या ठिकाणी नको ते कृत्य, व्हिडीओ व्हायरल, पुण्यातील पब संस्कृती पुन्हा वादात

महत्त्वाच्या बातम्या

Awarapan 2 Box Office Collection: 'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
Isha Talwar on Tukaram Mundhe: 'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Embed widget