मानसोपचारतज्ज्ञ जो बॉलिवूडमध्ये येताच बनला सुपरस्टार, 5 भाषांमधील सिनेमात काम, स्मिता पाटीलचा हिरो
psychiatrist turned superstar in bollywood : आज आम्ही तुम्हाला 80-90 च्या दशकातील एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, जो प्रथम मानसोपचारतज्ज्ञ बनला आणि नंतर चित्रपटांमध्ये अभिनय करून सर्वांना वेड लावले.

psychiatrist turned superstar in bollywood : कार्तिक आर्यन, कृति सेनन असे अनेक कलाकार आहेत, जे इंजिनीअरिंग करून मग चित्रपटसृष्टीत आले. मात्र एखाद्या डॉक्टरने सिनेमात काम केलं आहे, असं फारसं ऐकायला मिळत नाही. आजच्या काळात पाहिलं तर असं कुणाचं नाव आठवणं कठीण आहे. पण आज आम्ही तुम्हाला 80-90 च्या दशकातील अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, जो आधी मानसोपचारतज्ज्ञ होता आणि नंतर सिनेमात अभिनय करून सर्वांचं लक्ष वेधलं. विशेष म्हणजे, या अभिनेत्याने अभिनेत्री स्मिता पाटीलसोबत रोमांसदेखील केला आहे. चला तर मग त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
महाराष्ट्रात झाला होता मोहन आगाशे यांचा जन्म
इथे आपण मोहन आगाशे यांच्याबद्दल बोलत आहोत, ज्यांचा जन्म भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी 23 जुलै 1947 रोजी महाराष्ट्रातील एका छोट्या गावात झाला. लहानपणापासूनच ते अभ्यासात खूप हुशार होते. त्यांनी प्राथमिक आणि उच्च शिक्षण पुण्यातच पूर्ण केलं. बी.जे. मेडिकल कॉलेजमधून त्यांनी MBBS ची पदवी घेतली होती. त्या काळात MBBS मिळवणं ही खूप मोठी गोष्ट मानली जात होती. मात्र, MBBS केल्यानंतर मोहन आगाशे यांनी मानसशास्त्रात (सायकेट्री) पदव्युत्तर शिक्षण घेतलं. या काळातच त्यांची रसिकता अभिनयाकडे वाढली.
सायकेट्रिस्ट म्हणून करिअर सुरू करतानाच त्यांनी अभिनयही सुरू केला होता. मराठी, हिंदी, बंगाली, तमिळ आणि मल्याळम अशा अनेक भाषांतील चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. या सर्व भाषांतील त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.
स्मिता पाटीलसोबत केली आहे रोमँटिक भूमिका!
स्मिता पाटील आणि मोहन आगाशे यांनी एकत्र मराठी चित्रपट "जैत रे जैत" मध्ये काम केलं होतं. या चित्रपटात दोघांचाही अभिनय प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरला होता. हा चित्रपट 1977 मध्ये जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केला होता. दोघांच्याही करिअरसाठी ही एक महत्त्वाची फिल्म ठरली. हा चित्रपट ठाकर आदिवासी समाजाच्या जीवनशैलीवर आणि त्यांच्या संघर्षावर आधारित होता. स्मिता पाटील यांनी ‘चिंधी’ नावाच्या एका बिनधास्त स्त्रीची भूमिका साकारली होती, जी आपल्या नवऱ्याला सोडते. तर मोहन आगाशे यांनी ‘नाग्या’ नावाच्या मध गोळा करणाऱ्या माणसाची भूमिका केली होती. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती.
भूकंपग्रस्तांच्या मानसिक स्थितीवर अभ्यास
1993 मध्ये लातूरमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाच्या वेळी ‘इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च’ ने मोहन आगाशे यांच्यावर भूकंपग्रस्तांच्या मानसिक स्थितीवर अभ्यास करण्याची जबाबदारी सोपवली होती. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी AIIMS मध्ये काम केलं नव्हतं. मात्र, पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालयात त्यांनी काम केलं आहे.























