'वर्जिन बायको शोधत बसू नका, 'वर्जिनिटी' एका रात्रीत संपते, अभिनेत्री प्रियांका चोप्राचं वक्तव्य चर्चेत
Priyanka Chopra controversial statement : 'वर्जिन बायको शोधत बसू नका, 'वर्जिनिटी' एका रात्रीत संपते, बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत

Priyanka Chopra controversial statement : बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक अभिनेत्री त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) यामध्ये मागे नाही. तिने अनेकदा बोल्ड स्टेटमेंट दिलेले पाहायला मिळाले आहेत. दरम्यान, आता तिने एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) 'वर्जिनिटी'बद्दल एक स्टेटमेंट दिलंय. ज्यामुळे सोशल मीडियावर तिच्या या वक्तव्याबाबत चर्चा रंगली आहे.
प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) बॉलिवूड पासून हॉलिवूडपर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलंय. प्रियांकाने (Priyanka Chopra) तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेक्षेत्रात वेगळं स्थान निर्माण केलंय. तिच्या अभिनयासोबतचं बेधडक वक्तव्यांसाठी देखील प्रियांका प्रसिद्ध आहे. प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) म्हणाली, वर्जिन बायको शोधत बसू नका. अशी बायको शोधा जिचं आचरण चांगलं असेल.. 'वर्जिनिटी' एका रात्रीत संपते, मात्र तिचं आचरण कायमस्वरुपी राहात असतं.
प्रियांका चोप्राच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. काही नेटकऱ्यांनी प्रियांका चोप्राचं समर्थन केलंय. तर काहींनी तिचं ट्रोलिंग करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने म्हटलं की, तर मग तुम्ही नवऱ्याची संपत्ती आणि कमाई पाहू नका. त्याचं आचरण चांगला स्वभाव पाहा... पैसा काय आहे? तो एका दिवसात संपू शकतो, त्याचं आचरण आपल्यासोबत आयुष्यभर राहाणार असतं. तर दुसऱ्या यूजरने लिहिलं की, जर एखाद्या मुलीचं आचरण चांगलं असेल तर तसंही ती वर्जिनचं असेल..
View this post on Instagram
प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री असून, तिने बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मिस वर्ल्डचा किताब जिंकून सुरु झालेली तिची कारकीर्द आज जगभर प्रसिद्ध आहे. 2025 हे वर्ष तिच्या करिअरसाठी अनेक नव्या सुरुवातींचं वर्ष ठरू पाहत आहे. यावर्षी तिने चित्रपटसृष्टीत अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले असून, काही मोठ्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका बजावण्याची संधी तिला मिळाली आहे. प्रियांकाचा एक महत्वाचा चित्रपट म्हणजे "द ब्लफ". हा चित्रपट 19व्या शतकातील कॅरिबियन समुद्रात घडतो, ज्यामध्ये ती एका स्त्री समुद्रदस्यूच्या भूमिकेत झळकते. ही भूमिका तिच्या अॅक्शन आणि अभिनय कौशल्यांची चाचणी घेणारी आहे. हा चित्रपट 10 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित होणार असून, त्यावर चाहत्यांचं लक्ष आहे. तिचा दुसरा महत्वाचा प्रकल्प म्हणजे "हेड्स ऑफ स्टेट". या अॅक्शन-कॉमेडी शैलीतील चित्रपटात ती प्रसिद्ध हॉलीवूड कलाकार जॉन सिना आणि इद्रिस एल्बा यांच्यासोबत दिसणार आहे. 2 जुलै 2025 रोजी हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होईल. या चित्रपटात विनोद आणि अॅक्शन यांचा सुरेख संगम पाहायला मिळणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























