Priya Bapat Latest News : लग्नाला 13 वर्ष झाली, गुड न्यूज कधी देणार? प्रेग्नेंसीच्या प्रश्नावर प्रिया बापटने मौन सोडले, म्हणाली, हा प्रश्न...
Priya Bapat : उमेश कामतसोबत तिने 13 वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली. या मराठीतील लोकप्रिय असलेल्या जोडप्याला अद्याप बाळ नाही. त्यावरून अनेकदा प्रियाला विचारणा होत असते. या प्रश्नावर प्रिया बापटने मौन सोडले आहे.
Priya Bapat : मराठी रंगभूमी, सिनेसृष्टीतही हिंदीत अभिनेत्री प्रिया बापटने (Priya Bapat) आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनेता उमेश कामतसोबत (Umesh Kamat) तिने 13 वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली. या मराठीतील लोकप्रिय असलेल्या जोडप्याला अद्याप बाळ नाही. त्यावरून अनेकदा प्रियाला विचारणा होत असते. या प्रश्नावर प्रिया बापटने मौन सोडले आहे. एका मुलाखतीत बोलताना प्रियाने बाळाबद्दल स्पष्टच उत्तर दिले.
हॉटर फ्लायच्या मुलाखतीत प्रियाला बाळाबद्दलच विचारण्यात आलेल्या प्रश्नाला कसा हाताळतेस असे विचारण्यात आले. त्यावर प्रियाने म्हटले की, तुमचं लग्न झालं असेल आणि तुम्हाला बाळ असेल तरंच तुमचं आयुष्य पूर्ण होतं, असं लोकांना का वाटतं? असा सवाल तिने केला. ज्या जोडप्याला मुलं नकोत आणि त्या आनंदी आहेत, तरी त्यांना त्यांचं आयुष्य पूर्ण आहे, असे वाटत असल्याचे प्रियाने म्हटले.
View this post on Instagram
प्रियाने आपल्या मुलाखतीत पुढे म्हटले की, आमच्या कपल फोटोवर बाळाबद्दल विचारणाऱ्या कमेंट्स असतात. उमेशच्या फोटोवर या कमेंट्स नसतात, अर्थात मी महिला असल्याने ही अपेक्षा माझ्याकडून आहे. पण मला जेव्हा वाटेल की बाळ हवंय, तेव्हा मी करेन, जर मला बाळ नको असेल तर मी नाही करणार असेही प्रियाने स्पष्ट म्हटले.
View this post on Instagram
View this post on Instagram
काकू, माझ्या आईने मला कधीच
प्रिया बापटने याच मुलाखतीत एक किस्सा सांगितला. एका नाटकाच्या प्रयोगानंतर एका महिला प्रेक्षकाने प्रियाची भेट घेतली आणि गुड न्यूजबद्दल विचारले. त्यावर प्रियाने आताच मला अॅवार्ड मिळाला, अजून किती गुड न्यूज देऊ असे विचारले. त्यावरही त्या महिला प्रेक्षकाने सतत बाळाबद्दल विचारणा केली. त्यानंतर प्रियाने त्यांना काकू, मला माझ्या आईनेदेखील हा प्रश्न कधीच विचारला नाही. त्यामुळे तुम्हीदेखील हा प्रश्न विचारू नका असे प्रियाने सांगितले.