एक्स्प्लोर

Dhishkyaoon Movie : 'प्रेम नको, काळजावर वार नको' म्हणत 'ढिशक्यांव' चित्रपटाचा टिझर रिलीज; 10 फेब्रुवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

Dhishkyaoon Marathi Movie : प्रथमेश परबचा 'ढिशक्यांव' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला.

Dhishkyaoon Marathi Movie : 'ढिशक्यांव' चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि तेव्हापासून या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. विनोद आणि प्रेम यांचं उत्तम समीकरण साधत प्रथमेश परब (Prathamesh Parab) अभिनित 'ढिशक्यांव' (Dhishkyaoon) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रेक्षकांच्या उत्सुकतेला पूर्णविराम देत चित्रपटाचा टिझर भेटीस आला आहे. चित्रपटाचा टिझर हा आणखीनच गोंधळात पाडणारा आहे. कारण टिझरमध्ये पाहता प्रथमेश प्रेमापासून दूर राहायचे सल्ले देताना दिसतोय आता खरंच चित्रपटात प्रेमापासून दूर राहिलेला प्रथमेश पाहायला मिळणार की हे काही खास गुपित आहे याचा उलगडा 10 फेब्रुवारी 2023 ला होणार हे पाहणे रंजक ठरेल. 

दिग्दर्शक प्रितम एस के पाटील दिग्दर्शित 'ढिशक्यांव'' हा चित्रपट निर्माते महोम्मद देशमुख, उमेश विठ्ठल मोहळकर आणि प्रितम एसके पाटील यांनी निर्मित केला असून चित्रपटाची प्रस्तुती एव्हीके एंटरटेनमेंट (AVK Entertainment), अमोल कागणे, प्रणित वायकर यांनी केली आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक प्रितम एस के पाटील यांनी उत्तमरीत्या पेलली आहे. चित्रपटाचे सहनिर्माते म्हणून राजीव पाटील, राहुल जाधव आणि उमाकांत बरदापुरे यांनी बाजू सांभाळली आहे. प्रितम एस के पाटील यांनी दिग्दर्शक आणि निर्माता अशी दुहेरी भूमिका या चित्रपटासाठी साकारली आहे. चित्रपटाची कथा, संवाद, स्क्रीनप्ले लेखक संजय नवगिरे लिखित आहे. तर संपूर्ण चित्रपट योगेश कोळी यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे, संकलक सौमित्र धरसुरकर याने चित्रपटाच्या संकलनाची बाजू उत्तमरीत्या पेलवली आहे. तर चित्रपटात साऊंडची जबाबदारी स्वरूप जोशी याने अचूक सांभाळली आहे. तर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून संतोष खरात यांनी बाजू सांभाळली. चित्रपटात कॉस्च्युमची जबाबदारी अपेक्षा गांधी सोनी, मेकअपची जबाबदारी कुमार मगरे यांनी पेलवली. तर प्रथमेश परब सोबत या चित्रपटात संदीप पाठक, अहेमद देशमुख, सुरेश विश्वकर्मा, मेघा शिंदे या कलाकारांना पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. 

पाहा व्हिडीओ : 

'ढिशक्यांव' चित्रपटाचा टिझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे, कारण गोंधळात पाडणाऱ्या या टिझरने ही उत्सुकता ताणली आहे, आता  जास्त विलंब न करता येत्या 10 फेब्रुवारी 2023 ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

Dhishkyaoon Marathi Movie : प्रथमेश परब चढणार बोहल्यावर? 'ढिशक्यांव' चित्रपटात दिसणार लग्नसोहळ्याची धमाल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
Embed widget