Prathamesh Parab : 'आजही ते सायकलवरुनच कामाला जातात', अभिनेता प्रथमेश परबची वडिलांसाठी स्पेशल पोस्ट
Prathamesh Parab : अभिनेता प्रथमेश परब याने फादर्स डे निमित्त त्याच्या वडिलांसाठी एक खास पोस्ट केली आहे.
Prathamesh Parab : आयुष्यात जितकं महत्त्वाचं आईचं स्थान असतं तितकंच ते वडिलांचं सुद्धा असतं. बऱ्याचदा वडिलांविषयीच्या भावना या अव्यक्तच राहतात. पण तरीही त्या भावनांची किंमत ही फार मोलाची असते. आज रविवार 16 जून रोजी फादर्स डे साजरा करण्यात आला आहे. यानिमित्ताने अनेकांनी त्यांच्या वडिलांसाठी खास पोस्ट केलीये. अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab), मंजिरी ओक, सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) या सगळ्यांनीच त्यांच्या वडिलांसोबतचे खास क्षण या निमित्ताने शेअर केले आहेत.
सोशल मीडियावर अनेकांनी वडिलांसाठीच्या पोस्ट लिहिल्या आहेत. त्यामध्ये आपले मराठी कलाकारही मागे राहिले नाहीत. कुणी बाबांसाठी तर कुणी बाबा म्हणून पोस्ट शेअर केल्यात. अभिनेता प्रथमेश परबने त्याच्या वडिलांसाखी एक खास पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्याने त्याच्या वडिलांविषयीच्या भावना देखील व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय.
प्रथमेश परबने केली वडिलांसाठी खास पोस्ट
प्रथमेशने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं की, गेल्या काही वर्षांत खूप काही बदललं. वेगवेगळे सिनेमे, त्यातील characters, कथा, तुम्हाला माणूस म्हणूनही घडवत असतात. चाळीमधून फ्लॅट system मध्ये shift झालो, swift ची जागा Creta ने घेतली. Lifestyle upgrade होत असली तरी काही गोष्टींची पाळंमुळं आपल्यात कायम रुजू द्यावी हे मात्र मी माझ्या बाबांकडून शिकतोय. गेली 30 ते 35 वर्षे ते सायकल चालवतात. अजूनही ऑफिसला ते सायकलने जातात. काम करत रहावं, माणूस आपोआप fit रहातो असं त्यांचं म्हणणं.बाबा, तुम्ही आयुष्यभर असेच fit आणि आनंदी रहा याच father's Day च्या शुभेच्छा.
View this post on Instagram
प्रथमेश परबबद्दल जाणून घ्या...
प्रथमेश परब हा मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. 'बालक पालक', 'टाइमपास', 'टकाटक' अशा अनेक सिनेमांत प्रथमेशने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. त्याने साकारलेला दगडू हा मात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चाहत्यांना आता प्रथमेशच्या लग्नाची प्रतीक्षा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.