एक्स्प्लोर

वाढदिवशी श्रेयस तळपदेची मोठी घोषणा; माझी तुझी रेशीमगाठची लोकप्रिय जोडी आता मोठ्या पडद्यावर

Maazi Tuzhi Reshimgaath Trio Reunites on Big Screen: ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र. प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदे आणि मायरा वायकुळ ‘मर्दिनी’ चित्रपटात झळकणार

Prarthana Behere Shreyas Talpade and Myra Vaikul Come Together Again: काही टीव्ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर तयार करतात. मालिका संपली तरीही त्यातील पात्र प्रेक्षकांच्या मनात जिवंत असतात. काही मालिका आपल्या घराशी जोडली जातात. अशीच एक झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं होतं. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील पात्रांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळालं होतं.  या मालिकेत प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत होते. तर, बालकलाकार मायरा वायकुळला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. या मालिकेतील सर्व पात्र प्रचंड गाजली. ही मालिका बंद होताच प्रेक्षकांचा हिरमोड झाला.  दरम्यान, या मालिकेतील पात्रांबाबत एक मोठी  अपडेट समोर येत आहे.  प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदे आणि मायरा वायकुळ हे तिघं  पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. छोट्या पडद्यावर नसून, ही जोडी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ'  या मालिकेतील तीन पात्र लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. तिघांची ही केमिस्ट्री पुन्हा एकदा मोठ्या  पडद्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्रेयस तळपदेच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर नुकताच लाँच करण्यात आला आहे. श्रेयसचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर लाँच करण्यात आला आहे.  मर्दिनी असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव  असून, या चित्रपटातून  नारी सामर्थ्याची गाथा  दाखवण्यात येणार आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

श्रेयस तळपदे प्रस्तूत अॅफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि ओ डी आय ग्रुप बॅनरखाली हा चित्रपट तयार  करण्यात येणार आहे.   मर्दिनी हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून,  हा सिनेमा 3  जुलै 2026 रोजी  प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाचा पोस्टर सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या पोस्टरमधून एक ठाम पावलाचं उग्र रूप आणि ज्वालांनी वेढलेलं मर्दिनी हे नाव पाहायला मिळत आहे.   या पोस्टरवरून या चित्रपटाची कथा नेमकं कोणत्या कथेवर आधारीत असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.  

मर्दिनी या चित्रपटात प्रार्थना बेहेरे,  जितेंद्र जोशी, अभिजीत खांडकेकर, राजेश भोसले  यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकतील.  मुख्य म्हणजे बालकलाकार मायरा वायकुळ देखील प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याची माहिती आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय  मयेकर यांनी केले असून, दिप्ती तळपदे यांच्या निर्मिकीखाली हा  चित्रपट साकारण्यात येत आहे. दरम्यान, पोस्टर रिलीज होताच या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
OTT Webseries: Netflix वर 6 एपिसोडच्या वेबसीरिजचा धुमाकूळ, रिलीज होताच नं -1 ला ट्रेंडिंग; देशभक्ती जागवणारा जबरदस्त थरार, Must Watch
Netflix वर 6 एपिसोडच्या वेबसीरिजचा धुमाकूळ, रिलीज होताच नं -1 ला ट्रेंडिंग; देशभक्ती जागवणारा जबरदस्त थरार, Must Watch
Prajakta Mali on Pravin tarde: प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?
प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?

व्हिडीओ

Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: कडेगावहून विट्याकडे येताना जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्याचा अपघात; स्वागत नाकारून जरांगे थेट रुग्णालयात दाखल
Maharashtra Live blog updates: कडेगावहून विट्याकडे येताना जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्याचा अपघात; स्वागत नाकारून जरांगे थेट रुग्णालयात दाखल
Embed widget