एक्स्प्लोर

Prajakta Hanamghar on Trolling: 'बघतो तू कशी उभी राहतेस' एका कवितेमुळे लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचं प्रचंड ट्रोलिंग, धमक्यांना बेधडक भिडली, म्हणाली 'समोर येऊन तर बघा..'

'बायका बोलायला लागणार हे समाजाच्या आणि इथले जे व्यवस्थापक आहेत त्यांच्या कुणाच्याही सोयीच नाही. हे कायमच प्रस्थापितांसाठी सोपं असतं ते श्रमजीवींसाठी आंदोलन असतं. असंही ती म्हणाली.

Marathi Actress Prajakta Hanamghar Trolling: मराठी मनोरंजनसृष्टीत भूमिका घेणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत असताना मराठी मालिका, सिनेमांमध्ये दिसणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता हनमघार (Prajakta Hanamghar) सध्या तिच्या एका कवितेमुळे ट्रोल होत आहे. एका पुरस्कार सोहळ्यात एका कवितेतून 'हुकूमशहांची अवस्था, हुकूमशहा कसे जन्माला येतात कसे मारले जातात',या आशयावरील एक कविता म्हटली. त्यानंतर तिचं ट्रोलिंग होऊ लागलंय. तिला अनेक धमक्या येऊ लागल्यात. या सगळ्या ट्रेलर्सला ही अभिनेत्री बेधडकपणे भिडलीय. 'विद्रोह माझ्या रक्तात आहे. तुमच्या चार -दोन धमक्यांना मी घाबरेन अशी अपेक्षाही करू नका..' असं म्हणत तिने ट्रोलर्सला सुनावलंय. तिला येणाऱ्या धमक्या आणि ट्रॉलिंगवर इंडस्ट्रीतला लोकांनी काय प्रतिक्रिया दिला याविषयीही ती बोलली आहे. ' Wide Angle विथ प्रशांत कदम'ला मुलाखत देताना ती बोलत होती.

काय म्हणाली अभिनेत्री प्राजक्ता हनमघार?

अभिनेत्री प्राजक्ता हनमघार कायम तिचा स्पष्टवक्तेपणामुळेही ओळखली जाते. जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांनंतर एका कवितेतून ती व्यक्त झाली. त्यावरून तिचं ट्रॉलिंग सुरू झालंय. तिला तुझं काम थांबवू अशा धमक्या येऊ लागल्या. तू कशी वर जातेस बघूच अशाही स्वरूपाच्या काही धमक्या आल्या. तिने घेतलेल्या भूमिकेवरून ट्रोलिंग होत असलं तरी त्यावर ती म्हणाली ' जेव्हा ट्रॉलिंग होतं तेव्हा एक स्त्री म्हणून जो अपमान सहन करावा लागतो तो अनेकदा तीव्र असतो आधी. नंतर हे लोक एकेक पायरी उतरायला लागतात. पहिल्यांदा ते लोक तुम्हाला समजावतात.की ' कशाला करतेस हे, तू तुझं तुझं बघ ', यावर तुम्ही ऐकलं नाहीत तर ते म्हणतात, की हिची काम कमी झाली असतील.हीच ग्लॅमर कमी झाला असेल. आता हिला कोण विचारत नसेल. स्त्रीच्या बाबतीत शेवटची पायरी ही चारित्र्यहनन असते. त्यांना असं वाटतं की ही घाबरेल, गप्प बसेल, आपण तिचा आवाज कसा दाबला, तुमच्याबद्दल आपण कसं बोललो. तुमच्या सगळ्यांच्या डीपीला महापुरुषांचे फोटो आहे. देवी देवतांचे फोटो आहेत.तुम्ही स्वतःला संस्कृतीचे ठेकेदार म्हणवतात, आणि ही भाषा वापरता ! तुम्हाला जर असं वाटतंय की या भाषेला आत्ताच्या बायका किंवा मुली घाबरतील, तर हा तुमचा भेकडपणा आहे.' असं प्राजक्ता म्हणाली.

ट्रोलिंगवर, धमक्यांवर बिनधास्त भिडली प्राजक्ता

ती पुढे म्हणाली ' मला ज्या पद्धतीचे ट्रॉलिंग गेल्या काही दिवसात अनुभवायला मिळालं, गेल्या चार दिवसात ...मला असं वाटलं की एखाद्या कमकुवत मनाची बाई किंवा पुरुष असेल तर त्याचं काय होईल!ती व्यक्ती आत्महत्येपर्यंत जाऊ शकते हे सगळं वाचून. म्हणजे काय पद्धतीने तुम्ही ट्रोल करताय..जितकं ट्रोल झालं, तितकच मला सकारात्मक प्रतिसादसुद्धा मिळाला. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गाव खेड्यातून मिळाला.भारतातून मिळाला, भारताबाहेरूनही मिळाला. काही लोकांनी मला फोन केले, काहींनी माझ्यासाठी लेख लिहिले.' असं ती म्हणाली. संस्कृती संस्कृती म्हणजे काय असेल, आपल्याबरोबर दुसऱ्याच्या मनाचा विचार करणे, त्याचा वेदनाची जाणीव असणं ही संस्कृती आहे.

'बायका बोलायला लागणार हे समाजाच्या आणि इथले जे व्यवस्थापक आहेत त्यांच्या कुणाच्याही सोयीच नाही. हे कायमच प्रस्थापितांसाठी सोपं असतं ते श्रमजीवींसाठी आंदोलन असतं. तुमच्यासाठी ती बंडखोरी असू शकते यांच्यासाठी ती खूप बेसिक गोष्ट आहे. काय धमक्या देताय तुम्ही मला की तुझं काम कमी होईल, काय धमक्या देत आहे तुम्ही मला की आम्ही बघतो तू कशी उभी राहशील..तू कशी बोलशील पुढे..यातलं कुणीतरी समोर यावं माझ्या.  माझ्या वडिलांनी कडक तयार केलेली मुलगी आहे मी. हा इशारा समजा नाही तर सूचना. मी आ ह साळुंखे यांची मानसकन्या आहे.विद्रोह माझ्या रक्तात आहे. त्यामुळे विचारही करू नका की तुमच्या चार दोन धमक्यांना मी घाबरेल.'

प्राजक्ता हनमघार या कवितेवरून ट्रोल होतेय: लिंक : https://youtube.com/shorts/IE8q1VXDLAY?si=lXb1RinkdaleOZ_-

 

इंडस्ट्रीतून या ट्रोलिंगवर काय होती प्रतिक्रिया?

रोलिंग धमक्या आहे सगळं सुरू असताना, इंडस्ट्रीतून आलेल्या प्रतिक्रियांविषयी बोलताना प्राजक्ता हनमघार म्हणाली, 'अनेक लोक शांत बसले. मोठ्या प्रमाणावर महिला कलाकार शांत होत्या.ज्या एरवी छोट्या मोठ्या महिला कलाकारांच्या प्रश्नांबाबत सुद्धा खूप अतिजागृक असतात, त्या सुद्धा शांत बसल्या. काहीजणांनी मेसेजेस केले. काहींनी पाठिंबा दिला.काही लोकांनी कौतुक केलं. काहींनी असं म्हटलं, आम्हाला उघडपणे तुला समर्थन देता येत नाही पण आम्हाला माहिती आहे तुझी बाजू खऱ्याची आहे.तू पुढे जाशील याची आम्हाला खात्री आहे. आम्हाला आमच्याबद्दल अत्यंत क्यू वाटते की आम्हाला उघडपणे तुला समर्थन देता येत नाही, असेही फोन आल्याचं प्राजक्ताने सांगितलं.

 'बोलणं ही फार नैसर्गिक गोष्ट आहे.आपल्याला आता ती अनैसर्गिक वाटायला लागली आहे.कारण आपण काही गोष्टी न्यू नॉर्मल केल्या.बोलू नका, गप्प बसा, आवाज उठवू नका, आपल्याला काय पडलंय, आपल्या स्वतःपुरतं पाहूयात,या गोष्टींचं प्रमाण इतकं वाढला आहे की आपल्याला आपण साध्या गोष्टींवर व्यक्त होतोय हेही विशेष वाटायला लागला आहे. याचा मला चार-पाच दिवसांपासून प्रचंड खेद वाटतोय. भूमिका घेणा आजची गोष्ट नाही.तू माझ्या स्वभावाचा भाग आहे. वाढीचा आणि संस्कारांचा भाग आहे. असं अभिनेत्री प्राजक्ता हनमघार म्हणाली.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jackie Shroff on Mahesh Manjrekar: 'आता तो मला सिनेमात घेतच नाही'; महेश मांजरेकरांबद्दल जॅकी श्रॉफ काय म्हणाले? मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा केली व्यक्त
'आता तो मला सिनेमात घेतच नाही'; महेश मांजरेकरांबद्दल जॅकी श्रॉफ काय म्हणाले? मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा केली व्यक्त
Madhavi Nimkar Video: मराठी TV इंडस्ट्रीतील ग्लॅमरस अभिनेत्री घरात सारवतेय शेण; पारंपारिक अंदाज पाहून चाहते चकित, VIDEO
मराठी TV इंडस्ट्रीतील ग्लॅमरस अभिनेत्री घरात सारवतेय शेण; पारंपारिक अंदाज पाहून चाहते चकित, VIDEO
Supriya Pilgaonkar New Movie: सुप्रिया पिळगावकरांची मराठी चित्रपटात कमबॅक; आगामी सिनेमाचं नाव काय? कोणता कलाकार मुख्य भूमिका साकारणार?
सुप्रिया पिळगावकरांची मराठी चित्रपटात कमबॅक; आगामी सिनेमाचं नाव काय? कोणता कलाकार मुख्य भूमिका साकारणार?
Dia Mirza on Nawazuddin Siddiqui: 'इतरांशी बोलण्याची शिस्त नाही'; नवाजुद्दीन सिद्दिकीवर दिया मिर्झा बरसली, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन झापलं; कारण काय?
'इतरांशी बोलण्याची शिस्त नाही'; नवाजुद्दीन सिद्दिकीवर दिया मिर्झा बरसली, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन झापलं; कारण काय?
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Silver Rate : चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर रडण्याची वेळ, 10 महिन्यात चांदी 2.56 लाख रुपयांची घसरण, सोने चांदीचे नवे दर जाणून घ्या
चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर रडण्याची वेळ, 10 महिन्यात चांदी 2.56 लाख रुपयांची घसरण
Kolhapur News:
"आडनावापेक्षा गाडीच्या नंबरवरून ओळख!"; कोल्हापूरकरांच्या 'नाद खुळा' फॅन्सी नंबरची राज्यभर चर्चा, नंबरसाठी मोजले तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले
Jaykumar Gore on Satara District Bank Chairman Election 2026: शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, शांतपणे बाहेर चालत आले अन् म्हणाले...
शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, निवडणुकीनंतर बाहेर चालत आले अन् म्हणाले...
Uday Samant on BJP: मी पायाने बांधलेली गाठ हाताने सुटणार नाही; मंत्री उदय सामंतांचा भाजपच्या दादागिरीवरुन टोला
मी पायाने बांधलेली गाठ हाताने सुटणार नाही; मंत्री उदय सामंतांचा भाजपच्या दादागिरीवरुन टोला
Beed Crime News: पहाटेच्या सुमारस पत्नीला डोक्यात दगड घालून संपवलं; शेतात गेला, वाळलेल्या कपाशीला आग लावली अन् त्यात उडी घेतली, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
पहाटेच्या सुमारस पत्नीला डोक्यात दगड घालून संपवलं; शेतात गेला, वाळलेल्या कपाशीला आग लावली अन् त्यात उडी घेतली, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
Eknath Shinde and Shaina NC: सोनिया गांधींच्या पुस्तकाची पानं टराटरा फाडताना शायना एनसींकडून चूक, एकनाथ शिंदेंनी तातडीने बोलावून घेतलं
सोनिया गांधींच्या पुस्तकाची पानं टराटरा फाडताना शायना एनसींकडून चूक, एकनाथ शिंदेंनी तातडीने बोलावून घेतलं
Embed widget