एक्स्प्लोर

Pooja Bhatt On Aamir Khan: 'आम्ही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवून जायचो...'; 'मिस्टर परफेक्शनिस्ट'बाबत पूजा भटनं कोणतेही आढेवेढे न घेता स्पष्टच सांगितलं

Pooja Bhatt On Aamir Khan: पूजा भटनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये आमिर खानसोबतच्या नात्याबद्दल भाष्य केलेलं. आमच्यात नक्कीच एक आकर्षण होतं, असं पूजा भट म्हणाली.

Pooja Bhatt On Aamir Khan: बॉलिवूडमध्ये (Bollywood News) अनेक गाजलेल्या जुन्या सिनेमांची आजही चर्चा रंगते. असाच एक सिनेमा 1991 मध्ये रिलीज झालेला 'दिल है के मानता नहीं' (Dil Hai Ke Manta Nahin Movie). हा सिनेमा आजही अत्यंत लोकप्रिय रोमँटिक सिनेमांपैकी (Romantic Movie) एक मानला जातो. या सिनेमात अभिनेत्री पूजा भट (Pooja Bhatt) आणि आमिर खान (Aamir Khan) मुख्य भूमिकेत झळकलेले. नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना पूजा भट (Pooja Bhatt) हिनं या सिनेमाच्या शुटिंगवेळच्या काही गंमतीशीर गोष्टी सांगितल्या आहेत. पूजा भटनं (Actress Pooja Bhatt) त्या काळातही आमिर आपल्या कामाबाबत इतका गंभीर होता की, त्याच्या 'परफेक्शनिस्ट' स्वभावाची झलक तेव्हाच स्पष्टपणे दिसून येत होती, असं सांगितलं. 

सध्या आमिर खान त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. 5 जुलै रोजी आमिर खान आपली गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट (Girlfriend Gauri Spratt) हिच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. याच पार्श्वभूमीवर पूजा भट हिनं त्याच्याबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. मला आमिर खान खूप आवडायचा. जेव्हा कॅमेरा सुरू असायचा, तेव्हा आम्ही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवून जायचो. आमच्यात नक्कीच एक आकर्षण होतं, उत्तम केमिस्ट्री होती. पण त्या आकर्षणाचं खऱ्या आयुष्यात नात्यात रूपांतर झालं नाही, असं पूजा भट म्हणाली. 

पूजा भट नेमकं काय म्हणाली? (Pooja Bhatt On Mr Perfectionist Aamir Khan)

विकी लालवानी याच्या पॉडकास्टमध्ये बोलताना पूजा भट हिनं नमूद केलं की, "आमिर खान सिनेमाच्या प्रत्येक पैलूमध्ये मनापासून इंटरेस्ट घ्यायचा. शुटिंग दरम्यान तो अगदी बारिक-सारीक गोष्टींवरही प्रश्न उपस्थित करायचा, इतकंच काय, तर पूजाच्या 'हील्स'च्या उंचीवरही त्यानं आक्षेप घेतला होता, कारण त्या तिच्या भूमिकेला साजेशा नाहीत, असं त्याला वाटलेलं. काही लोक याला कदाचित 'हस्तक्षेप' म्हणू शकतील, पण पूजाच्या मते, आमिरच्या बारकाव्यांकडे असलेल्या त्या लक्षामुळे तिला खूप काही शिकायला मिळालं.

विकी लालवानीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना पूजा भट म्हणाली की, "तो नेहमीच बरोबर नसायचा आणि आम्ही दोघेही एकमेकांची खूप चेष्टा करायचो... आम्ही अगदी टॉम अँड जेरीसारखे होतो. आम्ही नेहमी एकमेकांना त्यांची जागा दाखवून देत होतो..."

आमिर खानसोबत रोमँटिक नात्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना पूजा भट म्हणाली की, "तुम्ही हा प्रश्न आमिर खानला विचारायला हवा. मी खूप आकर्षक होते, नाही का? तसं झालं असतं तर तुम्ही त्याला दोष दिला असता का? मला आमिर खान खूप आवडायचा. जेव्हा कॅमेरा सुरू असायचा, तेव्हा आम्ही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवून जायचो. आमच्यात नक्कीच एक आकर्षण होतं, उत्तम केमिस्ट्री होती. पण त्या आकर्षणाचं खऱ्या आयुष्यात नात्यात रूपांतर झालं नाही..."

आमिर खानसोबतच्या सिनेमाबाबत बोलताना पूजा भट्ट म्हणाली की, "आमिर त्याच्या सीनचा सराव करायचा. काहीजण त्याला इतरांच्या कामात ढवळाढवळ करणारा म्हणतील किंवा ज्याला सिनेमाच्या प्रत्येक गोष्टीत रस असतो असा व्यक्ती म्हणतील. मी त्याच्याकडून खूप काही शिकले. त्याची अभिनयातील अचूकता, तो अभिनेता म्हणून परफेक्ट आहे..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Aamir Khan Confirm His Wedding With Gauri Spratt: 'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली

ABP माझाच्या बातम्या LIVE...  

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtrachi HasyaJatra: पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
Ramayana: ‘रामायण’च्या 4000 कोटींच्या बजेटची वसुली करण्यासाठी मेकर्सचा मास्टरप्लॅन! थेट 50 हजार स्क्रीन्सवर होणार रिलीज?
‘रामायण’च्या 4000 कोटींच्या बजेटची वसुली करण्यासाठी मेकर्सचा मास्टरप्लॅन! थेट 50 हजार स्क्रीन्सवर होणार रिलीज?
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणाला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणाला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Embed widget