एक्स्प्लोर

Puducherry : पॉंडीचेरीमध्ये पहिल्यांदाच झळकला मराठी चित्रपट; 'पॉंडीचेरी' 18 मार्चपासून 'प्लॅनेट मराठी' ओटीटीवर

पाँडीचेरी (Puducherry ) हा चित्रपट स्मार्टफोनवर शूट झाला आहे.

Puducherry : काही दिवसांपूर्वी 'पॉंडीचेरी' (Puducherry) हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. स्मार्टफोनवर चित्रित होऊन चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा हा भारतातातील पहिला चित्रपट आहे. सचिन कुंडलकर दिग्दर्शित या चित्रपटात या चित्रपटात सई ताम्हणकर (Sai Tamhankar), वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi), अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), नीना कुळकर्णी (Neena Kulkarni), महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar), गौरव घाटणेकर (Gaurav Ghatnekar ) आणि तन्मय कुलकर्णी यांच्यासोबत आणखी एक प्रमुख व्यक्तिरेखा आहे आणि ही व्यक्तिरेखा म्हणजे 'पॉंडीचेरी' शहर. या निसर्गरम्य, रंगीबेरंगी शहरात नात्यांना हळुवार रंगवणारी एक प्रेमकहाणी पाहायला मिळत आहे. नात्याची एक वेगळी परिभाषा अधोरेखित करणाऱ्या या सिनेमाने चित्रपटगृहात यशस्वी वाटचाल केल्यानंतर आता हा चित्रपट 'प्लॅनेट मराठी' ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. विशेष अभिमानास्पद बाब म्हणजे या चित्रपटाचा पॉंडीचेरीमधील चित्रपट महोत्सवात विशेष शोसुद्धा सादर करण्यात आला. या व्यतिरिक्त तेथील चित्रपटगृहातही 'पॉंडीचेरी'चे शोज लावण्यात आले आहेत. पॉंडीचेरी शहरात मराठी चित्रपट झळकण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि या सगळ्यात पॉंडीचेरी सरकारच्या सांस्कृतिक विभागाचे विशेष सहकार्य लाभले आहे. 

'पॉंडीचेरी'च्या यशाबद्दल 'प्लॅनेट मराठी' ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात,' पॉंडीचेरीसारख्या अमराठी शहरातील चित्रपटगृहात मराठी चित्रपट झळकावा, ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. यासाठी आम्ही पॉंडीचेरी सरकारचे विशेष आभार मानतो, त्यांनी आम्हाला ही संधी दिली. नेहमीच्या प्रेमकहाणीपेक्षा ही एक वेगळी प्रेमकहाणी आहे, जी प्रेक्षकांना नक्कीच भावेल. चित्रपटगृहाच्या प्रदर्शनानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचे मुख्य कारण म्हणजे जगभरातील मराठी प्रेक्षकही हा चित्रपट कुठेही आणि कधीही पाहू शकतील. या चित्रपटात बरेच प्रयोग करण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे हा चित्रपट स्मार्टफोनवर चित्रित करण्यात आला आहे. याची जाणीव चित्रपट पाहताना अजिबात होत नाही. प्रत्येक सीन, तिथले आजूबाजूचे सौंदर्य खूपच बारकाईने टिपण्यात आले आहेत. कलाकारांसह केवळ पंधरा लोकांसोबत चित्रित करण्यात आलेल्या या चित्रपटाला कलाकारांनी मेकअपशिवाय त्यांच्या अभिनयाच्या सौंदर्याने चारचाँद लावले आहेत.'

अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी आणि क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत 'पॉंडीचेरी' या चित्रपटात सचिन कुंडलकर यांनी दिग्दर्शनासोबतच लेखक आणि निर्मात्याचीही भूमिका बजावली आहे. तर नील पटेलही चित्रपटाचे निर्माता आहेत. मोहमाया फिल्म्स आणि इंक टॅंक निर्मित हा चित्रपट १८ मार्चपासून प्रेक्षकांना 'प्लॅनेट मराठी'ओटीटी पाहता येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

South Actress On CJP Protest:'माझ्या मुलांना अभिजीत दिपकेसारखं बनवायला आवडेल' लोकप्रिय अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत; म्हणाली..
'माझ्या मुलांना अभिजीत दिपकेसारखं बनवायला आवडेल' लोकप्रिय अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत; म्हणाली..
Jana Nayagan Box Office Collection: सेंसॉरच्या कात्रीत अडकला, 7 महिने रखडला; विजय थलपतींच्या 'जननायगन' ने बॉक्स ऑफिस पछाडलं; थक्क करणारं कलेक्शन
सेंसॉरच्या कात्रीत अडकला, 7 महिने रखडला; विजय थलपतींच्या 'जननायगन' ने बॉक्स ऑफिस पछाडलं; थक्क करणारं कलेक्शन
Akanksha Chamola in Lockup 2: 'गौरव खन्नाऐवजी माझा कुत्रा आला असता तरी...', 'लॅाक अप 2' मध्ये आकांक्षा काय बोलून गेली? नेटकरी भडकले
'गौरव खन्नाऐवजी माझा कुत्रा आला असता तरी...', 'लॅाक अप 2' मध्ये आकांक्षा काय बोलून गेली? नेटकरी भडकले
Pravin Tarde and Aadesh Bandekar: 'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा
'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीच सावट
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीच सावट
PM Modi and Sandeep Deshpande: हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Embed widget