POCSO 307 Marathi Movie: गुन्हेगारीला भिक्षा नाही शिक्षा मिळणार, स्वरूप सावंत दिग्दर्शित 'पॉस्को 307' थिएटर गाजवणार
POCSO 307 Marathi Movie: गुन्ह्याला योग्य ती शिक्षा मिळवून देणारा, अन्यायाला न्याय मिळवून देणाऱ्या या नव्या चित्रपटाचा टिझर आता साऱ्यांच लक्ष वेधून घेतोय आणि हा चित्रपटच समाजातील गुन्ह्यांच्या घटनांबाबत प्रेक्षकांचे डोळे उघडणार आहे.

POCSO 307 Marathi Movie: गुन्हेगारी, अन्याय, मारामारी यांसारख्या घटना समाजात घडताना दिसतात मात्र या सगळ्याला आळा केव्हा बसणार हा प्रश्न साऱ्यांना सतावतोय?, घरातून बाहेर निघताना आपण पुन्हा घरी परतु की नाही याच विचारत असतो. समाजातील हा अन्याय, ही भीती आता आणखीनच गडद होत चालली आहे. गुन्हा करणारा बरेचदा माफीच्या जोरावर वा दूर पळून जात सुटला जातो मात्र त्याला मिळणारी शिक्षा ही बरेचदा ऐकूही येत नाही. आता गुन्ह्याला भिक्षा नाही तर शिक्षा मिळणार आहे कारण लवकरच 'पॉस्को 307' हा चित्रपट 16 मेपासून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
गुन्ह्याला योग्य ती शिक्षा मिळवून देणारा, अन्यायाला न्याय मिळवून देणाऱ्या या नव्या चित्रपटाचा टिझर आता साऱ्यांच लक्ष वेधून घेतोय आणि हा चित्रपटच समाजातील गुन्ह्यांच्या घटनांबाबत प्रेक्षकांचे डोळे उघडणार आहे. 'सिया एंटरटेनमेंट' आणि कौशिक मेहता प्रस्तुत आणि वैशाली बाळासाहेब सावंत व प्रेमलताचंपक संघवी निर्मित 'पॉस्को 307' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
पॉस्को हा कायदा नेमका काय आहे, कशावर तो आधारित आहे हे मोठ्या पडद्यावर पाहून याने लोकांच्या ज्ञानात भर पडणार आहे. 2012 साली आलेला हा कायदा तितकासा जनतेला ज्ञात नाही, चिमुकल्यांवर होणारे लैंगिक अत्याचार, अनेक महिलांवर होणारे अत्याचार ज्यांचा आजवर निकाल लागलेला नाही, यांत अनेक राजकारणी, मोठमोठे व्यावसायिक यांचा हात आहे पण या निरागसतेला न्याय मिळवून देण्यासाठी या कायद्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. महाभारतातील अनेक घटनांचा आधार घेत या चित्रपटाची बांधणी केली आहे. स्वरूप सावंत दिग्दर्शित हा चित्रपट असून त्यानं या चित्रपटाच्या कथेची आणि पटकथेची जबाबदारी ही उत्तमरीत्या पेलवली आहे. तर सोपान पुरंदरे यांनी हा चित्रपट त्यांच्या कॅमेरात कैद केलाय. या चित्रपटाला प्रथमेश कानडे याने संगीत दिलं असून संकलक म्हणूनही स्वरूप सावंत याने बाजू सांभाळली आहे. जबरदस्त डायलॉग आणि एक्शन सीनचा भरणा असलेला हा पॉस्को 307 हा चित्रपट 16 मेपासून चित्रपटगृहात पाहायला विसरू नका.
पाहा टीझर :























