एक्स्प्लोर

'जंगजौहर' आता 'पावनखिंड' म्हणून प्रदर्शित होणार; बाजीप्रभूंच्या पराक्रमाची गाथा रुपेरी पडद्यावर

ए. ए. फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या 'जंगजौहर' या चित्रपटाची निर्मिती आलमंड्स क्रिएशन्सच्या बॅनरखाली निर्माते अजय-अनिरूद्ध यांनी केली आहे. 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' या चित्रपटांना मिळालेलं यश आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादानंतर दिग्पाल लांजेकरनं 'जंगजौहर' चित्रपटाच्या रूपात 'शिवराज अष्टका'तील तिसरे पुष्प शिवचरणी अर्पण करण्याचा विडा उचलला.

मुंबई : पावनखिंडीतील बाजीप्रभू देशपांडे यांचा अंगावर रोमांच उभे करणारा पराक्रम हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामधील एक सुवर्ण अध्याय आहे. शालेय जीवनापासूनच आपण इतिहासाच्या पुस्तकात पावनखिंडीतील बाजीप्रभूंनी गाजवलेल्या पराक्रमाचे धडे वाचलेले आहेत. पावनखिंडीतील शौर्यगाथा आणि तिथल्या थराराची गाथा इतिहासाच्या पानापानांमध्ये आपण वाचली, ऐकली आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर 'जंगजौहर' नावाचा चित्रपट घेऊन येत असल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. मुहूर्तापासून कायम चर्चेत राहिलेल्या या चित्रपटाबाबत सर्वांनाच खूप उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं बाजीप्रभूंच्या पराक्रमाची गाथा रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. आता या चित्रपटासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

ए. ए. फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या 'जंगजौहर' या चित्रपटाची निर्मिती आलमंड्स क्रिएशन्सच्या बॅनरखाली निर्माते अजय-अनिरूद्ध यांनी केली आहे. 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' या चित्रपटांना मिळालेलं यश आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादानंतर दिग्पाल लांजेकरनं 'जंगजौहर' चित्रपटाच्या रूपात 'शिवराज अष्टका'तील तिसरे पुष्प शिवचरणी अर्पण करण्याचा विडा उचलला. चित्रपटरूपी तिसरे पुष्प रसिक दरबारी सादर करायला काही अवधी असतानाच या चित्रपटाशी निगडीत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 'जंगजौहर' हे या चित्रपटाचं शीर्षक बदलून आता 'पावनखिंड' करण्यात आलं आहे. यासोबतच हा चित्रपट येत्या 10 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे. पूर्वी घोडखिंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरली होती. घोडखिंडीत बाजीप्रभूंनी पराक्रमाची शर्थ केली. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं पावन झालेली ही खिंड पुढे 'पावनखिंड' म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यामुळं 'पावनखिंड' हा शब्द आपल्याला अधिक जवळचा वाटतो. 'जंगजौहर' या चित्रपटासाठीही 'पावनखिंड' याच शीर्षकासाठी प्रयत्न सुरु होते, पण एका अन्य निर्मात्यांनी या टायटलची नोंदणी केली होती. त्यामुळे चित्रपटाचे शीर्षक 'जंगजौहर' ठेवण्यात आलं होतं. मात्र अलीकडच्या काळात अशा काही घडामोडी घडल्या की, ज्या निर्मात्यांच्या नावावर हे टायटल होतं त्यांनी 'जंगजौहर'ला 'पावनखिंड' हे शीर्षक वापरण्याची परवानगी दिली.

जंगजौहर' आता 'पावनखिंड' म्हणून प्रदर्शित होणार; बाजीप्रभूंच्या पराक्रमाची गाथा रुपेरी पडद्यावर

'जंगजौहर'पेक्षा 'पावनखिंड' हे शीषक चित्रपटाच्या विषयाला अनुरूप आणि पूरक वाटल्यानं दिग्पाल आणि निर्मात्यांनी जणू शिवरायांचा प्रसाद मानून हे शीर्षक आपल्या चित्रपटाला बहाल केले आहे. शिवप्रेमींसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे. आता हा चित्रपट 'पावनखिंड' या नावाने प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटात मराठीतील आघाडीच्या कलाकारांचा भलामोठा फौजफाटा आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये आणि उत्तम सादरीकरण यामुळे दिग्पालच्या व्हिजनमधून पडद्यावर अवतरणारी 'पावनखिंड'ची शौर्यगाथा प्रेक्षकांनाही खिळवून ठेवेल असा विश्वास आहे. पावनखिंडीतील तो थरार आणि पराक्रम 10 जूनला चित्रपटगृहांमध्ये पहायला मिळणार आहे. सिनेमॅटोग्राफर अमोल गोळेने छायांकन केले असून, संगीत-पार्श्वसंगीत देवदत्त मनिषा बाजीने दिले आहे. 'ते फकस्त 600 व्हते' असे म्हणत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या अमर बलिदानाची गाथा प्रेक्षकांना आता 'पावनखिंड' या नावाने पहायला मिळणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Awarapan 2 Box Office: इम्रान हाश्मीच्या 'आवारापन 2'ची धडाकेबाज कामगिरी, मंडे टेस्टमध्ये पास; चौथ्या दिवशी किती कोटी कमावले?
इम्रान हाश्मीच्या 'आवारापन 2'ची धडाकेबाज कामगिरी, मंडे टेस्टमध्ये पास; चौथ्या दिवशी किती कोटी कमावले?
Celebrity vs Politicians Cricket Match Video: पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
Snake In Shahrukh Khan House: शाहरुख खानचं टेन्शन वाढलं, 'मन्नत' बंगल्यात दोन साप; 8 फूट लांबीची धामण पकडली, पण दुसरा सापडेनाच... नेमकं घडलं काय?
शाहरुख खानचं टेन्शन वाढलं, 'मन्नत' बंगल्यात दोन साप; 8 फूट लांबीची धामण पकडली, पण दुसरा सापडेनाच... नेमकं घडलं काय?
Emraan Hashmi Awarapan 2 Box Office Collection: 45 कोटींच्या सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; तीनच दिवसांत बजेटच्या दुप्पट कमाई, 2026 ची 8 वी ब्लॉकबस्टर फिल्म पाहिलीत?
45 कोटींच्या सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; तीनच दिवसांत बजेटच्या दुप्पट कमाई, 2026 ची 8 वी ब्लॉकबस्टर फिल्म पाहिलीत?

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Embed widget