Uma Dasgupta Death : 'पाथेर पांचाली' चित्रपटातील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड! अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
Uma Dasgupta Passes Away : 'पाथेर पांचाली' फेम अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं आहे.
Uma Dasgupta Passed Away : सुप्रसिद्ध भारतीय दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्या 'पाथेर पांचाली' चित्रपटातील अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन झालं आहे. अभिनेत्री उमा दासगुप्ता यांनी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 'पाथेर पांचाली' चित्रपटात उमा दासगुप्ता यांनी 'दुर्गा' ही भूमिका साकारली होती. कोलकातामध्ये एका खासगी रुग्णालयात 18 नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्या अनेक वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होत्या. अभिनेत्री उमा दासगुप्ता यांच्या निधनाने बंगाली इंडस्ट्रीसह भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. उमा दासगुप्ता यांच्या निधनाची पुष्टी अभिनेते आमदार चिरंजीत चक्रवर्ती यांनी केली आहे.
'पाथेर पांचाली' फेम अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
बिभूतिभूषण बंदोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारित पाथेर पांचाली या 1955 साली आलेल्या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. अभिनेत्री उमा दासगुप्ता यांनी या चित्रटात दुर्गाचं पात्र साकारलं होतं. उमा दासगुप्ता यांनी साकारलेलं दुर्गाचं पात्र, लाखो बंगाली हृदयात कायम आहे. एवढंच नाही, तर या भूमिकने त्यांनी कोट्यवधी भारतीय सिनेरसिकांच्या मनात खोलवर छाप पाडली. या चित्रपटातील त्यांचा अभिनय अविस्मरणीय आहे. दुर्गा निरागस स्वप्ने, तिची खेळकर स्वभाव आणि तिचे दुर्दैवी नशीब प्रेक्षकांच्या मनाला भिडलं.
उमा दासगुप्ता यांचं भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वाचं योगदान
अभिनेत्री उमा दासगुप्ता यांनी भारतीय सिनेमासाठी महत्त्वाचं योगदान दिलं आहे. त्यांच्या निधनाने सिनेरसिकांच्या मनात एक पोकळी निर्माण झाली आहे. अभिनेत्री उमा दासगुप्ता यांनी अनेक बंगाली चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण, काही वर्षानंतर त्या प्रसिद्धीपासून दूर गेल्या, पण बंगाली सिनेमावरील त्यांची जादू कायम राहिली. त्या प्रसिद्धीपासून दूर राहून शांत आयुष्य जगत होत्या. फार कमी वेळा त्या मीडियासमोर दिसायच्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :