Hindi Web Series Won 66 Awards 9 INDB Rating: 32 एपिसोड्स असलेली हिंदी वेब सीरिज, जिंकलेत 66 अवॉर्ड्स, IMDb रेटिंग 9; धमाकेदार सीन्स अन् डायलॉग्स
Hindi Web Series Won 66 Awards 9 INDB Rating: हिंदी कॉमेडी वेब सीरिजबाबत सांगत आहोत, जी 2020 मध्ये प्रदर्शित झालेली आणि या सीरिजनं तब्बल 66 अवॉर्ड्स आपल्या नावे केलेत.

Hindi Web Series Won 66 Awards 9 INDB Rating: एक अशी हिंदी कॉमेडी वेब सीरिज (Hindi Comedy Web Series), जिनं 66 अवॉर्ड जिंकलेत. या सीरिजचे तब्बल चार सीझन आहेत, ज्यांचे एकूण 38 भाग आहेत. या सीरिजला खूप प्रचंड प्रतिसाद मिळाला असून IMDb रेटिंगही 9 आहे. आम्ही ज्या हिंदी कॉमेडी वेब सीरिजबाबत सांगत आहोत, जी 2020 मध्ये प्रदर्शित झालेली आणि या सीरिजनं तब्बल 66 अवॉर्ड्स आपल्या नावे केलेत. आजवरच्या हिंदी वेब सिरीजच्या (Hindi Web Series) यादीत ही सीरिज सर्वात अव्वल स्थानी आहे. या सीरिजच्या चार सीझन्समध्ये एकूण 32 एपिसोड्स आहेत.
तुम्ही ओळखलं का सीरिजचं नाव? (Blockbuster Web Series)
आम्ही ज्या सीरिजबाबत बोलत आहोत, एव्हाना तुम्हाला तिचं नाव कळलंच असेल. आम्ही बोलतोय, 'पंचायत' सीरिजबाबत... ही सीरिज एवढी लोकप्रिय ठरलीय की, प्रत्येक सीनझ पाहिल्यानंतर लोक तिच्या पुढच्या सीझनची वाट पाहत असतात. या सीरिजचं आयएमडीबी रेटिंग 9 आहे.
View this post on Instagram
2020 मध्ये आलेला पहिला सीझन
'पंचायत'चा पहिली सीझन 2020 मध्ये आलेला. दुसरा सीझन 2022 मध्ये, तिसरा 2024 मध्ये आणि चौथा सीझन जून 2025 मध्ये प्रसारित करण्यात आलेला. या सीरिजमध्ये जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीना गुप्ता, फैसल मलिक, चंदन रॉय, सान्विका, दुर्गेश कुमार, पंकज झा आणि आसिफ खान मुख्य भूमिकेत आहेत.
'पंचायत'च्या नावावर 66 अवॉर्ड्स
आयएमडीबीच्या रेटिंगनुसार, या सीरिजच्या नावावर 4 IIFA अवॉर्ड्स, 11 इंडियन टेलिव्हिजन अकादमी अवॉर्ड्स, 9 फिल्मफेयरसह तब्बल 66 अवॉर्ड्स आहेत. तसेच, या सीरिजच्या किएटर्सबाबत बोलायचं झालं तर, ही धमाकेदार सीरिज चंदन कुमार आणि दीपक कुमार मिश्रा यांनी तयार केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























