एक्स्प्लोर

Bollywood Most Romantic Film: अशी बॉलिवूड फिल्म, जी कुटुंबासोबत पाहायची अजिबात घेऊ नका रिस्क; 2 तास 28 मिनिटांच्या फिल्ममध्ये भरपूर रोमॅन्टिक सीन्स

Bollywood Most Romantic Film: जेव्हा हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार होता, तेव्हाच याची खूप चर्चा रंगलेली. प्रत्येकाच्या ओठांवर याच सिनेमाचं नाव होतं. या चित्रपटात तीन प्रमुख व्यक्तिरेखा होत्या आणि प्रत्येकजण त्याबद्दल बोलत होता.

Bollywood Most Romantic Film: ओटीटीवर (OTT) अनेकदा असे अनेक सिनेमे आणि वेब सीरिज (Web Series) प्रदर्शित होत असतात, जे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत अजिबात पाहू शकत नाही. या सीरिज आणि सिनेमे एकट्यानं पाहणंच चांगलं. कारण यामध्ये रोमॅन्टिक, इन्टिमेट सीरिजचा एवढा भडिमार असतो की, कुटुंबासोबत पाहताना तुम्हाला वारंवार नजर चुकवावी लागत असेल. आज आम्ही तुम्हाला 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या अशाच एका सिनेमाबद्दल सांगणार आहोत, जो एकट्यानंच सर्वात जास्त एन्जॉय करता येईल.

जेव्हा हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार होता, तेव्हाच याची खूप चर्चा रंगलेली. प्रत्येकाच्या ओठांवर याच सिनेमाचं नाव होतं. या चित्रपटात तीन प्रमुख व्यक्तिरेखा होत्या आणि प्रत्येकजण त्याबद्दल बोलत होता. या चित्रपटानं प्रचंड चर्चा निर्माण केलेली. या सिनेमात दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य करवा यांनी भूमिका केल्या होत्या. या चित्रपटाचं नाव 'गहराइयां' होतं. 'गहराइयां' ही एक अशी कथा आहे, जी आधुनिक नातेसंबंधांमधली गुंतागुंत आणि मानवी भावनांच्या खोलीचा सुंदरपणे शोध घेते.

शकुन बत्रा दिग्दर्शित या चित्रपटात नातेसंबंध, प्रेम, विश्वासघात अशा अनेक पातळ्यांवर दाखवण्यात आला आहे. या कथेत मुख्य भूमिका असलेली आलिशा खन्ना (दीपिका पदुकोण) ही एक योगा प्रशिक्षक आहे, जी तिच्या कारकिर्दीत आणि रिलेशन या दोन्ही गोष्टींवर स्थिरावलेली वाटते.

आलिशाचा प्रियकर, करण (धैर्य करवा) हा एक अयशस्वी लेखक आहे आणि त्याच्यासोबतचं तिचं नातं आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. एक दिवस, आलिशा तिची चुलत बहिण टिया (अनन्या पांडे)चा होणारा नवरा जैन (सिद्धांत चतुर्वेदी)ला भेटते आणि त्याचवेळी सिनेमाची कथा भावनिक वळण घेते.

आलिशा आणि जैन यांच्यात एक वेगळंच आकर्षण फुलतं, जे हळूहळू एका खोल, पण गुंतागुंतीच्या नात्यात विकसित होतं. दोघेही एकमेकांमधील त्यांच्या भूतकाळातील एकटेपणा आणि अपूर्णता भरून काढण्याचा प्रयत्न करतात, पण हे नातं त्यांना आणखी गुंतागुंतीकडे घेऊन जातं.
  
चित्रपटाचं सौंदर्य त्याच्या संवादांमधून आणि कॅमेरावर्कमधून प्रतिबिंबित होतं. शकुन बत्रानं नातेसंबंधांचे नाजूक थर अत्यंत संवेदनशीलतेनं चित्रित केलेत. दीपिकानं आलिशाचे पात्र इतक्या खोलवर आणि वेदनांनी साकारलंय की, प्रेक्षक तिच्या प्रत्येक भावना अनुभवू शकतात.

जैनच्या भूमिकेत सिद्धांत एका प्रौढ तरीही असुरक्षित व्यक्तीची भूमिका साकारतो, जी त्याच्या इच्छा आणि अपराधीपणामध्ये अडकलेली असते. टियाच्या भूमिकेत अनन्या पांडे सहजतेनं तिची निरागसता आणि वेदना साकारते. 2 तास 28 मिनिटांचा हा चित्रपट रोमँटिक आणि बोल्ड दृश्यांनी भरलेला आहे. हा चित्रपट अतिशय बोल्ड दृश्यांनी भरलेला आहे, ज्यामुळे तो कुटुंबाचा चित्रपट बनत नाही.

'गहराइयां' मधला दीपिकाचा लूक चित्रपटाला आणखीनच आकर्षक बनवतो. दरम्यान, अनन्या पांडे देखील खूपच हॉट आणि बोल्ड दिसते. सिद्धांत चतुर्वेदीसोबतची तिची केमिस्ट्री देखील चित्रपटात अद्भूत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

2 तास 20 मिनिटांच्या या चित्रपटासमोर इम्रान हाश्मी, शक्ती कपूर सोडाच, वेब सिरीज सुद्धा फिकी पडेल! YouTube वर धुमाकूळ

महत्त्वाच्या बातम्या

आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Upcoming Actress Movies: 600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget