बाॅबीपासून ते बेताबपर्यंत; शूटिंगासाठी बाॅलिवूडसाठी नेहमीच पहलगामचा 'पैगाम'; त्याच मिनी स्वित्झर्लंडच्या पठारावर हजारो पर्यटक जमले अन्
Pahalgam Terror Attack : बाॅबीपासून ते बेताबपर्यंत; शूटिंगासाठी बाॅलिवूडसाठी नेहमीच पहलगामचा 'पैगाम'; त्याच मिनी स्वित्झर्लंडच्या पठारावर हजारो पर्यटक जमले अन्

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीर म्हणजेच पृथ्वीवरील स्वर्ग पाहाण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी (Pahalgam Terror Attack) हल्ला केलाय. या दहशतवादी हल्ल्यात 27 निष्पाप लोकांचा मृत्यू झालाय. यामध्ये महाराष्ट्रातून फिरण्यासाठी गेलेले 6 पर्यटक देखील मृत्युमुखी पडले आहेत. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्यानं जम्मू काश्मीरमधील पर्यटकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालंय. पहलगामचा हा परिसर मिनी स्वित्झर्लंड असल्याचं बोललं जातं. अनेक पर्यटक येथील वातावरणाचा आनंद घेण्यासाठी जात असतात. बॉलिवूडच्या (Bollywood Movie) अनेक सिनेमांचं याच परिसरात शूटींग झालं आहे. बॉबीपासून ते बेताबपर्यंत आणि या 4 वर्षात रिलीज झालेल्या अनेक सिनेमांचं पहेलगाममध्येच शूटींग झालंय.
बॉलीवूडच्या इतिहासात पहलगाम (जम्मू आणि काश्मीर) या निसर्गरम्य ठिकाणी अनेक चित्रपटांचं शूटिंग झालं आहे. "बॉबी" (1973) या राज कपूरच्या सुपरहिट सिनेमामुळे पहलगाम विशेष प्रसिद्ध झालं. या चित्रपटात दाखवलेले अरु वैली, बेताब व्हॅली (पूर्वी ज्याला हेलन व्हॅली म्हणत) आणि लिद्दर नदीच्या किनाऱ्याचे सुंदर दृश्य प्रेक्षकांच्या मनात कायमची छाप सोडून गेली.
बॉबी नंतर बऱ्याच चित्रपटांनी पहलगामचा निसर्गरम्य सीन वापरलाय. बेताब (1983) हा सिनेमा सनी देओल आणि अमृता सिंगचा डेब्यू चित्रपट होता. यामध्ये दाखवलेल्या व्हॅलीला पुढे "बेताब व्हॅली" हेच नाव पडलं. रोटी कपड़ा और मकान, सिलसिला, कभी कभी, मिशन कश्मीर अशा अनेक सिनेमांचं इथेच शूटिंग झालं होतं. विशाल भारद्वाजचा हैदर हा चित्रपट देखील काश्मीरमध्येच शूट झाला. प्राकृतिक सौंदर्य, बर्फाच्छादित पर्वत, नद्या आणि हिरवळ यामुळे पहलगाम हे चित्रपट निर्मात्यांसाठी स्वर्गासारखं ठिकाण बनलं आहे.
दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर बॉलिवूडमधील कलाकरांनी व्यक्त केलं दु:ख; कारवाईची मागणी
अक्षय कुमारने त्याच्या एक्स अकाउंटवरुन पहेलगाममधील हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी लिहिले, "पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची बातमी ऐकून धक्का बसला. अशा प्रकारे निष्पाप लोकांना मारणे हे निव्वळ क्रूरता आहे. मी त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो." त्यांची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
संजय दत्तने लिहिले, "त्यांनी आमच्या लोकांना क्रूरपणे मारले. हे माफ केले जाऊ शकत नाही. या दहशतवाद्यांनी हे जाणून घ्यावे की आम्ही गप्प बसणार नाही. आम्हाला बदला घ्यावा लागेल, मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, गृहमंत्री अमित शहा जी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी यांना विनंती करतो की त्यांनी त्याला योग्य ती शिक्षा द्यावी.
इतर महत्त्वाच्या बातम्या























