एक्स्प्लोर

OTT वर्ल्डमध्ये नवा प्लेयर! मराठी चित्रपट - वेबसिरिजला नवा पर्याय; Netflix-Prime ला देणार टक्कर?

मराठी चित्रपट-वेब सीरिजच्या मनोरंजनाचा कॅनव्हास आणखी रुंदावरणार

Marathi OTT Platform: भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे मराठी असल्याने अभिजात दर्जा लाभलेली मराठी भाषेतील सिनेसृष्टीला सिनेमांचे माहेरघर मानले जाते. राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये मराठी मनोरंजन विश्वाचा डंका वाजला असून, मराठी सिनेमांनी जागतिक पातळीवरही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. सध्याच्या डिजिटलच्या युगात मराठी प्रेक्षकांनाही डिजिटल मनोरंजनाची सवय लागलेली असताना सध्याच्या ओटीटी प्लॅटफॅार्मवर दर्जेदार मराठी काँटेंट उपलब्ध होत नसल्याची खंत रसिकांकडून व्यक्त होत आहे. जणू त्यावर रामबाण उपाय बनून भारतातील सर्वात मोठे प्रादेशिक ओटीटी व्यासपीठ 'स्टेज' मराठीत दिमाखात दाखल झाले आहे.

'स्टेज मराठी'ची अधिकृत घोषणा

अंधेरीतील वेदा कुणबा थिएटरमध्ये 'स्टेज' मराठीची अधिकृत घोषणा करण्यात आली. या सोहळ्याला 'स्टेज'चे सह-संस्थापक प्रवीण सिंघल, स्टेज ओटीटी मराठी कन्टेन्ट हेड राजेश पाठक तसेच मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. कलाकारांच्या मांदियाळीत अनंत महादेवन, चिन्मय मांडलेकर, क्षितीज दाते, श्रेया बुगडे, उर्मिला जगताप, पुष्कर जोग, निशा परुळेकर यांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा समावेश होता. यावेळी 'स्टेज' मराठीवर दाखवल्या जाणाऱ्या मराठी कलाकृतींची घोषणाही करण्यात आली. 'स्टेज' हे केवळ एक ओटीटी प्लॅटफॅार्म नसून, ही एक क्रांती असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. २०१९ मध्ये स्थापन झालेले 'स्टेज' हे भारतातील पहिले बोलीभाषा आधारित ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. हरयाणवी, राजस्थानी, भोजपुरी आणि गुजराती भाषेत यशस्वी क्रांती केल्यानंतर, 'स्टेज' आता कोट्यावधी मराठी प्रेक्षकांना त्यांच्या मातीतील, त्यांच्या बोलीभाषेतील दर्जेदार आणि कौटुंबिक आशय देण्यासाठी कटिबद्ध आहे.

मराठी सिनेमा वेब सिरीजला होणार फायदा

'स्टेज'चे सह-संस्थापक प्रवीण सिंघल म्हणाले की, आम्ही मराठीत प्रवेश करीत असल्याचा खूप आनंद आहे. कोसाकोसावर पाणी आणि वाणी बदलत जाते. आपल्याला बोलीभाषेतून गोष्टी सांगायला, पाहायला आणि ऐकायला आवडतात. घरी जेव्हा आपण कुटुंबियांसोबत बोलतो तेव्हा कोणताही आडपडदा नसतो. अशाच प्रकारे कोणताही आडपडदा न ठेवता जेव्हा रसिकांशी भेट घेतली जाते तेव्हा त्यात एक आपलेपणा जाणवतो. आपल्या संस्कृतीसाठी काहीतरी करायला हवे या विचारातून आम्ही 'स्टेज'ची स्थापना केली. इतर भाषांमध्ये यशस्वी झाल्यानंतर मराठीपर्यंत पोहोचण्याचा 'स्टेज'चा प्रवास खूप संघर्षमय आहे. मागील पाच-सहा वर्षांपासून आमच्या गाठीशी खूप मोठा अनुभव जमा झाला आहे. मराठीमध्ये विपुल कलासंपदा आहे. इथे दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात चित्रपट बनतात. रसिक ते आवडीने पाहतात. अशा सिनेसृष्टीला आता 'स्टेज'च्या अनुभवाचा फायदा होणार आहे. मराठी सिनेमा आम्हाला घरोघरी पोहोचवायचा आहे. १ मेपासून 'स्टेज' सुरू झाले असून, लवकरात लवकर मराठी रसिकांनी याचे सबस्क्रीप्शन घ्यायला हवे असे आवाहनही प्रवीण सिंघल यांनी केले. 

खान्देशी ते मालवणी सगळ्या बोलीभाषांना प्लॅटफॉर्म

'स्टेज' ओटीटी मराठी कन्टेन्ट हेड राजेश पाठक म्हणाले की, चांद्यापासून बांद्यापर्यंत आपल्याकडे एक संस्कृती आणि संत परंपरा आहे. खान्देशी, वैदर्भीय, कोकणी, मालवणी, नागपूरी, सातारी, कोल्हापूरी, अहिराणी अशा महाराष्ट्रामध्ये २००हून जास्त बोलीभाषा आहेत. या प्रत्येक बोलीभाषेत नाट्यकला, लोककला, लोकपरंपरा आणि संस्कृती दडलेली आहे. या प्रत्येकाला व्यासपीठ मिळत नाही. आजच्या डिजिटल युगात 'स्टेज' मराठी हे खऱ्या अर्थाने यांना व्यासपीठ देणार आहे. रसिक आणि कला यांच्यात दुवा साधण्याचे काम आम्ही करणार आहोत. मागील काही वर्षांपासून हे व्यासपीठ हरियाणवी, राजस्थानी, भोजपुरी, गुजराती भाषांमध्ये काम करीत आहे. महाराष्ट्रात खूप साहित्य आहे. त्याला या माध्यमातून संधी मिळणार आहे. रंगकर्मींना सांगायची असलेली गोष्ट मांडण्यासाठी हे व्यासपीठ खूप महत्त्वाचे ठरणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील प्रश्न सोडवण्याचा स्टेज हा एक नवीन पर्याय आहे. रसिकांना दर्जेदार काँटेंट देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठी रसिक जाणकार असल्याने त्यांना चांगल्याची जाण आहे. याचे भान राखून आम्ही वाटचाल करणार असल्याचेही राजेश पाठक म्हणाले.

'इलू इलू १९९८', 'सखे गं साजणी', 'डेटिंग सेटिंग', 'प्लस मायनस', 'प्रेमाचा तमाशा', 'पहिलं प्रेम', 'माझी वाली लव्हस्टोरी' या 'स्टेज' मराठीवरील कलाकृती रसिकांचे लक्ष वेधणार आहेत. यापैकी 'डेटिंग सेटिंग' या वेब सीरिजसोबतच 'इलू इलू १९९८' व 'सखे गं साजणी' या चित्रपटांची झलकही दाखवण्यात आली. 'डेटिंग सेटिंग'मध्ये क्षितिज दाते आणि श्रेया बुगडे मुख्य भूमिकेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Actor Aabhijeet Kelkar Facebook Post: मराठी अभिनेत्याची हादरवणारी फेसबुक पोस्ट, 'माझ्या जीवाला धोका...' ; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे मागितली मदत
मराठी अभिनेत्याची हादरवणारी फेसबुक पोस्ट, 'माझ्या जीवाला धोका...' ; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे मागितली मदत
Sanjay Gupta Passes away: संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?
संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?
Filmmaker Sanjay Gupta Death: संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
Filmmaker Sanjay Gupta Passed Away: बॉलिवूडचा हिट दिग्दर्शक बाथरुममध्ये कोसळला, जागेवरच निधन, काँटे, 'शूटआउट अ‍ॅट वडाळासारखे सिनेमे गाजले!
मोठी बातमी : बॉलिवूडचा हिट दिग्दर्शक बाथरुममध्ये कोसळला, जागेवरच निधन, काँटे, शूटआउट अ‍ॅट वडाळासारखे सिनेमे गाजले!

व्हिडीओ

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
Gokul Election: सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
दुष्काळाच्या भीषण संकटात कृत्रिम पावसाची आशा; ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयोग, 400 मीटर उंचीवरुन क्लाउड सीडिंगची चाचणी
दुष्काळाच्या भीषण संकटात कृत्रिम पावसाची आशा; ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयोग, 400 मीटर उंचीवरुन क्लाउड सीडिंगची चाचणी
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
Azam Khan: आजम खान जेलमधून बाहेर येताच EDकडून अटक; जेलच्या दारात अटकेसाठी ED पॅरामिलिटरी फौजा घेऊन पोहोचली
आजम खान जेलमधून बाहेर येताच EDकडून अटक; जेलच्या दारात अटकेसाठी ED पॅरामिलिटरी फौजा घेऊन पोहोचली
Raj Thackeray: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले, Video
Video: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले
Embed widget