OTT Marathi Web Series Andhar Maya: 'फायनल डेस्टिनेशन'ची बाप, सस्पेन्स तर खतरनाक, ओटीटी गाजवतेय 'ही' मराठी हॉरर सीरीज; कुठे पाहाल?
OTT Marathi Web Series Andhar Maya: नुकतीच एक मराठी वेब सीरिज रिलीज झाली असून सध्या ओटीटीवर ती धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांना ही सीरिज भलतीच आवडली असून त्यांच्याकडून वेब सीरिजच्या कथानकासोबतच स्टारकास्टचंही कौतुक केलं जात आहे.

OTT Marathi Web Series Andhar Maya: गेल्या काही वर्षांत, भय आणि भयानक दृश्यांनी भरलेल्या हॉरर वेब सीरिज (Horror Web Series) आणि चित्रपटांची क्रेझ प्रेक्षकांमध्ये झपाट्यानं वाढल्याचं पाहायला मिळत आहे. ओटीटीवर (OTT) दर सेकंदाला नवनवा कंटेन्ट प्रदर्शित होत असतो, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशातच अलिकडेच अनेक हॉरर चित्रपट (Horror Movie) आणि वेब सीरिज (Web Series) रिलीज झाल्या आहेत. नुकतीच एक मराठी वेब सीरिज (Marathi Web Series) रिलीज झाली असून सध्या ओटीटीवर ती धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांना ही सीरिज भलतीच आवडली असून त्यांच्याकडून वेब सीरिजच्या कथानकासोबतच स्टारकास्टचंही कौतुक केलं जात आहे. सध्या ही वेब सीरिज भलतीच चर्चेत आहे. या वेब सीरिजची कथा भयानक आहेत, पण त्यातली दृश्य देखील भयानक आहेत.
आम्ही ज्या मराठी वेब सीरिजबाबत बोलत आहोत, तिचं नाव 'अंधार माया'. या वेब सीरिजची निर्मिती एरिकॉन टेलिफिल्म्सनं केली असून दिग्दर्शन भीमराव मुडे यांनी केलं आहे. सध्या ही मराठी वेब सीरिज झी5 (Zee 5) वर 30 मे रोजी प्रदर्शित करण्यात आली आहे. या वेब सीरिजमध्ये किशोर कदम मुख्य भूमिकेत असून रुतुजा बागवे , शुभंकर तावडे , स्वप्नली पाटील, शुभांगी भुजबळ, अनूप बेलवलकर, ओमप्रकाश शिंदे, पीहू गोसावी आणि आरव अहीर हे कलाकारही झळकले आहेत.
किशोर कदम मुख्य भूमिकेत
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भीमराव मुडे दिग्दर्शित 'अंधार माया'मध्ये मराठी मनोरंजन क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेते किशोर कदम मुख्य भूमिकेत आहेत. किशोर कदम (Kishor Kadam) यांनी या वेब सीरिजमध्ये गोण्याची भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वी 'अंधार माया'चा (Andhar Maya) ट्रेलर प्रदर्शित झाला होता. जो पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या वेब सीरिजची उत्सुकता सुरू झाली. 'अंधार माया' वेब सीरिजचा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला 'फायनल डेस्टिनेशन'पेक्षाही भयावह ट्रेलर असल्याचं म्हटलं होतं.
'अंधार माया'ची पटकथा काय?
म्हणतात ना, काही दरवाजे काय बंद असलेलेच बरे असतात. कारण ते जर का उघडले? तर, मग नको त्या गोष्टी घडतात. ही सीरिज पाहिल्यानंतर काहीसं असंच जाणवतं. 'अंधार माया' झी5 ची पहिली मराठी हॉरर ओरिजनल सीरिज आहे. या सीरिजमध्ये दाखवण्यात आलेली कहाणी खातू कुटुंबीयांच्या एका रहस्यमयी, गडद आणि भयानक वडिलोपार्जित घराभोवती फिरते. अशी कहाणी जी कधीकाळी त्यांच्यासाठी एक गर्वाचा विषय असायची, पण, आता कशी त्यांच्यासाठी श्राप बनते, हे पाहून कुणाचंही डोकं फिरेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























