एक्स्प्लोर

10 कोटींची कॉपीराइट केस ठोकलेल्या धनुषवर भडकली नयनतारा, अभिनेत्रीने सोशल मीडियावर ओपन लेटरमध्ये सगळं सत्य सांगून टाकलं

Nayanthara On Dhanush : अभिनेत्री नयनताराच्या डॉक्युमेंट्रीवर धनुषने 10 कोटींची कॉपीराइट केस केली. यानंतर नयनताराने सोशल मीडियावर सगळं सत्य मांडलं आहे.

Nayanthara Open Letter On Dhanush : बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमधील मोठं नाव 'लेडी सुपरस्टार' नयनतारा हिच्या आयुष्यावरील डॉक्युमेंट्रीमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री नयनतारा हिचं करियर आणि आयुष्यावर आधारित नेटफ्लिक्स डॉक्यूमेंट्री डॉक्यूमेंट्री 'नयनतारा : बियॉन्ड द फेयरी टेल' ही वेब सीरीज लवकरच रिलीज होणार आहे. मात्र, याआधीच नव्या वादाला तोंड फुटल्याचं दिसून येत आहे. साऊथ सुपरस्टार धनुषने या वेब सीरीजवर कॉपीराईट क्लेम करत 10 कोटींचा दावा ठोकला आहे. अभिनेता धनुषने नयनताराच्या वेब सीरिजमध्ये 'नानुम राउडी धान' या चित्रपटातील फुटेजचा वापर केल्यामुळे निर्मात्यांवर 10 कोटींची कॉपीराइट केस केली आहे. यानंतर अभिनेत्री नयनताराने सोशल मीडियावर ओपन लेटर शेअर करत धनुषवरचा राग व्यक्त केला आहे.

10 कोटींची कॉपीराइट केस केलेल्या धनुषवर भडकली नयनतारा

अभिनेत्री नयनताराचं (Nyanthara) आयुष्य आणि करियरवर आधारित या वेब सीरिजमध्ये 'नानुम राउडी धान' (Naanum Rowdy Dhaan) या चित्रपटातील 3 सेकंदाच्या फुटेजचा वापर केल्याप्रकरणी हा कॉपीराईट क्लेम करण्यात आला आहे. 'नानुम राउडी धान' नयनताराने मुख्य भूमिका साकारली होती. मात्र, यातील 3 सेकंदाची फुटेज वापरल्यामुळे नयनताराच्या वेब सीरीजवर केस करण्यात आली आहे. यानंतर नयनताराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर लांबलचक निवेदन जारी करत धनुषवर निशाणा साधला आहे. 

नयनताराने धनुषवर व्यक्त केला राग

नयनताराने शनिवारी शेअर केलेल्या खुल्या पत्रात लिहिलं आहे की, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी, 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल' बनवताना, तिने धनुषकडे त्याच्या 2015 मधील 'नानुम राउडी धन' या चित्रपटातील दृश्ये वापरण्याची परवानगी मागितली होती. पण, धनुषने तिना परवानगी देण्यास नकार दिला आणि त्याऐवजी त्यांना चित्रपटाच्या सेटवरील पडद्यामागील फुटेज वापरल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली.

'दोन वर्षे संघर्ष केल्यानंतर आम्ही हार मानली'

नयनताराने पत्रात लिहिलं आहे की, "एनओसीसाठी तुझ्यासोबत दोन वर्षे संघर्ष केल्यानंतर आणि आमच्या नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरीच्या रिलीजसाठी तुमच्या मंजुरीची वाट पाहिल्यानंतर, आम्ही शेवटी हार पत्करली आहे, पुन्हा एडिट केलं आहे आणि सध्याचं एडिटेड व्हर्जन वापरण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही अनेक विनंत्या करूनही तू 'नानुम राउडी धान'मधील गाणी किंवा सीन कट किंवा अगदी फोटो वापरण्यास परवानगी नाकारली."

काय आहे संपूर्ण प्रकरण?

धनुषने परवानगी नाकारली आणि कॉपीराईट केस केल्यानंतर नयनताराचा राग अनावर झाला आणि अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक लांब पोस्ट शेअर करत धनुषला फटकारलं. नयनतारा गेल्या दोन वर्षांपासून 'नानुम राउडी धन' चित्रपटातील गाण्यांसाठी आणि व्हिज्युअलसाठी धनुषच्या ना-हरकत प्रमाणपत्राची वाट पाहत होती, पण धनुषने यासाठी नकार दिला. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ननुम राउडी धन' या चित्रपटाचा निर्माता धनुष होता. या चित्रपटामध्ये नयनतारा मूख्य भूमिकेत होती. हा चित्रपट 2015 साली ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटात नयनतारा अभिनेता विजय सेतुपतीसोबत दिसली होती. इतकंच नाही तर नयनताराचा पती विघ्नेश शिवनही या चित्रपटात होता.

View this post on Instagram
 
A post shared by N A Y A N T H A R A (@nayanthara)

नयनताराने धनुषला सुनावलं

अभिनेत्री नयनताराने ओपन लेटरमध्ये पुढे लिहिलं आहे की, "तुझ्यासारखा यशस्वी अभिनेता, जो वडील आणि भावामुळे झाला आहे, तुला हे वाचून, समजून घेणे आवश्यक आहे की, माझ्यासारख्या कलाकारांना जगण्याची संधी आहे. सिनेमा जगणं इतकं सोपं नाही, आज मी जे काही आहे, ते माझ्या मेहनतीमुळेच आहे, मी कोणाच्याही बळावर चित्रपटसृष्टीत आलेली नाही, मी माझ्या कामामुळे लोकांमध्ये ओळखली जाते आणि त्यात माझी काहीही चूक नाही. त्यामुळे माझी डॉक्युमेंट्री रिलीज होण्याची माझे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत, जी लवकरच प्रदर्शित होणार आहे."

नयनतारा : बियॉन्ड द फेयरी टेल

View this post on Instagram
 
A post shared by Netflix India (@netflix_in)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Urvashi Rautela : अभिनेता नाही 'या' खेळाडूंना डेट करण्याची उर्वशी रौतेलाची इच्छा; म्हणाली, 'लव्ह ट्रायँगलमध्ये...'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती

व्हिडीओ

Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Embed widget