(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Navra Maza Navsacha 2 : मुहूर्त ठरला! यंदा गणपतीपुळेचा प्रवास कोकण रेल्वेने होणार, 'या' दिवशी सुटणार 'नवरा माझा नवसाचा 2'ची गाडी
Navra Maza Navsacha 2 : नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाच्या रिलीज डेटची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.
Navra Maza Navsacha 2 : मागील अनेक दिवसांपासून एका सिनेमाची बरीच चर्चा सुरु आहे. नवरा माझा नवसाचा (Navra Maza Navsacha 2) या सिनेमाचा दुसरा भाग येणार असून प्रेक्षकांनाही या सिनेमाची बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. नुकतीच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली असून आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. येत्या 20 सप्टेंबर रोजी 'नवरा माझा नवसाचा 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच या सिनेमाचा एक टीझर रिलीज करण्यात आला आहे.
नवरा माझा नवसाचा 2 मध्ये अशोक सराफ, सिद्धार्थ जाधव, सचिन पिळगांवकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, सुप्रिया पिळगांवकर ही मंडळी दिसणार आहे. विशेष म्हणजे यंदाचा हा प्रवास कोकण रेल्वेने होणार आहे. त्यामुळे येत्या 20 सप्टेंबरपासून ही सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
19 वर्षांनी येणार सिनेमाचा सिक्वेल
सचिन पिळगावकर दिग्दर्शित "नवरा माझा नवसाचा" या गाजलेल्या चित्रपटानंतर तब्बल 19 वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल येणार आहे. येत्या 20 सप्टेंबर रोजी या सिनेमा सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे. एस टी बस प्रवासात "नवरा माझा नवसाचा" चित्रपटाची गोष्ट घडवल्यानंतर आता "नवरा माझा नवसाचा 2" चित्रपटाची कथा कोकण रेल्वे प्रवासात घडणार आहे.
अशोक सराफ टीसीच्या भूमिकेत
सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या "नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटाची निर्मिती, कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केलं आहे तर संवाद संतोष पवार यांचे आहेत.चित्रपटाच्या रिलीज डेटचा एक टीजर देखील सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याशिवाय "नवरा माझा नवसाचा चित्रपटात बस कंडक्टर असलेले अशोक सराफ आता "नवरा माझा नवसाचा 2"मध्ये तिकीट चेकर अर्थात टीसी झाले आहेत.
View this post on Instagram