National Film Awards Live: 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा सुरू... 'एकदा काय झालं?' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
National Film Awards Live: कोणते सेलिब्रिटी आणि चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार पटकाणार? हे जाणून घेण्यासाठी अनेक उत्सुक आहे.
LIVE
Background
National Film Awards Live: भारतातील चित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. आज म्हणजेच 24 ऑगस्ट 2023 रोजी 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा होणार आहे. कोणते सेलिब्रिटी आणि चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार पटकाणार? हे जाणून घेण्यासाठी अनेक खूप उत्सुक आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा देशातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कारांपैकी एक पुरस्कार आहे. या पुरस्काराची सुरुवात 1954 मध्ये झाली. 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा आज संध्याकाळी पाच वाजता केली जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून मल्याळम भाषेतील चित्रपट हे मोठ्या संख्येनं हिंदी चित्रपटांना टक्कर देत आहेत. यंदा नायट्टू आणि मिन्नाल मुरली या दोन चित्रपटांना अनेक श्रेणींमध्ये नामांकन आहे. तसेच राजमोली यांचा RRR हा चित्रपट देखील जोरदार टक्कर देणार आहे. ऑस्कर अवॉर्ड जिंकलेले संगीतकार एम.एम. कीरवणी हे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये देखील बाजी मारतात का? ते पाहावं लागेल.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या श्रेणीतील पुरस्कारासाठी आलिया भट्ट आणि कंगना राणौत यांच्या नावाची चर्चा होत आहे. तसेच अभिनेता राम चरणच्या चाहत्यांना आशा आहे की, यंदा RRR चित्रपटामधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळावा.
तसेच मल्याळम चित्रपटांबरोबरच काही हिंदी चित्रपट देखील राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. अभिनेत्री आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी तसेच रॉकेट्री, हे चित्रपट राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या शर्यतीत आहेत.
अनेक मल्याळम चित्रपट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारच्या शर्यतीत आहेत, जसे की 'नायट्टू', 'मिनल मुरली' आणि 'मेप्पडियन'. यामधील नायट्टू (Nayattu) या चित्रपटाचे दिग्दर्शन मार्टिन प्राकट यांनी केले आहे. या चित्रपटात जोजू जॉर्ज, कुंचको बोबन यांनी प्रमुख भूमिका साकारली. नायट्टू हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता 'नायट्टू' हा चित्रपट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर आपलं नाव कोरेल का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
अल्लू अर्जुन 'पुष्पा: द राइज - पार्ट 1' मधील अभिनयामुळे चर्चेत होता. आता राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या शर्यतीत त्याच्या नावाची चर्चा देखील होत आहे.
गेल्या वर्षी '68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' (68th National Film Awards 2022) सोहळा नवी दिल्लीत पार पडला होता. तान्हाजी, सूराराई पोट्ट्रू या चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आता यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा असल्यानं चित्रपटसृष्टी तसेच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
National Film Awards Live Updates : राष्ट्रीय पुरस्कारांची संपूर्ण यादी
बेस्ट नरगिस दत्त अवार्ड फॉर बेस्ट फिल्म ऑन नॅशनल इंटीग्रेशन- द कश्मीर फाइल्स
बेस्ट पॉप्युलर फिल्म- RRR
बेस्ट फीचर फिल्म- रॉक्ट्रेरी: द नंबी इफेक्ट
बेस्ट म्यूजिक डायरेक्शन- पुष्पा/ RRR
बेस्ट मेकअप आर्टिस्ट- गंगूबाई काठियावाड़ी
बेस्ट कॉस्ट्यूम डिजाइनर- सरदार उधम सिंह
बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस- पल्लवी जोशी (द कश्मीर फाइल्स)
बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर- पंकज त्रिपाठी (मिमी)
बेस्ट चाईल्ड आर्टिस्ट- भाविन रबारी
बेस्ट अॅक्ट्रेस- आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाड़ी), क्रीति सेनन (मिमी)
बेस्ट अॅक्टर- अल्लू अर्जुन (पुष्पा द राइज)
बेस्ट डायरेक्शन- निखिल महाजन (गोदावरी-द होली वाॅटर)
National Film Awards Live Updates : नर्गिस दत्त पुरस्कार
राष्ट्रीय एकात्मता सर्वोत्कृष्ट चित्रपट - द काश्मीर फाइल्स
National Film Awards Live Updates : फीचर फिल्म कॅटेगरी
बेस्ट अॅक्शन डायरेक्शन अवॉर्ड- RRR (स्टंट कोरियओग्राफर- किंग सोलोमन)
बेस्ट कोरिओग्राफी- RRR (कोरियओग्राफर- प्रेम रक्षित)
बेस्ट स्पेशल ईफेक्ट्स- RRR (स्पेशल इफेक्ट क्रिएटर- वी श्रीनिवास मोहन)
National Film Awards Live Updates : बेस्ट फीचर फिल्म
बेस्ट हिंदी फिल्म- सरदार उधम सिंह
बेस्ट गुजराती फिल्म- छेल्लो शो
बेस्ट कन्नड़ फिल्म- 777 चार्ली
बेस्ट मैथिली फिल्म- समांतर
बेस्ट मराठी फिल्म- Ekda Kay Zala
बेस्ट मल्लयाळम फिल्म- होम
बेस्ट तमिळ फिल्म- Kadaisi Vivasayi
बेस्ट तेलुगू फिल्म- Uppena
National Film Awards Live Updates : नॉन फीचर फिल्म
बेस्ट नरेशन व्हाईस ओवर आर्टिस्ट- Kulada Kumar Bhattacharjee
बेस्ट म्यूजिक डायरेक्शन-इशान दिवेचा
बेस्ट एडिटिंग- अभरो बनर्जी (If Memory Serves Me Right)
बेस्ट प्रोडक्शन साउंड रेकाॅर्डिस्ट - Meena Raag (Suruchi Sharama)
स्पेशल ज्युरी अॅवाॅर्ड - Rekha (Shekhar Bapu Rankhambe)
बेस्ट फिल्म आॅन फॅमिली व्हॅल्यू - 'चंद सांसे' लघुपट
(निर्माता चंद्रकांत कुलकर्णी)
(दिग्दर्शिका प्रतिमा जोशी)