एक्स्प्लोर

'हा तो देश नाही जिथे मी मोठा झालो', नसरुद्दीन शाह यांचा मोदी सरकारवर निशाणा, ज्येष्ठ अभिनेते स्पष्टच बोलले?

Naseeruddin Shah: मुंबई विद्यापीठातील एका कार्यक्रमातून ऐनवेळी आपले नाव काढून टाकण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Naseeruddin Shah: नसीरुद्दीन शाह केवळ त्यांच्या अभिनयासाठीच नव्हे, तर त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी स्वतःसोबत घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबई विद्यापीठातील एका कार्यक्रमातून ऐनवेळी आपले नाव काढून टाकण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कार्यक्रमाच्या आदल्या रात्रीच नकार

नसीरुद्दीन शाह यांनी या संपूर्ण प्रकरणावर इंडियन एक्सप्रेसमध्ये लेख लिहून आपले मत मांडले आहे. या लेखात त्यांनी सांगितले की, मुंबई विद्यापीठात होणाऱ्या कार्यक्रमासाठी ते उत्सुक होते, कारण विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची त्यांना संधी मिळणार होती. उर्दू विभागाने 1 फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र 31 जानेवारीच्या रात्री त्यांना कळवण्यात आले की आता त्यांना कार्यक्रमाला येण्याची गरज नाही. यामागे कोणतेही कारण देण्यात आले नाही, तसेच माफीही मागण्यात आली नाही.

शाह यांनी आरोप केला की, नंतर विद्यापीठाने उपस्थितांना सांगितले की त्यांनी स्वतः येण्यास नकार दिला होता, जे पूर्णपणे खोटे होते. विद्यापीठाकडे साधं सत्य बोलण्याचे धैर्य नसावे, असेही त्यांनी म्हटले.

‘मी कधीच देशाबद्दल वाईट बोललो नाही’

अभिनेत्याने पुढे सांगितले की, विद्यापीठातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ते देशविरोधी वक्तव्य करतात, असे सांगितल्याने त्यांना कार्यक्रमाला येण्यास नकार देण्यात आला. यावर शाह म्हणाले, “जर त्या अधिकाऱ्यांना असे वाटत असेल, तर मी त्यांना आव्हान देतो की माझे एक तरी वक्तव्य दाखवावे, ज्यात मी देशाबद्दल वाईट बोललो आहे.” ते पुढे म्हणाले, “मी सरकारच्या अनेक निर्णयांवर टीका करतो आणि पुढेही करत राहीन. जे मुद्दे मला आणि माझ्यासारख्या लोकांना त्रास देतात, त्यावर मी आवाज उठवत आलो आहे.”

'तिरस्कार  अखेर किती काळ?’

लेखाच्या शेवटी नसीरुद्दीन शाह यांनी प्रश्न उपस्थित केला. हा तिरस्कार अखेर किती काळ चालणार? “हा तो देश नाही, जिथे मी मोठा झालो आणि ज्यावर प्रेम करायला मला शिकवण्यात आलं. आज सर्वत्र नजर ठेवली जाते, विचारांवर पहारा आहे आणि तिरस्काराचं वातावरण आहे. जी तिरस्कार पूर्वी दोन मिनिटांची होती, ती आता 24 तासांची झाली आहे,” असे त्यांनी म्हटले. जॉर्ज ऑरवेल यांच्या ‘1984’ या कादंबरीचा उल्लेख करत त्यांनी आजची परिस्थिती त्यासारखीच असल्याचा सांगत आज एखाद्या मोठ्या नेत्याचं कौतुक न करणंही देशद्रोह मानलं जात नाही का? प्रश्न उपस्थित केला. कामाच्या आघाडीवर पाहिल्यास, नसीरुद्दीन शाह गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘गुस्ताख इश्क’ या चित्रपटात झळकले होते. या चित्रपटात त्यांनी एका शायरची भूमिका साकारली होती. त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘अस्सी’चा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
Imran Khan Stepfather Raj Zutshi Bollywood Actor: ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका, ओळखलं का कोण?
ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका
Nana Patekar Son Malhar On Tanushree Dutta Allegation: मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
Embed widget