एक्स्प्लोर

Nana Patekar : ह्यांना कळत कसं नाही, मरणार आहात एक दिवस, जाणार आहात तुम्ही...; राजकीय नेत्यांवर नाना पाटेकरांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

Nana Patekar : नाना पाटेकर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राजकीय नेत्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Nana Patekar on Politicians :  मागच्या काही काळात महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय, हे अगदी वारंवार म्हटलं जातंय. या राजकीय परिस्थितीवर अगदी सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांनी भाष्य केलं. त्याचप्रमाणे ही परिस्थिती सुधारण्याची गरज असल्याचंही अनेकजण म्हणतात. पण ही परिस्थिती सुधारण्यासाठीचे प्रयत्न मात्र कुणाकडूनच होत नाही, हेही तितकंच खरंय. आता या सगळ्यावर अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी भाष्य करत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी नुकतीच बोल भिडू या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये नानांनी राजकीय नेत्यांना अगदी कठोर शब्दांत खडेबोल सुनावले असल्याचं पाहायला मिळालंय. तसेच नानांनी नागरिकांनाही आवाहन केलंय. ह्यांना कळत कसं नाही, मरणार आहात एक दिवस, जाणार आहात तुम्ही..., असं म्हणत नानांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

नाना पाटेकरांनी काय म्हटलं?

राजकीय नेत्यांवर भाष्य करताना नाना पाटेकरांनी म्हटलं की, आरश्यात बघताना स्वत:ची किळस आली की समजायचं जगण्यातली गंम्मत संपलीये. आमच्या बऱ्याचश्या राजकीय मंडळींनी वाटतं त्यांच्या घरातले आरसे फोडून टाकलेत. कधीतरी चुकून जेव्हा तहान लागल्यावर पाण्यामध्ये पाहतील तेव्हा लक्षात येईल आपलं माकड कधी झालं? तेव्हा ह्यांना कळत कसं नाही, मरणार आहात एक दिवस, जाणार आहात तुम्ही...

पुढे त्यांनी म्हटलं की, आता त्यांना पुन्हा नव्याने आरसे दाखवायला पाहिजेत. ते आपल्या हातामध्ये आहे.एकदा मत दिलं की आता पाच वर्ष आपल्याला काहीही करत येणार नाही,असं काही नाहीये.. जेव्हा जेव्हा जिथे जिथे विसंगती दिसली, वाईट दिसेल तेव्हा तेव्हा तिथे जा... जाळपोळ करा, गाड्या फोडा असं नाही.. तिथे जा, एकट्याने जा, दुकट्याने जा आणि प्रश्न विचारा... तुम्हाला घाबरणं जे त्यांचं थांबलंय ना.. ते पुन्हा घाबरायला हवं त्यांनी...ज्या दिवशी हे पुन्हा सुरु होईल ना त्यादिवशी राजकीय भोवताल बदलेल...

नाना पाटेकरांचा वनवास सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला 

नाना पाटेकरांचा वनवास हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सध्या ते सगळीकडे प्रोमोशनसाठी फिरत आहेत.दरम्यान, नाना पाटेकर यांच्या वनवास या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं आहे. उत्कर्ष शर्मा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. 20 डिसेंबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहात पाहता येणार आहे.       

ही बातमी वाचा : 

Marathi Movie : हॉलीवूड आणि बॉलीवूड गाजवलेला लक्षवेधी चेहरा मराठी सिनेसृष्टीत? 'या' सिनेमाने उत्सुकचा शिगेला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget