Mrunal Dusanis : शंशाक केतकर आणि मृणाल दुसानिसच्या भेटीमागचं खरं कारण अखेर समोर, अभिनेत्री म्हणाली, 'ती भेट अगदीच...'
Mrunal Dusanis : अभिनेत्री मृणाल दुसानिस ही भारतात आल्यानंतर तिचा सहकलाकार शशांक केतकरला भेटली होती. त्यांची ही भेट सोशल मीडियावर बरची व्हायरल देखील झाली.
![Mrunal Dusanis : शंशाक केतकर आणि मृणाल दुसानिसच्या भेटीमागचं खरं कारण अखेर समोर, अभिनेत्री म्हणाली, 'ती भेट अगदीच...' Mrunal Dusanis revealed reason behind her meeting with co star Shashank Ketkar Entertainment Television Marathi detail marathi news Mrunal Dusanis : शंशाक केतकर आणि मृणाल दुसानिसच्या भेटीमागचं खरं कारण अखेर समोर, अभिनेत्री म्हणाली, 'ती भेट अगदीच...'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/13/915fab28edec4b9f0bdd6529a5eaf5261715609858164720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mrunal Dusanis : अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) ही आता तब्बल चार वर्षांनी मायदेशी परतली आहे. भारतात आल्यानंतर मृणालने आता पुन्हा एकदा दमदार कमबॅक करण्याची इच्छा देखील व्यक्त केली. मृणाल भारतात परतल्यापासून ती तिच्या अनेक सहकलाकारांची भेट घेत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच काही दिवसांपूर्वी तिने अभिनेता शशांक केतकरची (Shashank Ketkar) भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीचा फोटो सोशल मीडियावरही तुफान व्हायरल झाला होता.
शशांक आणि मृणाल या दोघांनी कलर्स मराठी वाहिनीवरील हे मन बावरे या मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्यांची ही जोडी प्रेक्षकांच्या देखील तितकीच पसंतीस उतरली होती. इतकचं नव्हे तर त्यांना सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार देखील मिळाला होता. मालिका संपल्यानंतरही चाहते त्यांच्या लाडक्या जोडीला खूप मिस करत होते. पण या दोघांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा चाहते त्यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक झालेत.
मृणालने सांगितलं शशांकसोबतच्या भेटीमागचं खरं कारण
मृणालने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शशांक आणि तिच्या भेटीमागचं खरं कारण सांगितलं आहे. यावेळी मृणालला विचारण्यात आलं की, तुझी आणि शशांकची भेट कशासाठी झाली होती. त्यावर मृणालने म्हटलं होतं की, ती अगदीच सहज अशी भेट होती. माझ्याकडेही आमचा तो फोटो होता, पण मी तो पोस्ट करणार नव्हते. मात्र त्याने अचानक तो फोटो पोस्ट केला आणि त्याने मला त्या पोस्टवर कोलॅबोरेशनसाठी इनव्हाईटही केलं. पण आमची ती भेट बरीच व्हायरल झाली. मलाही ते अपेक्षित नव्हतं. मी चार वर्षांनी परत आल्यानंतर शशांकला भेटले, त्याच्या बायकोला भेटले, त्याच्या मुलाला भेटले. त्यानंतर मलाही ते छान वाटलं, माझे जुने दिवस मला आठवले.
शशांकने पोस्ट केला मृणालसोबतचा फोटो
दरम्यान शशांक केतकरने त्याचा मृणालसोबतचा फोटो पोस्ट केला होता. यावर त्याच्या कॅप्शनने विशेष लक्ष वेधून घेतलं होतं. शशांकने पोस्ट करत या फोटोला कॅप्शन दिलं होतं की, सिद्धार्थ मिट्स अनु.. मृणाल वेलकम बॅक. हे मन बावरे मालिका संपून 4 वर्ष झालीत पण अजूनही परत परत बघतो अशी प्रतिक्रिया अनेकदा मिळते, आजही! मग मंडळी ही जोडी पुन्हा बघायला आवडेल का? शशांकच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या होत्या. तसेच त्यांच्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)