एक्स्प्लोर

Krushnaichya Leki: 22व्या वर्षी झी मराठीवर मोठी संधी; निवेदिता सराफ यांच्या मालिकेत साईदत्त साकारणार 'ही' भूमिका

Sai Datt Bali Joins Krushnaichya Leki: साई दत्त बाली 'कृष्णाईच्या लेकी' या मालिकेतून झी मराठीवर पदार्पण करत आहे.

Krushnaichya Leki Serial: ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांची मध्यवर्ती भूमिका असलेली 'कृष्णाईच्या लेकी' (Krushnaichya Leki) ही मालिका लवकरच 'झी मराठी'वर (Zee marathi) प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या मालिकेच्या निमित्तानं साईदत्त बाली या तरुण अभिनेत्याला 'झी मराठी'च्या मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळालीये. 

'कृष्णाईच्या लेकी' या मालिकेत साईदत्तला कृष्णाईच्या सावत्र लेकाची म्हणजे जीत ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली आहे.  कृष्णाईच्या मध्यवर्ती भूमिकेत निवेदिता सराफ आहेत. अभिनेत्री साक्षी गांधी ही साईदत्तच्या सख्ख्या आईच्या आणि अभिनेते संजय कुलकर्णी त्याच्या वडीलांच्या भूमिकेत आहेत. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी झी मराठीवर एवढ्या अनुभवी कलावंतांसोबत काम करण्याची संधी मिळाल्यानं साईदत्त भारावून गेला आहे.

साईदत्तची मनातील भावना, मालिकेबद्दल नेमकं काय म्हणाला? (Sai Datt Bali debut in Krushnaichya Leki)

'ही भूमिका माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मला 'झी मराठी'वर काम करण्याची पहिली संधी मिळाली, हे माझं भाग्य', असं साईदत्त अभिमानानं सांगत होता. 'सोनी मराठी'वर कारण गुन्ह्याला माफी नाही, 'स्टार प्रवाह'वर अबोली, 'कलर्स'वर बाळूमामाच्या नावानं चांगभलं आणि 'सन मराठी'वर संसार माझा रेखिते या मालिकांमधून साईदत्तनं आपल्या अभिनयाची छाप सोडलीये. 

'कृष्णाईच्या लेकीसाठी ऑडिशनची ऑफर आली आणि स्वप्न साकार करण्याची संधी मिळाली', असं त्यानं सांगितलं. पूजा कुलकर्णी यांनी जीत या व्यक्तिरेखेची दिलेली कल्पना आणि ते साकारण्याच्या दृष्टीनं दिलेली दिशा याबद्दल साईदत्त त्यांचे खूप आभार मानतो. आपल्यासाठी ही ऑडिशन आव्हानात्मक होतीच, पण त्यातून खूप काही शिकायलाही मिळालं, असंही तो सांगतो.

साईदत्त बाली हा मूळचा प्रभादेवीचा हरहुन्नरी कलाकार. दादरच्या कीर्ती कॉलेजनं त्याच्या गुणवत्तेला खऱ्या अर्थानं पैलू पाडले. पण साईदत्तला अभिनयाची आवड ही बालपणापासूनच होती. त्या वयापासूनच नाना पाटेकर यांच्या अभिनय शैलीचा त्याच्यावर प्रभाव होता. तो कळत नकळत त्यांच्या संवादफेकीची, त्यांच्या आवाजाची नक्कल करू लागला. तिथंच त्याच्यातला मिमिक्री आर्टिस्ट घडू लागला. नाना पाटेकरांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करता करता साईदत्त वीसेक नामवंत अभिनेत्यांच्या आवाजात मिमिक्री करू लागला.

साईदत्तला या प्रवासात त्याच्या आईची लाभली मोलाची साथ (Sai Datt Bali role in Zee Marathi show)

साईदत्तला या प्रवासात त्याच्या आईची मोलाची साथ लाभली. तिनं त्याच्यातल्या प्रतिभेवर विश्वास ठेवला आणि त्याला प्रोत्साहनही दिलं. त्यामुळंच त्याची अभिनयक्षेत्राची आवड वाढत गेली. आधी एकांकिका, मग एकपात्री प्रयोग आणि त्यानंतर नाटकं करता करता साईदत्तला टेलिव्हिजन मालिकांमधून काम करण्याची संधी मिळाली. कलाक्षेत्रात रोज रोज छोटी छोटी शिखरं चढत असताना साईदत्तनं शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं नाही. तो दादरच्या कीर्ती कॉलेजात पदवीच्या दुसऱ्या वर्षाला आहे. आयुष्यात शिक्षण आणि शूटिंग यांचा समतोल साधण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Celebrity India 🇮🇳 (@celebrity_.india)

अभिनेते रोहित परशुराम यांनी अनेक बारीकसारीक गोष्टी समजावून दिल्या, दिग्दर्शक अनिकेत साने, विशाल कुंभार आणि अमित पारकर यांनी वेळोवेळी पाठीवर विश्वासाचा हात ठेवला. त्यामुळं सुरुवातीचं दडपण कधीच दूर झालीय आणि आता नवनवीन गोष्टी शिकायला खूप मजा येतेय, असं साईदत्त सांगतो.

एकीकडे कॉलेजचं शिक्षण आणि दुसरीकडे अभिनयाचं शिक्षण करत करत साईदत्त बालीचा मनोरंजनविश्वातला प्रवास आता एका वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. अजून त्याला खूप मोठा पल्ला गाठायचाय. पण जन्मदात्या आईचं प्रोत्साहन आणि कीर्ती कॉलेजनं दिलेल्या आत्मविश्वासाचं बळ गाठीशी घेऊन साईदत्त बाली त्या मोहिमेवर निघालाय.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

वडिलांना सांगितलं 10 मिनिटांत येतो, पण नियतीच्या मनात...पत्नीला माहेरी सोडून परतल्यानंतर प्रसिद्ध इन्फ्लुएंसरचा अपघाती मृत्यू

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dil Chahta Hai: 'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Aata Hou De Dhangana: ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पाचव्या पर्वात मोठा ट्विस्ट!यंदा कलाकारांची धमाल रंगणार चक्क बेटावर, नेमकं काय होणार?
‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पाचव्या पर्वात मोठा ट्विस्ट!यंदा कलाकारांची धमाल रंगणार चक्क बेटावर, नेमकं काय होणार?
Toxic Siddharth Malhotra Post: 'टॉक्सिक'मधल्या इंटिमेट सीनवरून कियारा ट्रोल होताना दिसताच सिद्धार्थ मल्होत्राची पोस्ट; ट्रोलर्सची बोलती बंद, म्हणाला...
'टॉक्सिक'मधल्या इंटिमेट सीनवरून कियारा ट्रोल होताना दिसताच सिद्धार्थ मल्होत्राची पोस्ट; ट्रोलर्सची बोलती बंद, म्हणाला...
Advertisement

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Embed widget