एक्स्प्लोर

Marathi Movie Bhushan Manjule : 'रील स्टार' चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून झळकणार फ्रेश चेहरा; नागराज मंजुळेसोबत आहे खास कनेक्शन

Marathi Movie Bhushan Manjule : या चित्रपटात आता मुख्य अभिनेता म्हणून नवीन चेहरा झळकणार आहे. या नव्या हिरोचे दिग्दर्शक नागराज मंजुळेसोबत खास नातं आहे.

Marathi Movie Bhushan Manjule : मराठी सिनेसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांची निर्मिती होत असते. काही चित्रपट हे पूर्णपणे मनोरंजन करणारी विनोदी धाटणीचे असतात. तर, काही मनोरंजनासोबतच प्रबोधन करणारेही असतात. समाजातील वास्तव चित्र दाखवणाऱ्या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. या चित्रपटात आता मुख्य अभिनेता म्हणून नवीन चेहरा झळकणार आहे. या नव्या हिरोचे दिग्दर्शक नागराज मंजुळेसोबत (Nagraj Manjule) खास नातं आहे. 

'रीलस्टार' या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे दुसरे शेड्यूल सध्या सुरू आहे. या चित्रपटात आजवर काही गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारणारा  भूषण हा मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारणार आहे. अभिनेता भूषण मंजुळे (Bhushan Manjule)  हा सुप्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे यांचा भाऊ आहे. 'रीलस्टार'ची निर्मिती जे 5 एन्टरटेन्मेंट आणि इनिशिएटिव्ह फिल्म या बॅनर्सखाली करण्यात येत आहे. मराठीसह हिंदीतही रिलीज झालेल्या मल्टिस्टारर 'अन्य' या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शक सिम्मी जोसेफ आणि रॅाबिन वर्गिस 'रीलस्टार'चे दिग्दर्शन करीत आहेत. 'रीलस्टार'च्या माध्यमातून एक वेगळा विषय हाताळण्याचं शिवधनुष्य उचलण्यात आले आहे. अशा महत्त्वपूर्ण चित्रपटात नायकाची भूमिका साकारण्याची संधी भूषण मंजुळेला मिळाली आहे. 

भूषणने यापूर्वी 'फँड्री', 'सैराट', 'कारखानिसांची वारी', 'घर बंदूक बिर्याणी' या मराठी चित्रपटांसोबतच 'झुंड' या हिंदी चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याची व्यक्तिरेखा साकारली आहे. आता, 'रीलस्टार'च्या निमित्ताने तो प्रथमच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आजवर भूषणने साकारलेल्या व्यक्तिरेखांचं नेहमीच कौतुक करण्यात आलं आहे. त्यामुळे 'रीलस्टार'मधील भूमिकाही प्रेक्षकांच्या अपेक्षा असणार आहेत. या चित्रपटासाठी भूषण कसून मेहनत घेत असून, आपल्या व्यक्तीरेखेतील बारकावे कॅमेऱ्यासमोर सादर करण्यासाठी सर्वतोपरी अभ्यास करत आहे. भूषणच्या निवडीबाबत सिम्मी जोसेफ म्हणाले की, आम्हाला नायकाच्या भूमिकेसाठी एक फ्रेश चेहरा हवा होता, मात्र हा प्रेक्षकांना नवखाही वाटता कामा नये. भूषणने आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं असल्यानं प्रेक्षकांना तो ठाऊक आहे. त्याची अभिनयशैली उत्तम असून, या चित्रपटातील नायकाला तो व्यवस्थित न्याय देऊ शकेल याची खात्री असल्याने भूषणची निवड केली गेली असल्याचे सिम्मी यांनी सांगितले.  एका वेगळ्या धाटणीचं कथानक असलेल्या चित्रपटाद्वारे नायकाच्या रूपात रसिकांसमोर येण्याची संधी मिळाल्याने त्याने 'रीलस्टार'ची आॅफर आनंदानं स्वीकारली. यासाठी सध्या तो कसून मेहनत घेत असल्याचेही ते म्हणाले. 

'रीलस्टार'ची  पटकथा-संवादलेखन रॉबिन वर्गीस आणि सुधीर कुलकर्णी यांनी केलं आहे. भूषणसोबत यात उर्मिला जगताप, प्रसाद ओक, रुचिरा जाधव, मिलिंद शिंदे, स्वप्नील राजशेखर, सुहास जोशी, विजय पाटकर, कैलास वाघमारे, महेश सुभेदार, शिवाजी पाटने, महेंद्र पाटील, दीपक पांडे, गणेश रेवडेकर, अभिनव पाटेकर आदी कलाकार आहेत.
बालकलाकार अर्जुन गायकर, तनिष्का म्हाडसे यांनी 'रीलस्टार'मध्ये साकारलेल्या भूमिकाही महत्त्वाच्या आहेत. 

सिनेमॅटोग्राफर शिनोब यांनी सिनेमॅटोग्राफी, तर राहूल शर्मा यांनी प्रॉडक्शन डिझाईन केलं आहे. महेंद्र पाटील या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर तसेच नंदू आचरेकर सहदिग्दर्शक आहेत. गुरु ठाकूर, मंदार चोळकर व प्रशांत जामदार यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार विनू थॅामस यांनी संगीतबद्ध केले आहे. रंगभूषा भागवत सोनावणे यांनी केली असून, वेशभूषा राणी वानखडे यांनी केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशाराOmraje Nimbalkar Speech Dharashiv : माझ्याही वडिलांची हत्या झाली होती.. आक्रोश मोर्चातील भावनिक भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Embed widget