एक्स्प्लोर

Marathi Cinema Paani Received 25 Awards: मराठवाड्याच्या जलदूताची कहाणी रुपेरी पडद्यावर झळकली, 'पाणी' सिनेमानं 25 पुरस्कारांवर मोहोर उमटवली; प्रियांका चोप्राशी खास कनेक्शन

Marathi Cinema Paani Received 25 Awards: 'पाणी'नं आजवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार, विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये 25 मानाचे पुरस्कार पटकावले आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा प्रमुख विभागांचा समावेश आहे.

Marathi Cinema Paani Received 25 Awards: राजश्री एंटरटेनमेंटनं आता 'पाणी' (Paani Movie) चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला असून त्यांनी पर्पल पेबल पिक्चर्स आणि कोठारे व्हिजन प्रा. लि. यांच्या सहकार्यानं 'पाणी'ची निर्मिती केली आहे. राजश्री एंटरटेनमेंटचा हा पहिलाच मराठी चित्रपट असून त्यांनी पदार्पणातच इतिहास रचला आहे. आदिनाथ कोठारे दिग्दर्शित हा चित्रपट मराठवाड्याच्या 'जलदूत' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमंत केंद्रे यांच्या जीवनावर आधारित आहे. हा केवळ एक बायोपिक नसून समाजाला पाण्याचं महत्त्व पटवून देणारा एक सशक्त आणि संवेदनशील चित्रपट आहे. 'पाणी'नं आजवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार, विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये 25 मानाचे पुरस्कार पटकावले आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा प्रमुख विभागांचा समावेश आहे. या यशामुळे 'पाणी' हा चित्रपट वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला मराठी चित्रपट ठरला आहे. 

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाला 'पर्यावरण संरक्षण/संरक्षणावरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म'साठी '66 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' देण्यात आला. तर न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये आदिनाथ कोठारे याला सर्वोत्कृष्ट कलाकाराचा पुरस्कार मिळाला. नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात 'पाणी'ला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन, सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर या विभागात पुरस्कार मिळाले. झी चित्र पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट गीतकार, सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रण, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक तर रेडिओ सिटी सिने अवॉर्ड मराठी - सिझन 8 मध्ये सर्वोत्कृष्ट गायक, सर्वोत्कृष्ट चित्रपट हे पुरस्कार पटकावले. म. टा. सन्मानमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट गीतकार असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. एनडीटीव्ही मराठी अवॉर्ड्समध्ये 'पाणी'नं सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट संकलन विभागात बाजी मारली. 

दिग्दर्शक आदिनाथ कोठारे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलंय की, "या यशाचे श्रेय संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांना जातं. प्रेक्षकांनी आम्हाला जे प्रेम दिलं, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. नेहा बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॉ. मधू चोप्रा, सिद्धार्थ चोप्रा यांचे मनापासून धन्यवाद. त्यांच्यामुळेच आज हे शक्य होऊ शकले.'' 

'पाणी' सिनेमा कुठे पाहायला मिळणार? 

ज्यांना 'पाणी' चित्रपटगृहात पाहायची संधी मिळाली नाही, त्यांना हा चित्रपट आता अमेझॉन प्राईमवर मराठीसह हिंदी भाषेतही उपलब्ध आहे. सामाजिक विषयावर आधारित असला तरी, या चित्रपटात मनोरंजन, संगीत, आणि उत्तम अभिनयाची त्रिवेणी अनुभवता येणार आहे. 

आदिनाथ कोठारे दिग्दर्शित 'पाणी' चित्रपटात आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाची कथा नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची असून नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॉ. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत.

पाहा ट्रेलर : 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ghanshyam Darwade Talk About His Health: 'मला जन्मापासूनच लिव्हर, फुफ्फुसं आणि किडनीचा त्रास...'; पाणावलेल्या डोळ्यांनी घनःश्याम दरवडेनं सगळंच सांगितलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Eknath Shinde : गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते गांडूळाने फणा काढायचा नसतो
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीसच ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीसच ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
Shubman Gill : शुभमन गिलचं दोन मॅचवरुन परिक्षण करणार असाल तर अवघड होईल, गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहराची रोखठोक भूमिका
एक दोन मॅचमध्ये चांगली कामगिरी नसल्यास बदलाची मागणी करणार असाल तर अवघड होईल, गिलच्या समर्थनार्थ नेहराची बॅटिंग
Embed widget