एक्स्प्लोर

Priya Bapat : 'त्या' दिवसांत नवऱ्याची साथ महत्वाची : प्रिया बापट

'आणि काय हवं' चा तिसरा सिझन प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिझनमध्ये त्यांचं नातं आणखीनंच खुलताना दिसणार आहे.

मुंबई : 'आणि काय हवं' चा तिसरा सिझन प्रदर्शित झाला असून त्याच्या पहिल्या दोन सिझनप्रमाणेच तिसरा सिझनही प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. विशेष म्हणजे या वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याबरोबरच नवरा-बायकोचं नातं छोट्या-छोट्या गोष्टींतून अधिक कसं बहरेल, या संबंधित अनेक विषयांना हळुवार स्पर्श करण्यात आला आहे. एकत्र खरेदी करण्यापासून ते एखादा छंद एकत्र जोपासण्यापर्यंतचे अनेक छोटे छोटे आनंदाचे क्षण यात दाखवण्यात आले आहेत. अगदी मासिक पाळीसारखा नाजूक विषयही खूप सहजरित्या हाताळण्यात आला आहे. आपल्याकडे 'पिरीएड्स' हा शब्द चारचौघात बोलतानाही अनेकदा ओशाळल्यासारखे होते. मात्र हा विषयही इथे कोणताही संकोच न बाळगता अतिशय सुंदर, साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या समोर मांडला आहे. 

जुई आणि साकेत एका समारंभाला जाण्यासाठी निघतात आणि  जुईला 'पिरीएड्स' आल्याचं लक्षात येतं. त्यानंतर जुईचे मूड स्विंग्स, साकेतला तिच्याबद्दल वाटणारी काळजी, लहानपणीच्या मासिक पाळी संबंधीच्या दोघांच्या आठवणी, सॅनिटरी पॅड हे अगदी छान आणि हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आले आहे. या नाजूक विषयाला कुठेही धक्का लागणार नाही आणि कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेत लेखक, दिग्दर्शक वरूण नार्वेकर यांनी हा विषय प्रेक्षकांसमोर आणला आहे. 

Priya Bapat : 'त्या' दिवसांत नवऱ्याची साथ महत्वाची : प्रिया बापट

'आणि काय हवं' मध्ये  'पिरीएड्स' सारखा विषय हाताळण्याबद्दल प्रिया आणि उमेश म्हणतात, ''जेव्हा आम्हाला कळले की, 'पिरीएड्स' सारखा विषय आपण प्रेक्षकांसमोर मांडणार आहोत, तेव्हा जरा आम्ही साशंक होतो की, प्रेक्षक हा विषय कसा स्वीकारतील, परंतु जेव्हा आम्ही स्क्रिप्ट पाहिली आणि त्याचे  शूट पूर्ण केले तेव्हा ती शंका नाहीशी झाली. इतक्या सहजरित्या तो आम्ही चित्रित केला. वरुणने हा विषय अगदी छान पद्धतीने हाताळला आहे. या दिवसांत नवऱ्याची साथ किती महत्वाची असते, हे खूपच छान मांडले आहे. कोणताही विषय अगदी सहजपणे मांडणे, ही वरुणची खासियत आहे.''

एमएक्स प्लेअर आणि मिर्ची ओरिजनल्स क्रिएशन निर्मित 'आणि काय हवं'च्या तिसऱ्या सिझनचे सहा भाग असून ते प्रेक्षकांना एमएक्स प्लेअरवर विनामूल्य पाहता येतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले

''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Naresh Mhaske Full Speech Thane Sabha: राज ठाकरेंनी माझ्यावर हात ठेवला नसता तर...Shrikant Shinde Full Speech : शिवसेना-मनसे फेव्हिकॉल का मजबूत जोड,  राज ठाकरेंसमोर जोरदार भाषणRaj Thackeray on Shivsena Stage Thane  : 19 वर्षांनी राज ठाकरेंचं शिवसेनेच्या मंचावर पहिलं पाऊल....Raj Thackeray Thane Speech : शिवसेनेचा मंच, बाळासाहेबांची स्टाईल! राज ठाकरेंकडून भाषणाची सरुवात कशी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात

अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख

तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार

Embed widget