Marathi Actress:समृद्ध संपन्न पहिली वहिली वारी! आषाढी वारीत भारावली लोकप्रिय अभिनेत्री; पहिल्या वारीचा अनुभव चर्चेत
वारीनंतर तिने तिचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला असून, हा प्रवास आयुष्यातील सर्वात समृद्ध करणाऱ्या अनुभवांपैकी एक असल्याचे तिने म्हटले आहे.

Marathi Actress In Aashadhi Wari:गेल्या काही वर्षांत कलाकारांमध्ये वारीबद्दलचं आकर्षण वाढताना दिसत आहे. अनेक अभिनेते आणि अभिनेत्री वारीत सहभागी होत भक्ती, सेवा आणि समतेचा संदेश देताना दिसतात. प्रत्येकाची वारी वेगळी असली तरी ती प्रत्येकाला आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव देऊन जाते. यंदाच्या वारीत अनेक कलाकारांनीही सहभाग घेतला होता. अभिनेत्री अक्षया नाईक हिनेही यंदा आयुष्यातील पहिली वारी करत विठुरायाच्या चरणी नतमस्तक झाली. वारीनंतर तिने तिचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला असून, हा प्रवास आयुष्यातील सर्वात समृद्ध करणाऱ्या अनुभवांपैकी एक असल्याचे तिने म्हटले आहे.
काय म्हणाली अक्षया नाईक?
वारीबद्दलच्या भावना व्यक्त करताना अक्षया म्हणाली,“ वारी बद्दल कायम मनात एक उत्सुकता होती कधीतरी आपण सुद्धा असंच बाकी वारकरी मंडळीसोबत वारी अनुभवू शकू का? हा प्रश्न कायम मनात होता आणि यंदा अचानक का होईना पण पांडुरंगाचं बोलवणं हे आल आणि मी माझ्या आयुष्यातली पहिली वहिली वारी अनुभवली. वारीत चालणारी मंडळी बघून त्यांचा मध्ये एवढी ऊर्जा कशी येत असावी हे वारीत जाऊन अनुभवता आल हा समृद्ध संपन्न अनुभव शब्दांत मांडूच शकत नाही कारण अस म्हणतात वारी ही अनुभवावी लागते आणि हा प्रत्यय वारी करून आला. टाळ मृदुगांचा गजर, हरिनामाचा जप आणि वारी मधला उत्साह हा शब्दाच्या पलीकडचा आहे. वारीत जाऊन मला विठ्ठल रुखमिणी रूपी आलेल्या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी देखील मिळाली आणि माझी वारी सुफळ संपूर्ण झाली”

समृद्ध संपन्न पहिली वहिली वारी !
वारीत अविरत चालणारी मंडळी आणि विठ्ठल माऊलीचे सेवाकरी आणि त्यांचा सोबतीने कधीतरी आपण सुद्धा वारी करावी अस मनात असलेली एक इच्छा आणि यंदाच्या वारीत अभिनेत्री अक्षया नाईक ची हीच इच्छापूर्ती माउलीच्या आशीर्वादाने पूर्ण झाली. अक्षयाने तिच्या पहिल्या वहिल्या वारीचा अनुभव शेयर केला असून अक्षया सांगते.अनेक कलाकार मंडळी सध्या वारीला जातान बघायला मिळतात प्रत्येकाच्या नशिबी आलेली वारी ही सारखी नसली तरी ती वेगळा पण अद्भुत अनुभव देणारी मात्र नक्कीच आहे यात शंका नाही.






















