एक्स्प्लोर

Vidyadhar Joshi On PM Narendra Modi: 'आरशात बघून Acting करायला लागेल...'; PM मोदींच्या वर्क फ्रॉम होमच्या आवाहनानंतर मराठी अभिनेत्याची खोचक प्रतिक्रिया

Vidyadhar Joshi On PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केल्यानंतर मराठी अभिनेत्यानं मोदींच्या आवाहनावर उपहासात्मक पोस्ट शेअर करुन प्रश्न उपस्थित केले आहेत. 

Vidyadhar Joshi On PM Narendra Modi: देशासमोरील जागतिक आर्थिक आव्हानांच्या (Global Economic Challenge Facing The Nation) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासीयांना महत्त्वाचं आवाहन केलंय. पुढील एक वर्ष सोनं खरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा (Petrol and Diesel Prices) वापर कमी करा, खाद्यतेलाची बचत करा आणि अनावश्यक परदेश दौरे पुढे ढकला, असं आवाहन त्यांनी केलंय. त्यामागे केवळ बचतीचा संदेश नसून भारताच्या अर्थव्यवस्थेला (India's Economy) स्थैर्य देण्याचं मोठं आर्थिक गणित दडलेलं आहे. भारत दरवर्षी परदेशातून प्रचंड प्रमाणात कच्चे तेल (Crude Oil) आणि सोनं (Gold Rate) आयात करतो. या आयातीसाठी मोठ्या प्रमाणावर डॉलरमध्ये पैसे मोजावे लागतात. त्यामुळे परकीय चलन साठ्यावर ताण येतो, रुपयावर दबाव वाढतो आणि आयात अधिक महाग होते. अशा परिस्थितीत नागरिकांनी स्वेच्छेनं वापर कमी केल्यास देशाला अब्जावधी डॉलरची बचत होऊ शकते. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आवाहन केल्यानंतर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता एका मराठी अभिनेत्यानं (Marathi Actor) मोदींच्या आवाहनावर उपहासात्मक पोस्ट शेअर करुन प्रश्न उपस्थित केले आहेत. 

मराठी अभिनेते विद्याधर जोशी (Marathi Actor Vidyadhar Joshi) यांनी फेसबुकवर एक उपहासात्मक पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मोदींनी केलेल्या प्रत्येक आवाहनाचा दाखला देत, त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केलेत. तर, काही मुद्दे पूर्णपणे खोडून टाकले आहेत. मोदींनी पुढे वर्षभर सोनं विकत न घेण्याबाबत आवाहन केलेलं. त्यांच्या या आवाहनाबाबत बोलताना सोनं विकत घ्यावं हा विचार मनात येणं म्हणजे, मोठ्ठा विनोद, असं म्हटलं आहे. तर, इंधन बचत करण्यासाठी मोदींनी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरण्याचा सल्ला दिलेला. त्याबाबत बोलताना विद्याधर जोशी म्हणाले की,  पब्लिक ट्रान्सपोर्ट एकदा मोदी सर मुंबईत येऊन स्वतः वापरून बघतील तर त्यांना गंमत कळेल...

अभिनेते विद्याधर जोशींनी पोस्टमध्ये काय म्हटलंय? (Vidyadhar Joshi On PM Modi Appeal)

काल फार disturbed होतो.. काय करावं सुचत नाही...
गेल्या 7 एक वर्षांत मी परदेश प्रवास केला नाही... आताचे तिकिटांचे दर आणि एकूण पाहता पुढे 2-4 वर्ष जाता येणार नाही... हो नाही म्हणायला दोन एक वर्षांत एखादी देशी ट्रिप होते... पण विमानाचं तिकीट लौकर आणि स्वस्त पडेल तेंव्हा काढतो... आत्ता महिन्यापूर्वी हिमालयात गेलो होतो, पण तेव्हा मोदी Sir काटकसरीच बोलले नव्हते... Work From Home माझ्या बाबतीत शक्य नाही (आरशात बघून Acting करायला लागेल)... पब्लिक Transport एकदा मोदी Sir मुंबईत येऊन स्वतः वापरून बघतील तर त्यांना गंमत कळेल... (बरं आमचं work place असत म्हड, घोडबंदर रोड, mira रोड ... पोचेपर्यंत माझं वय वाढेल...)
तेलाचं म्हणाल तर आमच्या घरी 'तळण' कमीच असतं... माझी शेती नाही... ऑरगॅनिक पटकन मिळतं असं नाही, मिळालं तरी परवडेल असे भाव नसतात... सोनं विकत घ्यावं हा विचार मनात येणं म्हणजे, मोठ्ठा विनोद... स्वदेशी बद्दल बोलून उपयोग नाही... साध चिनी वापरायचं नाही ठरवलं तरी शक्य नाही हे मोदी sir ही मान्य करतील!!!... घरात वीजही जपून वापरतो.
करू काय आता????

(त्यातल्या त्यात मुंबई इमारती म्हणा किंवा एकूणच जो विकास झालाय त्यानं उष्णता इतकी वाढली आहे की, गच्चीवर तवा ठेवून पोळ्या भाजता येतात का बघावं म्हणतो!!!)

नरेंद्र मोदींनी देशाला कोणती आवाहनं केली? (Narendra Modi On Gold Petrol Diesel)

  • सोन्याची खरेदी टाळा
  • पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा 
  • वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या
  • परदेश प्रवास टाळा
  • खाद्यतेलाचा वापर कमी करा
  • नैसर्गिक शेतीचा अवलंब करा
  • स्वदेशी उत्पादनं वापरा  

नरेंद्र मोदींच्या आवाहनामागील कारणं काय?

जागतिक बाजारातील वाढत्या अस्थिरतेमुळे भारत सरकारवर देशाचा डॉलर साठा सुरक्षित ठेवण्याचा दबाव वाढताना दिसत आहे. भारताला तेल, गॅस, सोनं, खत यांसारख्या वस्तू मोठ्या प्रमाणावर आयात कराव्या लागतात आणि या व्यवहारांचे पेमेंट डॉलरमध्येच करावं लागतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात या वस्तूंच्या किमती वाढल्या की, अधिक डॉलर खर्च करावे लागतात. परिणामी परकीय चलन साठ्यावर ताण निर्माण होतो आणि रुपयाची किंमतही दबावाखाली येते. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून नागरिकांना अनावश्यक खर्च टाळण्याचं आवाहन केलं जातंय. विशेषतः सोन्याची अतिरिक्त खरेदी, इंधनाचा जास्त वापर किंवा परदेश दौरे यांसारख्या खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. अशा उपायांमुळे डॉलरची बचत होण्यास मदत होईल आणि देशाची आर्थिक स्थिरता कायम राखता येईल. पंतप्रधानांचे हे आवाहन केवळ आर्थिक शिस्तीचा संदेश नसून, जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताची अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी केलेला एक सावध आणि दूरदृष्टीचा निर्णय मानला जात आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Atul Kulkarni Sarcastic Post On NEET Paper Leak: 'NEET' पेपरफुटीवरुन अभिनेता अतुल कुलकर्णींचे सरकारला चिमटे; उपहासात्मक पोस्ट चर्चेत, म्हणाले..

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe Biopic: IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
Awarapan 2 Box Office : इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
Embed widget