एक्स्प्लोर

Marathi Actor Upcoming Movie Kadi Patta First Poster: 'कढीपत्ता'मध्ये भूषण पाटीलसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री; अनोख्या प्रेमाची, अनोखी कहाणी

Marathi Actor Upcoming Movie Kadi Patta First Poster: युवान प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या 'कढीपत्ता' चित्रपटाची निर्मिती स्वप्नील युवराज मराठे यांनी केली आहे. 'कढीपत्ता'ची कथा विश्वा यांनी लिहिली असून दिग्दर्शनही त्यांनीच केलं आहे.

Marathi Actor Upcoming Movie Kadi Patta First Poster: पहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून सिनेसृष्टीपासून रसिकांपर्यंत सगळीकडेच 'कढीपत्ता' या आगामी मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमुळे 'कढीपत्ता' चित्रपटाची हिरोईन कोण? या चर्चेला जणू उधाण आलं आहे. रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना या चित्रपटातील नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये 'कढीपत्ता'मधील हिरोईनचा चेहरा रिव्हील करण्यात आला आहे. 7 नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 

युवान प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या 'कढीपत्ता' चित्रपटाची निर्मिती स्वप्नील युवराज मराठे यांनी केली आहे. 'कढीपत्ता'ची कथा विश्वा यांनी लिहिली असून दिग्दर्शनही त्यांनीच केलं आहे. निर्माते स्वप्नील युवराज मराठे आणि दिग्दर्शक विश्वा यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. पदार्पणातच एक अनोखी प्रेमकथा रसिकांसमोर आणण्याचं आव्हान विश्वा यांनी स्वीकारलं. हिरोईनचा चेहरा न दाखवणारं पहिलं पोस्टर सगळीकडे चर्चचा विषय ठरलेलं. दुसऱ्या पोस्टरमध्ये हिरोईनचा चेहरा रिव्हील करण्यात आला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत भूषण पाटील असल्याचं पहिल्या पोस्टरमध्ये पाहायला मिळालं. 

भूषणच्या जोडीला रिद्धी कुमार (Riddhi Kumar) मुख्य भूमिकेत आहे. प्रेक्षकांना भूषण आणि रिद्धीच्या रूपात एक नवी फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे, त्यामुळे एका नव्या जोडीची केमिस्ट्री या चित्रपटाचा युएसपी ठरणार आहे. पोस्टरमध्ये भूषण आणि रिद्धी यांनी प्रेमीयुगुलाप्रमाणे एकमेकांचा हात हाती धरलेला आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर लोभासवाणे हास्य पाहायला मिळतं. रिद्धी कुमारनं यापूर्वी काही वेबसीरिज आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. प्रभासच्या आगामी 'द राजासाब'मध्येही ती झळकणार आहे. याखेरीज प्रभासच्याच 'राधे श्याम' या चित्रपटांमध्येही तिनं अभिनय केला आहे. रिद्धी कुमारचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. 

पहिल्याच चित्रपटात उत्कंठावर्धक कथानक असलेल्या 'कढीपत्ता'मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानं खूप आनंदी असल्याची भावना रिद्धी कुमारनं व्यक्त केली आहे. ती म्हणाली की, मराठी चित्रपटांमध्ये नेहमीच गोष्टीला प्राधान्य देण्यात येतं. या चित्रपटात भूषण आणि मी जरी हिरो-हिरोईनच्या रूपात तुमच्यासमोर येणार असलो तरी खरा हिरो गोष्ट आहे. या चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा खूपच दमदार आहे. ही आजच्या तरुणाईचे प्रतिनिधीत्व करणारी स्वतंत्र विचारांची तरुणी आहे. दिग्दर्शक विश्वा यांचे व्हीजन क्लीअर होते, तर निर्माता म्हणून चित्रपटासाठी जे जे आवश्यक आहे, ते ते देण्यासाठी स्वप्नील मराठे तत्पर असायचे. त्यामुळेच एक दर्जेदार कलाकृती 'कढीपत्ता'च्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही रिद्धी कुमार म्हणाली.

Marathi Actor Upcoming Movie Kadi Patta First Poster: 'कढीपत्ता'मध्ये भूषण पाटीलसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री; अनोख्या प्रेमाची, अनोखी कहाणी

भूषण पाटील आणि रिद्धी कुमार या नव्या कोऱ्या जोडीसोबत 'कढीपत्ता'मध्ये संजय मोने, शुभांगी गोखले, अक्षय टंकसाळे, गार्गी फुले, गौरी सुखटणकर, सानिका काशीकर, निशा माने आदी कलाकार सहायक भूमिकांमध्ये, तर आनंद इंगळे, आनंदा कारेकर आणि चेतना भट पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत आहेत. मंदार चोळकर, मुकुंद भालेराव, विनू सांगवान यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार पद्मनाभ गायकवाड आणि आशिष खांडल यांनी रोहित राऊत, पद्मनाभ गायकवाड, अनन्या वाडकर, साज भट्ट, प्रियांशी श्रीवास्तवा यांच्या आवाजात स्वरसाज चढवला आहे. छायांकन अनिकेत खंडागळे यांनी केले असून वितरणाची जबाबदारी सिनेपोलीस सांभाळणार आहे. विशाल चव्हाण या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून, संयुक्ता सुभाष प्रोजेक्ट हेड आहेत. पार्श्वसंगीत तन्मय भिडे यांनी, तर संकलन ऋषीराज जोशी यांनी केले आहे. रंगभूषा किरण सावंत यांनी केली असून, वेशभूषा पल्लवी पाटील आणि गार्गी पाटील यांनी केली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget