एक्स्प्लोर

Ruturaj Phadke Post On Shivshahi Bus: 'जीव गुदमरत होता, शेवटी...'; मराठी अभिनेत्यानं शेअर केला शिवशाही बसमधल्या 'त्या' धक्कादायक प्रवासाचा अनुभव

Ruturaj Phadke Post On Shivshahi Bus: मराठी मालिकांमधून घराघरांत पोहोचलेल्या लोकप्रिय अभिनेत्यानं नुकताच शिवशाही बसनं प्रवास केला. या प्रवासावेळी आलेला भयावर अनुभव अभिनेत्यानं फेसबुकवर पोस्ट करत शेअर केला आहे.

Ruturaj Phadke Post On Shivshahi Bus: अलिकडेच पुण्यात घडलेल्या एका अत्याचाराच्या प्रकरणामुळे महाराष्ट्र परिवहन मंडळाची शिवशाही बस चर्चेत आली होती. अशातच आता एका मराठी अभिनेत्यानं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे शिवशाही बस चर्चेत आली आहे. तसेच, अभिनेत्यानं शेअर केलेल्या प्रकारामुळे नेटकऱ्यांकडून एसटीचे वाभाडे काढले जात आहेत. मराठी मालिकांमधून घराघरांत पोहोचलेल्या लोकप्रिय अभिनेत्यानं नुकताच शिवशाही बसनं प्रवास केला. या प्रवासावेळी आलेला भयावर अनुभव अभिनेत्यानं फेसबुकवर पोस्ट करत शेअर केला आहे. दरम्यान, मराठी अभिनेत्याच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत आपलेही अनुभव शेअर केले आहेत. 

मराठी अभिनेता ऋतुराज फडकेनं फेसबुकवर पोस्ट करत म्हटलंय की, "आजचा दापोली – ठाणे, शिवशाही बस मधला अनुभव… बाहेर खूप जास्त ऊन होतं, गरम होत होतं, म्हणून शिवशाही बसचं रिझर्वेशन केलं. एक 70 km अंतर कापल्यानंतर शिवशाही गाडीचा एसी चालत नव्हता… एसीमुळे कुलिंग होण्यापेक्षा त्यातून गरम वाफा येत होत्या. ड्रायव्हर आणि कंडक्टरला तशी माहिती दिली. ड्रायव्हरने उत्तर दिलं एसी असाच असतो इकडे, तेव्हा गाडी रामवाडी बसस्टॉपवर होती. तिथे ड्रायव्हर गाडी दाखवू शकला असता, परंतु तिथून त्याने गाडी नेली आणि प्रायव्हेट धाब्यावरती थांबवली तिथे जेवणासाठी अर्धा तास गाडी थांबली. त्यानंतर तर अजूनच गरम वाफा यायला लागल्या, बसमध्ये म्हातारी माणसं होती, जीव गुदमरत होता, शेवटी गाडी कशीबशी पनवेलला आली. पनवेलला स्टॅन्डच्या बाहेरच ती बंद पडली. कशी बशी ती स्टँडमध्ये नेली आणि सगळ्यांना उतरायला सांगितलं. मी पनवेलमध्येच उतरून कॅब करून घरी येणार होतो आणि आलो सुद्धा… बस अंदाजे दुपारी अडीच पावणेतीन वाजता ठाणे डेपोत पोहोचते, आश्चर्य करणारी गोष्ट अशी मला एक रात्री आठ वाजता फोन आला, तुम्ही विसापूर स्टॉपवर चढलात ना? दापोली-ठाणे बस मध्ये होतात ना?? मी म्हटलं हो… डेपोतून समोरचा व्यक्ती म्हणाला, मग बस कुठे आहे बस अजूनपर्यंत ठाणे डेपोत आलेली नाहीये… ही दुरवस्था शिवशाही बसची…" 

अभिनेत्याच्या पोस्टवर युजर्सकडून कमेंट्सचा वर्षाव 

ऋतुराज फडकेनं पोस्ट शेअर केल्यानंतर त्याच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेत्यासारखाच अनुभव आपल्यालाही आल्याचं अनेकांनी सांगितलं आहे. एका युजरनं म्हटलंय की, जीएसटी हवा असतो, पण तशा सुविधा नाही! भीषण वास्तव" तर, दुसऱ्या एका युजरनं म्हटलंय की, "आम्हालाही असाच अनुभव आलाय", तर आणखी एकानं लिहिलंय की, "पावसाळ्यात छत्री उघडून बसावं लागतं", तर दुसऱ्यानं लिहिलंय की, "हा असाच कारभार आहे…"

दरम्यान, मराठी अभिनेता ऋतुराज फडकेनं अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 'मुरांबा', 'मन उडू उडू झालं' यांसारख्या मालिकांमधून अभिनेता घराघरांत पोहोचला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Suraj Chavan Upcoming Movie Zapuk Zupuk: सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक'मध्ये कोकण हार्टेड गर्लच्या नवऱ्याची महत्त्वाची भूमिका; नेमकं केलंय तरी काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Putin India Visit : नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, भारताला त्यांचा अभिमान असला पाहिजे, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून मोदींचं कौतुक
नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून भारत दौऱ्यापूर्वी मोदींचं कौतुक  
धक्कादायक! विधानसभा, लोकसभेला मतदान केलं, आता मतदार यादीतून माजी नगरसेवकाचंच नाव वगळलं
धक्कादायक! विधानसभा, लोकसभेला मतदान केलं, आता मतदार यादीतून माजी नगरसेवकाचंच नाव वगळलं
सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
MRI City scan News : गेल्या 3 आठवड्यांपासून MRI, CT स्कॅन, एक्स रे सेंटर्स बंद
IAS Fake Officer : बोगस IAS अधिकाऱ्यांच्या जाळ्यात बडे मासे Chhatrapati Sambhajinagar Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Putin India Visit : नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, भारताला त्यांचा अभिमान असला पाहिजे, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून मोदींचं कौतुक
नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून भारत दौऱ्यापूर्वी मोदींचं कौतुक  
धक्कादायक! विधानसभा, लोकसभेला मतदान केलं, आता मतदार यादीतून माजी नगरसेवकाचंच नाव वगळलं
धक्कादायक! विधानसभा, लोकसभेला मतदान केलं, आता मतदार यादीतून माजी नगरसेवकाचंच नाव वगळलं
सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
Video: तब्बल 80 हजारांवर बघ्यांचा जमाव, 13 वर्षाच्या मुलाच्या हातात बंदूक अन् घरातील 13 जणांच्या हत्येचा बदला हत्येनं! बंदुकीचा 'न्याय' बघायला देशाचे सरन्यायाधीश सुद्धा आले..
Video: तब्बल 80 हजारांवर बघ्यांचा जमाव, 13 वर्षाच्या मुलाच्या हातात बंदूक अन् घरातील 13 जणांच्या हत्येचा बदला हत्येनं! बंदुकीचा 'न्याय' बघायला देशाचे सरन्यायाधीश सुद्धा आले..
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 2500 अश्वांची एंट्री; आमदारपुत्राने 11 लाखांना खरेदी केला पांढरा घोडा
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 2500 अश्वांची एंट्री; आमदारपुत्राने 11 लाखांना खरेदी केला पांढरा घोडा
Ruturaj Gaikwad: मौके पर चौका नहीं, थेट शतकी हातोडा! ऋतुराज गायकवाडच्या जबरी दणक्यानं 4 नंबरच्या हाॅटस्पाॅटवर किती जणांची गोची?
मौके पर चौका नहीं, थेट शतकी हातोडा! ऋतुराज गायकवाडच्या जबरी दणक्यानं 4 नंबरच्या हाॅटस्पाॅटवर किती जणांची गोची?
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात घसरण, चांदी 2477 रुपयांनी स्वस्त, 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं आणि चांदी स्वस्त, 22 कॅरेट सोन्याचा दर काय? 
Embed widget