Pradeep Pawar Revealed About Top Marathi Actress Offered: 'माझ्याशी लग्न कर, कुणाला सांगू नकोस, तुला प्रत्येक पिक्चरमध्ये घेईल...'; मराठी हिरोईनची ऑफर, उद्ध्वस्त झालं अभिनेत्याचं करिअर
Pradeep Pawar Revealed About Top Marathi Actress Offered: अभिनेत्रीची ऑफर न स्विकारल्यामुळे त्यानंतर इतर कुठल्याही सिनेमाची ऑफर त्यांना मिळाली नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.

Pradeep Pawar Revealed About Top Marathi Actress Offered: फिल्म इंडस्ट्री (Film Industry) आणि तिची काळी बाजू आपल्याला माहितीये. याबाबतचे अनेक किस्सेही आपण ऐकलेत. तसेच, अनेक अभिनेत्रींनी (Actress) त्यांना फिल्म इंडस्ट्रीतील टॉप निर्माते, दिग्दर्शक (Director), अभिनेत्यांकडून मिळालेल्या ऑफर्सबाबतही खुलासा केला आहे. पण, अशा विचित्र मागण्यांचा अनुभव फक्त अभिनेत्रींनाच नाहीतर, अनेक अभिनेत्यांनाही आला आहे. असाच एक विचित्र अनुभव अभिनेते आणि मनोविकासक प्रदीप पवार यांनी सांगितला आहे. एका टॉप अभिनेत्रीनं त्यांना त्यावेळी विचित्र ऑफर दिली होती. यावेळी अभिनेत्रीनं अनेक विचित्र आणि भंडावून सोडणाऱ्या अटी-शर्थीही ठेवल्या होत्या. तसेच, अभिनेत्रीची ऑफर न स्विकारल्यामुळे त्यानंतर इतर कुठल्याही सिनेमाची ऑफर त्यांना मिळाली नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.
सौमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे' या पॉडकास्टमध्ये बोलताना अभिनेते आणि मनोविकासक प्रदीप पवार बोलताना म्हणाले की, "त्या काळातील एका मोठ्या हिरोईनने, जी त्या काळातील टॉप मोस्ट हिरोईन होती... तिने मला ऑफर दिली की, माझ्या इथून पुढच्या प्रत्येक पिक्चरमध्ये तू असणार ही माझी गॅरंटी... ती टॉपला होती, पण माझ्याशी लग्न करायचं आणि कोणाला सांगायचं नाही... ही गोष्ट माझ्यासाठी खूप क्रिटिकल होतं. एकतर ही संकल्पना माझ्या डोक्याच्या बाहेरची होती... की लग्न करायचं ह्या बाईबरोबर, कोणाला सांगायचं नाही आणि ही सांगेल ते सगळं करायचं..."
"ही ऑफर फॅन्टसी वाटेल... मला मिळाली, मी मूर्ख होतो म्हणा, मी ती स्वीकारली नाही... मग नाही म्हटल्यानंतर समोरच्या माणसाचा इगो इतका दुखावला की, मग मी कुठल्याही चित्रपटात असणार नाही, याची दक्षता घेतली गेली... त्यामुळे काही इलाज नव्हता माझ्यासमोर, कारण किती संघर्ष करणार ना? आणि मोठ्या माशाशी लढता येत नाही, त्यांच्याशी पंगा घेऊन चालत नाही... ती व्यक्ती वन मॅन इंडस्ट्री होती. ती फार मोठ्या निर्मात्या, दिग्दर्शकाची पाहुणी होती...", असं प्रदीप पवार यांनी सांगितलं.
"...तेव्हा ठरवलं सिनेमात काम करायचंय"
सिनेमात करिअर करण्याबाबत प्रदिप पवार म्हणाले की, "सुरुवातीपासून अभिनयात करिअर करण्याचा विचार डोक्यात नव्हता. कॉलेजमध्ये सादर केलेले नाटक एका निर्मात्याने पाहिलं आणि अचानकच त्यांना 'जयप्रभा स्टुडिओ'मधून पहिला सिनेमा ऑफर झाला होता. त्यानंतर केलेल्या सिनेमात व्ही. शांताराम यांनी त्यांचे कौतुक केले होते. तेव्हा प्रदीप यांनी ठरवलेले की, सिनेमात काम करायचंय. कामासाठी धडपड करत असताना त्यांना यशवंत दत्त, प्रभाकर पणशीकर या सर्व दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळाली..."
दरम्यान, मराठी सिनेसृष्टीत ऐंशीचं दशक गाजवणारे अभिनेते म्हणजे, प्रदिप पवार. प्रसिद्ध अभिनेते कुलदिप पवार यांचे ते बंधू. त्या काळात दोन्ही भावांची जोडी सुपरहिट होती. पण काही कारणास्तव प्रदिप पवार इंडस्ट्रीपासून दूर गेले आणि पुढे जाऊन त्यांनी 'लाईफकोच' म्हणून काम करण्याचं ठरवलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























