एक्स्प्लोर

Marathi Actor Omkar Karve Allegation on producer: 'इतका थर्ड क्लास माणूस बघितला नाही, लाथाबुक्क्यांनी मारतो तो..; मराठी अभिनेत्याचे इंडस्ट्रीतील निर्मात्यावर गंभीर आरोप

हा माणूस मारतो हो..नुसत्या शिव्या घालत नाही.लाथा बुक्क्यांनी मारतो. का कंट्रोल ठेवतात मला कळत नाही.' असंही ओमकारने सांगितलं. त्याच्या या आरोपांची मनोरंजनसृष्टीत चर्चा रंगली आहे.

Marathi Actor Omkar Karve on Producer Allegation: 'इतका थर्ड क्लास माणूस आजपर्यंत या इंडस्ट्रीत मी बघितला नाही.' जनावरालासुद्धा तिकडे चांगली किंमत होती पण माणसाला नव्हती, सेटवर लोकांना वाटेल तशा शिव्या द्यायचा, लोकांना मारणार, हाडतुड करणार आणि वर म्हणणार की कोणी माझ्या आयुष्याचं काही वाकड करू शकत नाही' तुम्ही जब बुवाच्या नादी लागला तर त्यालाही अटक झाली आहे, त्यामुळे असली नाटक आता चालणार नाहीत' ही सगळी वाक्य आहेत, अनेक वर्ष मालिकाविश्वात 'आभाळमाया', 'वहिनीसाहेब'  'अधुरी एक कहाणी' चक्रव्यूह अशा गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेल्या ओमकार कर्वे या अभिनेत्याची. अलीकडेच 'लोकमत फिल्मी' ला दिलेल्या  एका मुलाखतीत अभिनेता ओमकार कर्वेने मालिकेतून न सांगता अचानक काढून टाकल्याचं सांगितलं. त्यानंतर करिअरची आणि त्याची जी फरफट झाली, जो संघर्ष त्याला करावा लागला याविषयी अतिशय थेटपणे ओमकार बोलला आहे. एका निर्मात्यावर या अभिनेत्याने अनेक गंभीर आरोप केले आहेत. हा माणूस सेटवर नुसता शिवीगाळ नाही तर लाथाबुक्क्यांनी मारहाण करतो, असं तो म्हणालाय.त्याने कोणाचेही नाव घेतलेलं नाही. मात्र फार स्पष्ट बोलणं माणसाला घातक असतं. स्पष्टवक्तेपणामुळे मी इंडस्ट्रीच्या बाहेर फेकला गेलो. असंही त्याने नमूद केलं.

नेमकं काय म्हणाला ओमकार कर्वे?

कोविडमध्ये सगळ्या मालिकांचे शूटिंग थांबले होते. अनेक मालिकांचा शूट साताऱ्यात सुरू होतं. एका प्रोडक्शनमध्ये काम करणाऱ्या लोकांनी टेक्निशियनचे जेवणाचे हाल व्हायला सुरुवात झाली. एका गावामध्ये आम्ही शूट करायचो,  तिथे बाहेर जेवायला लोकांनी सुरुवात केली. कारण प्रोडक्शनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणामुळे त्यांना पोट बिघडायला लागलं, उलट्या व्हायला लागल्या.  त्रास व्हायला लागला. मला ही गोष्ट बघवली नाही. तुम्ही जेवायला फक्त चार गोष्टी द्या-आमटी भाजी पोळी भात. पण त्या नीट द्या. जर तुम्ही पाण्यात हळद तिखट टाकून आमटी म्हणून देत असाल तर त्याला अर्थ नाही. लोकांचे हाल करून पैसा कमावला तर तुम्हाला तो लागणार नाही. त्यामुळे तिथे माझी बाजाबाची झाली. मी तिथे पंधरा दिवसच शूट केलं असेल. नंतर मी त्यांना मला हे सगळं झेपणार नाही, असं कळवून टाकलं.' 

मालिकेतून काढून टाकलं

तो पुढे म्हणाला ' माझे एक मित्र आहेत. आम्ही जय मल्हार मालिकेत एकत्र काम केलं होतं. दोनेक वर्षांपूर्वी मी एका मालिकेसाठी त्यांच्यासोबत काम केलं. सुरुवातीला असं वाटलं की छान काम होईल. पण जी वाईट अवस्था मी पूर्वी बघितली होती, त्यापेक्षा कितीतरी वाईट हे होतं. इतका थर्ड क्लास माणूस मी आजतागायत इंडस्ट्रीत पाहिला नाही. जनावरालासुद्धा तिथे चांगली किंमत होती, पण माणसाला नव्हती. हे विधान मी माझ्या फेसबुक पोस्टवरही केला आहे. हे वाक्य त्यांना इतकं बोचलं की, चॅनलला त्याने काय सांगितलं माहित नाही. अचानक मला त्या मालिकेतून काढून टाकलं.

माझ्याबरोबर झालेला एक किस्सा मी सांगतो - खूपच शुल्लक गोष्ट आहे , बाथरूममध्ये एक यलो कलरचा लाईट होता. तो इतका डीम होता की जवळपास अंधार झाल्यासारखंच होतं. त्यामुळे मी प्रोडक्शनला सांगितलं की मी पैसे देतो एक पांढरा उजेड पडेल असा बल्ब घेऊन या . त्यांनी लगेच प्रोड्युसरला सांगितलं. त्याचा मला फोन आला, की 'तू बल्ब वगैरे मागवलास?' मी म्हणालो हो मी पैसेही दिलेत त्याच्याकडे. ते म्हणाले 'असं करू नकोस, ओके प्रोडक्शनमध्ये मी काही रुल्स सेट केले आहे. काही नियम सेट केलेले आहेत.तुझ्यासारख्या सीनियर व्यक्तीने असं केलं तर, जे नवीन येतील ते तुलाच फॉलो करणार ना! मी अशी कुठली गोष्ट सांगितली. प्रोडक्शनचा माणूस सतत काही ना काही आणायला जातो त्याला फक्त बल घेऊन ये असं म्हटलं होतं. मी अशी कुठली मोठी डिमांड केली होती.' असं ओमकारने सांगितलं. 

दोनच पोळ्या मिळतील, चहासाठी नियम 

तो पुढे म्हणाला 'हे तर काहीच नाही, या प्रोडक्शनमध्ये प्रत्येकाला फक्त दोनच पोळ्या मिळणार. म्हणजे बघा, कसे हाल केले जातात. दोन पोळ्या, फक्त दोन वेळेचा चहा. त्यातही जर आपण आपला मग दिला, तर स्पोर्ट बॉयने आम्हाला सांगितलं, की तुम्ही असा मग देत जाऊ नका आम्हाला वरून सांगण्यात आलंय की कलाकारांकडून असं काही घ्यायचं नाही.त्यांना फार लाडवून ठेवायचं नाही. यात कुठे लाड आले. तुमचा गॅस वाचवण्यासाठी सुद्धा तुमचे नियम. बर ठीक आहे - चहा तरी नीट द्या, तो तरी चांगला द्या.  टेक्निशियन लोकांचे हाल तर फार वेगळे होते. त्यांना एक दोनच स्टीलचे ग्लास होते. नियम असा तर -टेक्नीशियन येणार, त्याला चहा खिडकीत ठेवलेला असेल. त्याने चहा घ्यायचा.चहाचा कप धूवून ठेवायचा. मग दुसरा टेक्निशियन येणार. त्याने त्याच ग्लासात चहा प्यायचा. का कशासाठी?काय मिळणार आहे तुम्हाला असं करून? '

सेटवर शिवीगाळ, हाड्तुड मारहाण अन्..

शिवाय प्रोड्युसरच क्रिएटिव्ह, तोच लेखक, तोच डिझायनर, प्रोड्यूसरचं सर्वेसर्वा. सगळा मी बोलेल तो कायदा. जनावरालासुद्धा माणसापेक्षा चांगली ट्रीटमेंट मिळते. तिथे एक कुत्रा होता, या कुत्र्याला एक वेगळी मेकअप रूम होती. एसी वगैरे लावून ठेवलेला असायचा. बाकीचे कलाकार एकाच खोलीत मेकअप करायचे.  तुम्ही सेटवरती येऊन वाटेल तशा शिव्या घालणार. लोकांना मारणार, हाडतुड करणार. प्रत्येकाला म्हणणार की, तुम्ही माझ्या आयुष्याचा वाकड करू शकत नाही. हे सगळं कोणाच्या जीवावर? कोणीतरी एक बुवा आहे, तुमच्या ओळखीमध्ये -ज्याचे तुम्ही भक्त आहात. त्या बुवाला सुद्धा आता अरेस्ट झाली आहे. त्यामुळे तुमची नाटकं फार काळ चालणार नाही. तुम्ही या इंडस्ट्रीची वाट लावताय. तुम्ही प्रत्येक टेक्निशियनची वाट लावताय. या लोकांना काम मिळतं इथेच प्रॉब्लेम आहे. असा निर्मात्यांना एका मागोमाग एक प्रोजेक्ट मिळत जातात. 'असं ओमकार कर्वे म्हणाला.

नुसत्या शिव्या घालत नाही, लाथा बुक्क्यांनी मारतो

ज्या व्यक्तीबद्दल मी बोलतोय ती इंडस्ट्रीला लागलेली कीड आहे.याचा खूप त्रास होतो. या माणसाविषयी आज कोणी बोलत नाही. का बोलत नाही? कारण हातावर पोट आहे. भीती आहे -मी आज जर काही रिऍक्ट केलं तर मला काम मिळेल की नाही. मी आज व्यक्त झालोय. दुसरे कोणी व्यक्त होईल की नाही माहित नाही. पण याने नवीन कलाकार येतील, टेक्निशियन येतील त्यांना जर अशा ठिकाणी जर पहिलं काम मिळालं तर त्याच्यापुढे काम करायला धजावतील ते . त्यांची किंमत होणार नाही. कारण हा माणूस मारतो हो..नुसत्या शिव्या घालत नाही.लाथा बुक्क्यांनी मारतो. का कंट्रोल ठेवतात मला कळत नाही.' असंही ओमकारने सांगितलं. त्याच्या या आरोपांची मनोरंजनसृष्टीत चर्चा रंगली आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
Nana Patekar Passed Away : नाना पाटेकर कोणत्या धर्माला मानत होते? ऐकाल तर तुम्हीही सॅल्यूट कराल
नाना पाटेकर कोणत्या धर्माला मानत होते? ऐकाल तर तुम्हीही सॅल्यूट कराल
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Embed widget