एक्स्प्लोर

Mandar Devasthali First Reaction On Allegation: 'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?

Mandar Devasthali First Reaction On Allegation: टेलिव्हिजनवरच्या अनेक गाजलेल्या मालिकांचे निर्माते, दिग्दर्शक मंदार देवस्थळी आपली नवी मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलेत. तसेच, त्यांनी त्यांच्यावर सातत्यानं होणाऱ्या पैसे बुडवल्याच्या आरोपांवर मौन सोडलंय.

Mandar Devasthali First Reaction On Allegation: 'होणार सून मी ह्या घरची' (Honaar Soon Mee Hyaa Gharchi), 'मुरांबा' (Muramba) यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला मराठी अभिनेता (Marathi Actor) शशांक केतकर (Shashank Ketkar) यानं सोशल मीडियावर पोस्ट करुन एका मालिकेच्या निर्मात्याकडून मानधन थकवण्यात आल्याचं सांगितलेलं. तसेच, त्यानं पोस्टमधून निर्मात्याला थेट इशाराही दिलेला. त्यानंतर अभिनेत्री मृणाल दुसानिस आणि इतर कलाकारांनीही आपल्याला सुद्धा पैस मिळाले नसल्याची तक्रार केली. शशांक केतकरनं बऱ्याचदा सोशल मीडियावर व्यक्त होऊन थकवलेलं मानधन आणि निर्माता, दिग्दर्शकाविरोधात आपला राग व्यक्त केलेला. या प्रकरणानंतर पैसे थकवणारा निर्माता, दिग्दर्शक मंदार देवस्थळी असल्याचं समोर आलेलं. सगळीकडून पैसे बुडवल्याच्या आरोपांची राळ उठलेली असतानाच, मंदार देवस्थळींकडून मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. अखेर, गाजलेल्या मालिकांचे निर्माते, दिग्दर्शक असलेल्या मंदार देवस्थळींनी पैसे बुडवल्याच्या आरोपांवर मौन सोडलंय. तसेच, त्यावर स्पष्टीकरणंही दिलंय.  

टेलिव्हिजनवरच्या अनेक गाजलेल्या मालिकांचे निर्माते, दिग्दर्शक मंदार देवस्थळी आपली नवी मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलेत. 'मराठी मिडीयम' या नव्या मालिकेमार्फत मंदार देवस्थळी कमबॅक करण्याच्या तयारीत आहेत. याचनिमित्तानं त्यांनी नुकतीच 'अल्ट्राबझ'ला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर आपलं मत व्यक्त केलं. तसेच, पैसे बुडवल्याच्या आरोपांवर आपली बाजूही मांडली. माझ्याकडे काम नव्हतं. मी हे सर्व ठरवून केलेलं नव्हतं, असं मंदार देवस्थळी म्हणालेत. तसेच, सर्वांचे पैसे बाकी ठेवून मी बंगले बांधले आहेत किंवा मी फार्म हाऊस घेतलं असं काहीच केलेलं नाही, माझं एक व्यावसायिक गणित चुकलं त्यामध्ये मला मोठा फटका बसला, असंही त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलंय. 

निर्माते, दिग्दर्शक मंदार देवस्थळी पैसे बुडवल्याच्या आरोपांवर नेमकं काय म्हणाले? 

गाजलेल्या मराठी मालिकांचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी म्हणाले की, "मी मुद्दाम ठरवून उत्तर दिलं नव्हतं किंवा मी सांगत नव्हतो, कारण त्या का आणि केव्हाला माझ्याकडे उत्तर नव्हतं. त्यावेळी माझ्याकडे काम नव्हतं. मी हे सर्व ठरवून केलेलं नव्हतं, मुद्दाम केलेलं नव्हतं. या सर्वांचे पैसे बाकी ठेवून मी बंगले बांधले आहेत किंवा मी फार्म हाऊस घेतलं असं काहीच केलेलं नाही. माझं एक व्यावसायिक गणित चुकलं त्यामध्ये मला मोठा फटका बसला. कदाचित मी त्यावेळी घेतलेले आहे का चुकीच्या निर्णयामुळे ते घडलं असेल. पण आता माझं पुन्हा एकदा काम सुरू होत आहे , याशिवाय मी दुसरं काहीही करू शकत नाही. मला यातूनच उभं राहायचं आहे. मी कोणतीच गोष्ट नाकारत नाही. त्यांच्या ठिकाणी ते बरोबर आहेत माझ्या ठिकाणी मी बरोबर आहे..."

"याच्यावरचे उत्तर म्हणजे माझं आत्ता काम सुरू झालं आहे त्यामुळे याच्यानंतर माझ्याकडून काही गोष्टी घडतील आणि त्या सामुपचाराने मिटतील त्यावेळेला त्याचे उत्तर आपोआप मिळेल. त्यासाठी आणखी काही वेगळं बोलून, जुन्या गोष्टी उकरून काढून उपयोग नाही असं मला वाटतं. कारण जे घडून गेलं ते मी कुठेही विसरलेलो नाही. मला त्या पद्धतीत मिळालेल्या संधीतून उभं राहायचं आहे. आणि पूर्वी जे काही घडून गेलं आहे त्यावर चांगल्या पद्धतीने पडदा टाकायचा आहे. हाच माझा उद्देश आहे हेच माझं ध्येय आहे आणि त्यासाठी मला पुन्हा एकदा नव्या जोमाने काम करायचं आहे...", असं मंदार देवस्थळी म्हणाले. 

मंदार देवस्थळींनी पुढे बोलताना सांगितलं की, "माझं आता सर्वांना हे एकच सांगणं आहे की आतापर्यंत तुम्ही मला जे प्रेम आणि आशीर्वाद दिले ते असेच राहू द्या. मला खरंच चांगलं काम करून एक नवीन मालिका चांगल्या पद्धतीने तुमच्यासमोर आणायची आहे. ज्यांचे माझ्याबद्दलचे पूर्वग्रह दूषित झाले आहे ते मला पुन्हा एकदा चांगले करायचे आहे. मला चांगल्या पद्धतीने काम करायचे एवढेच मला सांगायचंय..."

प्रकरण नेमकं काय? 

निर्माते-दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी 'सुखांच्या सरींनी... हे मन बावरे' (2018-2020) ही मालिका केलेली. या मालिकेनंतर मंदार देवस्थळींनी कलाकारांचं मानधन थकवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला. या मालिकेत शशांक केतकर, मृणाल दुसानिस मुख्य भूमिकेत होते. या मालिकेमुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं. त्यामुळे मालिकेतल्या कलाकारांचं मानधनही थकलेलं. त्यावेळी कलाकारांनी आरोप केलेले की, आम्ही थकवलेल्या मानधनाचा मागोवा घेण्यासाठी मंदार देवस्थळींशी संपर्क साधला, मात्र त्याला समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं. आता मंदार देवस्थळींनी सर्व आरोपांवर उत्तर दिलंय. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lagaliya Odh Jeeva Marathi Serial : आता
आता "याड" नाय तर "ओढ" बी लावणार; नवी गोष्ट ‘लागलिया ओढ जिवा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला...
Samantha Ruth Prabhu : समंथा झाली आई; पतीसोबत शेअर केली बाळाची पहिली झलक, मुलाचं बारसंही केलं, नावाचा अर्थ काय?
समंथा झाली आई; पतीसोबत शेअर केली बाळाची पहिली झलक, मुलाचं बारसंही केलं, नावाचा अर्थ काय?
Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
Keerthy Suresh : अभिनेत्री कीर्ती सुरेशला दिग्दर्शकाने सर्वांदेखत नको तिथे स्पर्श केल्याचा व्हिडीओ व्हायरल, पण अभिनेत्रीने ट्रोलर्सना सुनावलं; म्हणाली, 'आमचं नातं...
अभिनेत्री कीर्ती सुरेशला दिग्दर्शकाने सर्वांदेखत नको तिथे स्पर्श केल्याचा व्हिडीओ व्हायरल, पण अभिनेत्रीने ट्रोलर्सना सुनावलं; म्हणाली, 'आमचं नातं...
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोठ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोठ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Mohammed Siraj: सिराजला डावलल्यानं माजी क्रिकेटपटू भडकले, टीम इंडियाच्या वादात काँग्रेस खासदाराची उडी, नेमकं काय म्हणाले?  
सिराज नावामुळं त्याला संघात स्थान मिळत नाही, काँग्रेस खासदाराची टीम इंडियाच्या संघ निवडीच्या वादात उडी
Gondia Crime News : 13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
Embed widget