मलायका अरोराच्या डेटिंगच्या चर्चा पुन्हा रंगल्या! कॉन्सर्टमध्ये ‘मिस्ट्री मॅन’सोबत दिसली, चाहते म्हणाले 'हा तर अर्जुनपेक्षा देखणा...
याच क्लिपवरून आता चाहत्यांनी आणि नेटिझन्सनी अंदाज लावायला सुरुवात केली आहे की, अर्जुन कपूरपासून वेगळं झाल्यानंतर मलायका पुन्हा प्रेमात पडली आहे का?

Malaika Arora: बॉलिवूडची हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या कोणत्याही प्रोजेक्टमुळे नाही, तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे. अलीकडेच मलायका मुंबईतील MMRDA ग्राउंडवर ग्रॅमी अवॉर्ड विजेते गायक एन्रिक इग्लेशियसच्या कॉन्सर्टला पोहोचली होती. या कॉन्सर्टमधील तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, मात्र एका खास व्हिडिओमुळे नेटकऱ्यांमध्ये नवीन चर्चा रंगल्या आहेत. तिचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर समोर आले असले तरी, एका खास क्लिपमुळे मात्र अफवांना उधाण आलं आहे. त्या व्हिडिओमध्ये मलायका एका अनोळखी व्यक्तीसोबत नाचताना आणि बोलताना दिसत आहे. याच क्लिपवरून आता चाहत्यांनी आणि नेटिझन्सनी अंदाज लावायला सुरुवात केली आहे की, अर्जुन कपूरपासून वेगळं झाल्यानंतर मलायका पुन्हा प्रेमात पडली आहे का? (Bollywood)
अनोळखी व्यक्तीसोबत नाचताना दिसली अन्...
या व्हिडिओमध्ये मलायका एका अनोळखी व्यक्तीसोबत नाचताना आणि गप्पा मारताना दिसते. रेडिटवर या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. काहींनी दावा केला आहे की अर्जुन कपूरपासून वेगळं झाल्यानंतर मलायकाने पुन्हा नवीन नातं सुरू केलं आहे आणि तो ‘मिस्ट्री मॅन’ तिचा नवा बॉयफ्रेंड असू शकतो. एका युजरने लिहिलं, “शेवटी मलायकाने आपला स्टँडर्ड वाढवला, अर्जुन आणि अरबाजपेक्षा हा माणूस खूपच चांगला दिसतो.” तर दुसऱ्याने म्हटलं, “ नवा D...ost दिसतोय.” काहींनी तिच्या वयावरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, पण एका फॅनने प्रत्युत्तर दिलं, “52 वर्षांचा पुरुष तरुण मुलीसोबत डेट करत असेल, तर कुणी काही बोलत नाही, पण महिला असं केल्यावर तिला ट्रोल केलं जातं, ही मानसिकता लाजिरवाणी आहे.”
View this post on Instagram
मलायकाचा कॉन्सर्ट लुक
या कॉन्सर्टमध्ये मलायका पांढऱ्या रंगाच्या फिटेड टँक टॉपमध्ये, मॅरून बॉर्डरसह ब्राऊन ट्राउझर्स आणि पांढऱ्या बेल्टमध्ये दिसली. सोन्याचे ब्रेसलेट्स, मिनिमल मेकअप आणि ओपन हेअरमुळे तिचा लूक खास दिसत होता.एन्रिकच्या हिट गाण्यांवर मलायका नाचताना, हात हलवताना आणि “हिरो” गाण्यावर प्रेक्षकांसोबत गाणं म्हणताना दिसली. अनेक चाहत्यांसाठी ही रात्र एन्रिकच्या जुन्या गाण्यांमुळे आठवणींनी भरलेली ठरली.
‘एन्रिक’च्या गाण्यांनी जुन्या आठवणींना उजाळा
कॉन्सर्टदरम्यान गायकाने ‘Bailamos, Hero, Escape, Be With You’ यांसारखी सुपरहिट गाणी सादर केली. चाहत्यांनी उत्साहात टाळ्यांचा वर्षाव केला. एका क्षणी ‘Hero’ गाणं गाताना एन्रिकने गाणं थांबवलं आणि प्रेक्षकांना कोरस गाऊ दिला, त्यानंतर त्याने हात जोडून “नमस्ते” असं म्हणत भारतीय चाहत्यांचे आभार मानले.मलायकाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, आणि तिचा ‘नवा मिस्ट्री मॅन’ कोण आहे याबद्दल चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे!























