एक्स्प्लोर

Video : "हर फिक्र को धुवे मे उडाता चला गया" मराठीतील धुरळा उडवणारे गाणं कसं बनलं बघा, भान हरपून जाल!!

Making of Zindagi Zindagi Duniyadari Movie : स्टुडिओत 'जिंदगी जिंदगी' गाणं रेकाॅर्ड होत असताना अभिनेते सचिन पिळगावकर हे गाणं खूप प्रसिद्ध होईल, असं आत्मविश्वासाने सांगताना दिसून येतात.

Making of Zindagi Zindagi Song Duniyadari Movie : मरणासन्न अवस्थेत गेलेल्या मराठी चित्रपटांना 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दुनियादारी' (Duniyadari Marathi Movie) या मराठी चित्रपटाने देदीप्यमान यश मिळवले. 'दुनियादारी' हा चित्रपट मराठी चित्रपटांसाठी कात टाकणारा चित्रपट होता. अकरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'दुनियादारी' चित्रपटाने मोठी कमाई करत मराठी चित्रपट सुद्धा कोट्यवधी रुपयांची उड्डाण करू शकतात हे दाखवून देणारा असा हा चित्रपट होता. या चित्रपटाची कथा, पात्र आणि गाणी आजही मराठी चित्रपट रसिकांच्या हृदयात घर करून आहेत. 

'जिंदगी जिंदगी' कसं रेकाॅर्ड झालं? Making of Zindagi Zindagi Song 

या चित्रपटातील 'जिंदगी जिंदगी' हे गाणं आजही पाहिलं आणि ऐकलं जातं. याच गाण्याचा मेकिंग व्हिडिओ समोर आला आहे. हे गाणं कोणत्या पद्धतीने चित्रित करण्यात आलं, याचा हा व्हिडिओ आहे. 'जिंदगी जिंदगी' गाण्यासाठी अनेक अभिनेत्यांनी आवाज दिला होता हे सांगितल्यास आपला विश्वास बसणार नाही. 

सचिन पिळवगावकरांची भविष्यवाणी खरी ठरली

'जिंदगी जिंदगी' या शीर्षक गीतासाठी या चित्रपटातल्या शीर्षक गीतासाठी सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, सुमीत राघवन, सुनील बर्वे, प्रसाद ओक, केदार शिंदे, पंढरीनाथ कांबळी, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी यांनी आवाज दिला आहे. स्टुडिओत 'जिंदगी जिंदगी' गाणं रेकाॅर्ड होत असताना अभिनेते सचिन पिळगावकर हे गाणं खूप प्रसिद्ध होईल, असं आत्मविश्वासाने सांगताना दिसून येतात. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर गाण्याला मराठी चित्रपट रसिकांनी डोक्यावर घेतले, हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

सुभाष शिरोळकर यांच्या दुनियादारी कादंबरीवर आधारित चित्रपट (Duniyadari) 

दुनियादारी' हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट सुभाष शिरोळकर यांच्या दुनियादारी कादंबरीवर आधारित होता. 'दुनियादारी' या चित्रपटात अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी, संदीप कुलकर्णी, उदय टिकेकर, उदय सबनीस, सुशांत शेलार, सई ताम्हणकर, ऊर्मिला कानेटकर, वर्षा उसगांवकर, योगेश शिरसाट, आनंद अभ्यंकर आणि नागेश भोसले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

'दुनियादारी' हा चित्रपट प्रत्येकाच्या प्रवासाबद्दल आहे ज्यामुळे अखेरीस त्यांना आयुष्याचा खरा चेहरा समजतो. तब्बल 50 आठवडे हा चित्रपट चित्रपटगृहात अधिराज्य गाजवत होता. जिंदगी जिंदगी गाण्यासह टिक टिक वाजते आणि देवा तुझ्या गाभाऱ्याला या दोन गाण्यांनी सुद्धा मराठी चित्रपट रसिकांना वेड लावले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget