Mahesh Manjarekar : स्लॉव्हेनियामध्ये दिग्दर्शित झालेला पहिला मराठी सिनेमा, महेश मांजरेकरांच्या ‘एक राधा एक मीरा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
Mahesh Manjarekar : महेश मांजेरकरांचा एक राधा एक मीरा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Mahesh Manjarekar : महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) दिग्दर्शित, स्लॉव्हेनियामध्ये चित्रित झालेला पहिला मराठी सिनेमा, मराठीतील एक ‘बिग बजेट’ चित्रपटांपैकी एक अशा अनेक वैशिष्ट्यांसह नव्या वर्षा एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘एक राधा एक मीरा’ या म्युझिकल लव्ह स्टोरीबद्दल रसिकांमध्ये उत्कंठा लागून राहिली असताना निर्मात्यांनी या सिनेमाचा टीझर रिलीज केलाय. त्यंत ग्लॅमरस आणि हटके अशा या चित्रपटाची निर्मिती अविनाशकुमार प्रभाकर आहाले यांनी केली आहे.
या सिनेमात गश्मीर महाजनी, मृण्मयी देशपांडे, सुरभी भोसले, संदीप पाठक, मेधा मांजरेकर या कलाकरांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘एक राधा एक मीरा’ हा महेश मांजरेकर दिग्दर्शित मराठी चित्रपट पुढील वर्षात 10 जानेवारीला रिलीज होणार आहे. सोनू निगम, शाल्मली खोलगडे, सुखविंदर सिंग यांसारख्या दिग्गज गायकांनी सिनेमाचं पार्श्वगायन केलंय. सध्याचा आघाडीचा गायक विशाल मिश्रा यांनी या चित्रपटाचे संगीत दिले आहे.
सिनेमाचा टीझर रिलीज
आज प्रदर्शित झालेल्या टीझरवरून सिनेमाच्या कथेचा बाजही लक्षात येतो. ‘प्रेम म्हणजे आतल्या आत गुंगुंलेले गाणे..’ ‘प्रेम म्हणजे स्वतःतच स्वतःला हरवत जाणे...’ ‘प्रेम म्हणजे कुणालातरी हवेहवेसे वाटणे...’ ‘प्रेम म्हणजे कुणीतरी आभाळ होवून दाटणे...’ ‘...फक्त जेव्हा ती आभाळ होवून दाटेल तेव्हा इतकेच व्हावे...धरती होवून मी स्वतःला अंथरलेले असावे...’अशा आशयाचे भिडणारे शब्द या टीझर एकू येतात.
सोबत एक मजेशीर बडबडगीत ऐकू येते आणि त्याद्वारे चित्रपट हा एक सांगीतिक मेजवानी आहे, हे लक्षात येतंय. आहालेज प्रॉडक्शनची निर्मिती असलेला हा चित्रपट स्लॉव्हेनीया येथे चित्रित होणारा पहिला मराठी चित्रपट आहे.खिळवून ठेवणारे संवाद, संगीताची अचूक फोडणी अशी ही एक कलाकृती आहे. शेवटी “स्वप्ने सगळेच बघतात कारण ते आपल्या हातात नसते... मी पाहिले पण माझ्या स्वप्नाला मर्यादा आहेत,” या संवादावर हा टीझर संपतो.
View this post on Instagram