एक्स्प्लोर

Sachin Goswami on Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोबत घडलेला घाणेरडा प्रकार पाहताच दिग्दर्शकाची तळपायाची आग मस्तकात; सचिन गोस्वामींची फेसबुक पोस्ट चर्चेत

यावरून लेखक व दिग्दर्शक सचिन गोस्वामी संतापले आहेत. फेसबुकवर एक पोस्ट करत त्यांनी बदनामी करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं.

Maharashtrachi Hasyajatra Sachin Goswami: गेल्या अनेक वर्षांपासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळून हसवतोय.ऑफिसमधून थकून आल्यानंतर, हास्यजत्रेच्या कलाकारांची अस्सल विनोदाची मेजवानी अनुभवण्यासाठी अनेकजण हा कार्यक्रम बघतात. या कार्यक्रमातील अनेक प्रहसनं प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. हल्ली हास्यजत्रेचे अनेक भाग सोनी मराठीच्या ऑफिशियल चॅनलवर तर दिसतातच मात्र youtube पोर्टलवरही दाखवली जातात.अनेक चॅनेल्स एपिसोडमधील काही भाग युट्युबवर कुठलीही परवानगी नसताना दाखवतात. त्यातून कमाई करतात. हे करत असतानाही लोक इतकी विकृत झाली आहेत की, या एपिसोडवर अश्लील थंबनेल आणि कॅप्शन वापरून या कार्यक्रमाची बदनामी करण्याचा प्रकार सुरू झाला. हा सगळा प्रकार लक्षात येताच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा ' कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी (Sachin Goswami) यांनी प्रचंड संताप व्यक्त केलाय .. त्यांची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आहे.

सचिन गोस्वामींचा पारा चढला..

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमासंदर्भात दिग्दर्शक आणि शोचे लेखक सचिन गोस्वामी यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. शो बाबतीत घाणेरडा प्रकार करणाऱ्यांना इशारा देत हे सगळे प्रकार त्वरित थांबवावेत असं म्हणत हे सगळं क्लेशदायक असल्याचं ते म्हणाले आहेत. अनेक youtube चॅनेल्स अनधिकृतपणे शोमधील भागांचे प्रसारण करतात. हे करत असताना अत्यंत अश्लील थंबनेल आणि कॅप्शन टाकून कार्यक्रमाची बदनामी करत आहेत. यावरून लेखक व दिग्दर्शक सचिन गोस्वामी संतापले आहेत. फेसबुकवर एक पोस्ट करत त्यांनी बदनामी करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं.

ते म्हणाले, 'विकृती चा कळस… महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम गेली 8 वर्षे सोनी मराठी वाहिनीवर सादर होत आहे. 1000 भाग पूर्ण होत आहे आणि जगभरातील मराठी प्रेक्षकात प्रचंड लोकप्रिय आहे. हल्ली हास्य जत्रेचे अनेक भाग सोनी मराठी च्या ऑफिशअल चॅनेलवर आणि पोर्टलवर तर दिसतातच, पण इतर यू ट्यूब पोर्टल्सही दाखवतात. ही युट्यूब चॅनेल्स अधिकृत आणि अनधिकृत पद्धतीने प्रसारित करतायेत आणि पैसेही कमावत आहेत. पण या सर्व भागांचे प्रसारण करताना अत्यंत अश्लील thumbnail आणि कॅप्शन टाकून कार्यक्रमाची बदनामी करत आहेत. ज्या कन्टेन्टवर आपण आपले पोट भरत आहोत, त्यावर असे बदनामीकारक थंबनेल आणि कॅप्शन करताना थोडीही लाज वाटत नसावी का? अत्यंत क्लेशदायक आहे हे. कृपया प्रेक्षकांनी या प्रकारामुळे कार्यक्रमाच्या दर्जा विषयी शंका घेऊ नये. आम्ही दर्जा राखण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. संबंधितांनी हे प्रकार त्वरित थांबवावे; आणि कुणास असे आक्षेपार्ह फोटो किंवा कॅप्शन दिसल्यास त्या व्हिडिओस रिपोर्ट करावे. धन्यवाद.'

Gaurav More Hindi Webseries: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम गौरव मोरे झळकला राजकुमार हिरानींच्या वेबसिरीजमध्ये! चाहत्यांच्या भुवया उंचावल्या; विशाखा सुभेदारची कमेंट चर्चेत

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Adinath Kothare: 4000 कोटींच्या 'रामायण'नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग बजेट बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये वर्णी! लूकची एकच चर्चा
4000 कोटींच्या 'रामायण'नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग बजेट बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये वर्णी! लूकची एकच चर्चा
Advertisement

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Embed widget