Praveen Kumar Sobti : बीआर चोप्रा यांच्या महाभारत (Mahabharat) या मालिकेत 'भिम' (Bhima) ही भूमिका साकारणारे अभिनेता प्रवीण कुमार सोबती (Praveen Kumar Sobti) यांचे निधन झाले आहे. दिल्लीमधील अशोक विहार येथील राहत्या घरी प्रवीण कुमार सोबती यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 74 वर्षाचे होते. अनेक दिवस ते आजारी होते. त्यांना पाठी दुखीची समस्या जणवत होती. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यांची कन्या निपुणिकानं एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार त्यांना सोमवारी रात्री 9.30 वाजता ह्रदयविकाराचा झटका आला होता.
पंजाबमधील तरणतारण हे प्रवीण कुमार सोबती यांचे मूळ गाव होते. त्यांच्या महाभारत या मालिकेतील 'भिम' या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यांच्या फिटनेसमुळे ते नेहमी चर्चेत असत. फिटनेसमुळे त्यांना चित्रपट आणि मालिकांमधील बॉडीगार्ड किंवा गुंडाच्या भूमिकेच्या ऑफर्स येत होत्या. फिटनेसमुळेच त्यांना भिम ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
प्रवीण कुमार सोबती यांनी 30 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याआधी ते हॅमर आणि डिस्कस थ्रो एथलीट होते. एशिशन गेम्समध्ये त्यांनी दोन गोल्ड मेडल पटकावले होते. तसेच त्यांनी दोन सिल्व्हर आणि एक ब्रॉन्झ मेडल देखील त्यंनी पटकावले होते. त्यांनी 1968 मधील मॅक्सिको ऑलिम्पिक्स आणि 1972 मधील म्यूनिख ऑलिम्पिक्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं. तसेच ते बीएसएफचे जवान देखील होते.
संबंधित बातम्या
Lata Mangeshkar : बचपन के दिन भी क्या दिन थे...; लता दीदींच्या आठवणीत रमल्या आशाताई
Lata Mangeshkar : 'आपका साया साथ होगा'; 'अमूल'नं लता दीदींना वाहिली श्रद्धांजली
Lata Mangeshkar Last Song : लता मंगेशकर यांचे शेवटचे गाणे ऐकून चाहते भावूक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha