Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर  (Lata Mangeshkar) यांनी रविवारी (6 फेब्रुवारी) वयाच्या 93व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. रविवारी सायंकाळी सात वाजता शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर शहरात झाला होता. लता दीदींनी आपली वेगळी ओळख निर्माण करत हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये रसिकांच्या मनावर आपले नाव कोरले. आज लता दीदी जरी आपल्यात नसल्या तरी त्यांच्या सुपरहिट गाण्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देऊ शकतो. लतादीदींच्या इंदूरमधील एका चाहत्याकडे त्यांच्या गाण्यांचा मोठा संग्रह आहे. 


सुमन चौरसिया असे या चाहत्याचे नाव असून त्यांचे इंदूरमध्ये पानपट्टीचे दुकान आहे. सुमनकडे लता दीदींच्या साडेसात हजार गाण्यांचा संग्रह आहे. चौरसिया यांनी 2007 मध्ये लता दीदींच्या संग्रहालयाचे नाव लता दीनानाथ मंगेशकर ग्रामोफोन रेकॉर्ड म्युझियम असे ठेवले. लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्यांचा देशातील सर्वात मोठा संग्रह सुमनकडे आहे, असे म्हटले जाते. 


लतादीदींनी स्वतः दुर्मिळ गाण्याचे रेकॉर्डिंग मागवले होते
लता मंगेशकर यांनी जवळपास 30 हजार गाणी गायली आहेत. यापैकी सुमारे साडेसात हजार गाणी इंदूरच्या सुमन चौरसिया यांच्याकडे आहेत. त्यांच्या संग्रहात अनेक दुर्मिळ गाणी आहेत. लतादीदींना जेव्हा या संग्रहाविषयी माहिती मिळाली तेव्हा त्यांनी सुमन यांच्याकडे अनेक दुर्मिळ गाणी पाठवण्याची विनंती केली होती. 


रविवारी सायंकाळी सात वाजता शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात लता दीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण देशवासियांच्या डोळ्यात आज अश्रू आहेत. प्रत्येक भारतीयांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या आहेत.  लता मंगेशकर यांच्या अंतिम संस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर शिवाजी पार्कमध्ये उपस्थित होते.  


संबंधित बातम्या


Lata Mangeshkar : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लतादीदींना आदरांजली, मंगेशकर कुटुंबीयांचं केलं सांत्वन


Lata Mangeshkar : आवाज ही पहचान हैं, मराठी कलाकारांनी लता दीदींना वाहिली श्रद्धांजली


Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या जाण्याने जागतिक पातळीवर हळहळ, 43 देशात अंत्ययात्रेचे लाईव्ह सुरू


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha